
आयुष्य कुठूनही सुरू करता येतं…..
हो खरंच आहे..
१) प्रिया ला जेव्हा कळलं की आता आपले लग्न होऊ शकत नाही, वय झालंय, सगळा जगण्याचा उत्साह निघून गेला आहे आणि अचानक एक दिवस तिच्या आयुष्यात रुपेश आला. मन परत भरारी घेऊ लागले. चाळिसाव्या वर्षात ती विशीतल्या अल्लड मुलीसारखी सारखे वागू लागली?
२) सुधाकर ला तर मानींजयटीसचा आजार जणू जन्मापासून सोडत नव्हता. सगळ्या भावभावना त्याने मारून टाकल्या होत्या. एक दिवस उपचार घेताना त्याची ओळख एका विधवा नर्स शी झाली. मने जुळली आणि आयुष्य मोरपंखी वाटू लागले☺️..
३) मृण्मयी खूपच डिप्रेशन मध्ये असायची..कारण तिचा नवरा सोडून गेला होता आणि जगाची तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली होती.पण एक दिवस अनिल समुपदेशन साठी जो आला आणि त्यांचे बंध नकळत जुळलेच. आता तिचे आयुष्य सुंदर झाले.
४) सुधा ला तर आता जगणेच नकोशे झाले होते. नवरा एअर फोर्स मध्ये होता आणि तो ही बॉर्डर वर वीरगती प्राप्त झालेला?..पण एक दिवस त्यांच्याच रेजिमेंट मधला अशोक घरी आला नि तिला लग्नाची मागणी घातली..तिला परत आयुष्य सुखद वाटू लागलं..?
५) प्रतीक ला तर कॅन्सर झालेला. थोड्याच दिवसाचा सोबती आहेस असे डॉक्टरांनी सांगितलेलं. अजून वय लहान. पण त्याची लहान वयात विधवा झालेली बाल मैत्रीण त्याला भेटायला काय आली मग सगळंच बदललं आणि त्याने मरणावर हीं मात केली???
६) अथर्व आणि अवंती एका समुपदेशन केंद्रात एकमेकांना भेटले आणि सतत आपण स्वतःला संपवणार अशी भाषा करणारे एकमेकांना लग्नबधनात बांधून घेतले..?
७) वयाची पन्नाशी उलटलेले आणि एकटेच राहणारे सुधीर आणि सुषमा रोज फेसबुकवर एकमेकांना हितगुज करायचे. दोघेही एकटेच..एक दिवस त्यांनी सर्व बंधने झुगारून एकत्र राहण्याचं ठरवलं. खूपच आधार आहे आता एकमेकांना ??
ही आणि अशीच खूप काही उदाहरणे. जे सांगतात की आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करता येत.त्याला वयाची किंवा समाजाची बंधने नाहीत. फक्त आपली मानसिकता बदलायला हवी..
आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते प्रत्येकाने आपल्या परीने आनंदात जगले पाहिजे?
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
छंद जोपासण्यासाठी
क्लिक करून सामील व्हा!
??



