
सुसंवाद
चिंताग्रस्त मन,येणाऱ्या संकटांची नांदी अन होणार जीवघेणा त्रास या सगळ्यातून पुन्हा वाटचाल करीत जीवनाचा पुढचा मार्गक्रमन करणे,खूप अशक्यप्राय वाटत होते.या जीवनाच्या चढउतारांनी तो थकला होता.त्याने आरश्यात आपली प्रतिमा पाहिली. स्वतः चीच कीव वाटली.एका क्षणार्धात सारा मांडलेला डाव विस्कटला अन या जगाचा निरोप घेतला..
या सगळ्या मागे काय होतं? मनस्ताप ? संकटे ? चढउतार ? की हरवलेला सुसंवाद ? माहिती नाही! तसं जीवनातल्या संकटांना कोण परके असते, जन्माला आल्यापासून प्रत्येक जण हा संकटाच्या गर्तेतून सदैव वाटचाल करतच असतो. पण या संकटाच्या वाटेवर पदोपदी त्याला सोबती मिळतो,दिशा दर्शक मिळतो.
संकटाने तोंड देणे , ही त्याची सवय बनते . बहुधा त्याचे बाहु ही संकटांना तोंड द्यायला पुरेसे बळकट झाले आहेत, अशी धारणा होते अन हीच धारणा काही काळाने उध्वस्त होते.अचानक आजूबाजूला पाहिल्यावर दिसतं की आपल्या सोबती तर कुणीच नाही.हाच त्याच्या मनावरचा पहिला प्रहार असतो. त्याला तोंड देतानाच संकंटाचे घाव वर्मी लागतात.आता मदतीला ही कोणी नसतं. ज्यांना मनाच्या भाव-गाभाऱ्यात पुजले होते, ते कोसो दूर गेलेले असतात. या मनाचा कोंडमारा सहन होत नाही.ही चलबिचल अवस्था अस्वस्थ करते आणि..आणि… एक दिवस…
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. प्रत्येकाला वयाच्या प्रत्येक टप्प्यावर समजून घेणारे तथा ऐकणारे कोणीतरी असावं लागतं.जिथं या सर्वांपासून तो दूर जातो ..तो कायमचाच..
समाज ही असा आहे की त्याला खूप दूर लोटतो. जसा दुरावा वाढतो..तसा एकटेपणा वाढतो..हा ‘एकला चलो रे’ प्रवास असह्य होतो.. पण ..पण..जरी म्हंटल कोणीही कुणाचं नसतं तरी स्वतः च जीवन हे स्वतःचच असतं.
या जीवनात स्वतःलाच सोबती मानायचं अन सुसंवाद साधायचा. खूप अनभिज्ञ गोष्टी कळतील..खूप नव्या गोष्टी समजतील. एक नवं स्वतः च जीवन निर्माण करायचं. असं ही होऊ शकतं!!! पण इतरांनीही विचार करावा की आपल्या असण्याने किती जणांचं जीवन फुलू शकतं ??.आपल्या सुसंवादाने किती जणांच जीवन उमलू शकतं.??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

