
शटडाउन अँड रीस्टार्ट……आयुष्यात खुप गरजेचे आहे.
चंद्रकांत सावंत
चांगले – वाईट दिवस सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. पण काही वेळा आपल्या जीवनात काय चालले आहे हे आपल्यालाच कळत नाही. कष्ट करूनही फळ मिळाल्यासारखे वाटत नाही, विचार जुळत नाहीत. परिस्थिती पटत नाही. एकटेपणाची घंटा सतत कानात वाजत राहते. कशातही मन लागत नाही. हाती घेतलेले काम पूर्ण होत नाही. नवीन काम मिळत नाही. जवळच्यांपासून दुरावा जाणवतो. आपल्याला कुणी समजत नसल्याच्या विचाराने मन कटू होते…
अशावेळी निराश होऊन काही परिस्थिती बदलणार नसते. रडूनही सहानुभूती शिवाय काहीच मिळत नाही. जे आपणच समजू शकत नाही किंवा सांगू शकत नाही ते आपले जवळचे तरी कसे समजतील. स्वत:ला किंवा कुणालाही दोष देणे मूर्खपणाच ठरेल. ही परिस्थिती, हा प्रसंग कुणावरही येऊ शकतो. खरे तर प्रत्येकावर कधी ना कधी येतोच. अशा वेळी न रडता, न घाबरता खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे…
मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या बाबतीत आपण जसे करतो ते स्वत:वर करा. कधी कधी मधेच मोबाईल आणि कॉम्प्युटरची बटणे दाबूनही काही होत नाही. तेच चित्र दिसत राहते. आपण काही केल्या यंत्र चालू होत नाही.,
अशा वेळी तुम्ही काय करता…??
फोन आणि संगणक जसे ‘हँग’ होतात तसेच आपल्या मेंदूचेही होते. विचार पांघरूण डोक्यावर ओढून झोपून जातात आणि मेंदू हँग होतो. तेव्हा सारखी बटणं दाबत बसू नका…
‘डोकं का चालत नाही…??’
या मुद्यावर स्वत:चा छळ करू नका. हँग झाल्यावर मोबाईलची बॅटरी काढून त्याला फुंकर मारून परत मोबाईलमध्ये घालून चालू करण्याचा अनुभव सर्वांनाच असेल., तसेच करा…
काही वेळापुरता सर्व विचार बाजूला सारा.
काय होत नाही.??
किंवा का होत नाही..??
यावर वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. स्वत:ची बॅटरी काढा., थोडे मोकळे व्हा., जे आवडते ते करा., मित्रमैत्रिणींना भेटा., छंद पूर्ण करा., जमेल त्यानुसार एक किंवा दोन दिवस मनाची बॅटरी चांगल्या रितीने चार्ज करा…
मन सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवा. जगातल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष घाला. एकटेच दूरपर्यंत चाला. स्वत:शी चांगल्या गप्पा मारा. काम आणि जबाबदार्यांमध्ये अडकल्यामुळे इतर वेळी जे करणे राहून जाते ते करा. यालाच म्हणतात वैचारिक शटडाऊन…
हे सगळे करून बॅटरी नक्कीच चार्ज होईल. मग पुन्हा नव्याने रिस्टार्ट करा. जुने वाद, प्रसंग, दु:ख, त्रास यांच्याकडे नव्याने पहा. विचारांमध्ये नक्कीच फरक पडलेला जाणवेल…
आपले मन म्हणजे एखाद्या मोबाईल सारखे असते. दिवस -रात्र वापर करीत असताना अनेकदा त्याची बॅटरी लो होते. ती वेळोवेळी चार्ज करावी लागतेच. त्याचबरोबर ‘मन’ हँग झाले की पूर्णपणे शटडाऊन करून रिस्टार्टही करावे लागतेच…
मनाची काळजी घ्या.., बॅटरी चार्ज करीत राहा आणि गरज भासली तर
‘शट्डाऊन अॅण्ड रिस्टार्ट…..!!!’
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
छंद जोपासण्यासाठी
क्लिक करून सामील व्हा!
??



