
छिन्नमनस्कतेची लक्षणे (उन्माद )
डॉ. अमोल जाधव
छिन्नमनस्कता विकृतीत पुढील प्रमाणे धनात्मक लक्षण पहावयास मिळतात.
छिन्नमनस्कतेची धनात्मक लक्षणे
सर्वसाधारणपणे सामान्य व्यक्तीत आढळून न येणारे लक्षणांना धनात्मक लक्षणे असे म्हणतात.
ते पुढीलप्रमाणे
१) विभ्रम – उद्दीपकांच्या अनुपस्थितीत त्या उद्दीपकाची होणारी जाणीव म्हणजे विभ्रम होय. यात एखादी गोष्टसमोर अस्तित्वात नसताना त्याचा अनुभव व्यक्तीस होतो. उदा. शांत वातावरणात कोणीतरी बोलत आहे असे वाटणे, तसेच श्रवण भ्रम, गंध भ्रम, स्पर्श भ्रम , शरीर अंतर्गत संवेदना असे व्यक्तीत निर्माण होतात.
२) भ्रांती – वास्तवाचा कुठलाही आधार नसलेल्या अनेक चुकीच्या समजुती यांना भ्रांती असे म्हणतात. यात व्यक्तीला कितीही पुरावे दिले तरी ते ती स्वीकारत नाही. उदा. एखादी व्यक्ती मला कट करून मारणार आहे असे वाटणे.
३) असंघटीत संभाषण – इतरांशी बोलताना चुकीचे शब्द वापरले जातात. मधेंच भलत्याच मुद्द्यावर जातात. निरर्थक शब्दाचा वापर केला जातो
४) विचित्र वर्तन – छिन्नमनस्क व्यक्ती वर्तन विचित्र व विक्षिप्त स्वरूपाचे असते. तासन तास उभे रहाणे, विनाकारण किंचाळणे इकडे तिकडे धावणे. एखाद्यावर हल्ला करणे चावा घेणे, सार्वजनिक ठिकाणी कपडे काढणे इ
५) विसंगत भावना – या व्यक्तीत भावनिक बिघाड झालेला असतो. यांची भावना परिस्थितीशी जुळत नाही विसगती आढळते. उदा. आनंदाच्या प्रसंगात या व्यक्ती ओरडतात तर दुखाच्या प्रसंगात या व्यक्ती मोठमोठ्याने हसतात.
आपल्याला हा लेखआवडल्यास शेअर करा
amoljadhav534@gmail.com
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
छंद जोपासण्यासाठी
क्लिक करून सामील व्हा!
??



