
Social ओझं……
दहा अकरा वर्षांपूर्वी जेंव्हा इंजिनीरिंग संपवून (संपवूनच , पूर्ण करून नाही) आम्ही college सोडलं आणि दारोदारी जाऊन नोकरीची पायपीट करायला लागलो. 4 वर्षे एकत्र घालवलेले आम्ही जवळ जवळ 250 – 300 मुलांचे तोंडावर तोंड, कॉलेज मध्ये मेस मध्ये कुठे ना कुठे ते चेहरे दिसायचेच. त्यातले काही चेहरे हे एकदम जवळचे होऊन गेले काही तेवढे जवळ न येऊ शकले पण होते तर सगळे मित्रच ना. एवढ्या ओळखीच्या संख्येमधून अचानक आम्ही वेगळे झालो, inner orbit मधले मित्र फोन करायचे एकमेकांना पण ज्यांचे फक्त नाव आणि थोडी ओळख होती ते ? ते गेलेले कधीच परत न येण्यासाठी.
शोधून शोधून पुण्यात नोकरी मिळाली आणि मित्रांसोबत राहण्याची त्यांच्या सतत संपर्कात राहण्याची कल्पना पण मिळाली. त्या साली फेसबुक नवीन आलेलं, ऑर्कुट च्या पोटावर पाय देऊन फेसबुक ने सगळ्यांच्या मनात घर केलेलं. सगळ्या मित्रांचे हालचाल कळणार म्हणून आम्ही मित्रांना शोधू लागलो (आणि कॉलेज मध्ये असणाऱ्या आणि आमच्या औकात च्या बाहेर असणाऱ्या मुलींना ही ?) जवळ जवळ सगळे भेटले फेसबुक वर कोणी request accept केली कोणी नाही केली पण त्यावेळी तो आनंद गगनात मावणारा नव्हता.
आठवड्यातून एकदा cybercafe मध्ये जाऊन सगळ्या मित्रांची खुशाली कळाली की बरं वाटायचं. हळू हळू फेसबुक मोबाईल मध्ये आलं आता रोज मित्रांची खुशाली कळते. त्याच बरोबर whatsapp पण आलं सगळ्यांची खुशाली एका स्टेटस वर कळायला लागली. सर्व काही स्वर्गासारखं चाललेलं पण अचानक काय झालं कुणास ठाऊक.
inner orbit मधले मित्र आहेत त्यांचे फोन येणे जाणे बंद झाले. लोकं चढाओढीवर फोटो टाकायला लागले. आमकां फिरायला गेला, तमक्यांनी आज हॉटेल मध्ये काय मागवलं , ह्याने बायकोला असला हार दिला, तिने आज शेवया केल्या , कुणी केक बनवला, कोणी गाडी घेतली वगैरे वगैरे.
हे चांगलं होत जोपर्यंत आपण जे करतोय ते आपल्या मित्रांसोबत share करत होतो तोपर्यंत पण आता हळू हळू धोक्याची घंटा वाजायला लागलीय. आता लोकं स्टेटस ला टाकायचं म्हणून गोष्टी करायला सुरुवात झालीय. हे सगळे अँप मिळून आपल्याला तसं करायला भाग पडायला लागलेत. एखाद्याच स्टेटस पाहून like नाही केलं तर वाटत त्याला वाटेल ह्याला चांगलं नाही वाटलं म्हणून दिवस भर वाईट वाटत राहतं.
कोणाच्या Bday ला जर त्याचा फोटो स्टेटस ला नाही ठेवला तर तुम्ही त्याचे जवळचे नाहीत असाच अर्थ निघतो. जास्त जवळचा कोणी असेल तर दिवाळीला लावतो त्या पेक्षा मोठी फोटोची माळच स्टेटस ला ठेवावी असं जणू गीतेतच लिहून ठेवले आहे.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या सगळ्या सवयी फेसबुक, व्हाट्सआप ला माहिती झालं असेल ( गूगल आणि गूगल search history बद्दल इथं ना बोललेच चांगलं ). सगळ्यांची खुशाली जर फोटोनेच कळतेय तर फोन करायची काय गरज असं समजून कित्येक जण आपल्या आप्तेष्टांना पण फोन करत नाहीत. आपण एका मायाजालात खोल रुतत चाललोय. कोणाला तरी जळवण्यासाठी फोटो काढून स्टेटस ला ठेवणारी मंडळी सुद्धा या जगात जगतात याच मला अलीकडेच दर्शन घडलं.
फिरायला आलेल्या जोडप्याचा संवाद ऐकला , आमक्याच्या बायकोने असा फोटो इथंच काढला होता तुम्ही गप इथं येऊन उभा राहा, फोटो तिच्या फोटोपेक्षा रोमँटिक वाटला पाहिजे, तिलाही कळालं पाहिजे आम्ही तिच्या पेक्षा जास्त मजा केली ते( तो बिचारा गप फोटोला pose देऊन उभा राहिला, त्याच तरी काय चालणार म्हणा).
फेसबुक वर कोणाला किती likes यावर बँका लोन देतील थोड्यादिवसात एवढं आपण त्यात फसलोय. तुम्हाला धंद्याला लोन मिळणार नाही कारण तुम्हाला जास्त फेसबुकवर मित्र नाही, like नाही असं बँक म्हणाली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. होईल ते होईल पण आपण कधीपर्यंत हे social ओझं वागवणार आहोत. जे मित्र आपले आहेत ते आहेतच, आपण जसे आहोत तसे आहोतच, आपल्या मित्रांच नातेवाईकांच, घरच्यांच आपल्यावर किती प्रेम आहे किंवा त्यांना आपण किती आवडतो हे आता फेसबुकवर कळणार का आपल्याला?
कळत नाही बरेच लोकं दिवसभर वेळ घालवत असतात. खोट्या न्युज, खोटे likes, खोट्या कंमेंट्स, सगळं खोटं पण त्यासाठी आपण सगळं सोडतो आपल्याला स्टेटस नाही संवाद हवाय मनमोकळा जिथे ईर्षा नसेल, कोणाला दाखवण्याची इच्छा नसेल सगळं नॉर्मल असेल जसा 10 वर्षांपूर्वी होतं.
online Social असण्यात चूक नाही पण त्यामुळे socialness वाढला पाहिजे ओझं नाही…..
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

