
लॉक डाऊन आणि लहान मुले
संगीता वाईकर.
नागपूर
गेली तीन महिने कधीही न अनुभवलेली परिस्थिती निर्माण झाली आहे.
लॉक डाऊन मुळे शाळेत जाणारी ,मोकळ्या हवेत खेळणारी ,आणि एका चांगल्या वातावरणात रमणारी मुले अचानक घरात बंदिस्त झाली.
सतत घरात राहून ही चिमुकली मुले काहीशी चिडचिडी झाली आहे.
अभ्यास आणि मनसोक्त खेळ यात रमणारी आणि वेळ घालवणारी मुळे काय करावं या संभ्रमात आहेत.
शाळा म्हणजे विविध विषयांचे ज्ञान आणि मित्र मैत्रिणी खेळ यातून त्यांचा मानसिक विकास होतो पण या चक्राला खीळ बसली आहे.
पालक आणि मुले सुरवातीच्या काळात घरात राहायचे म्हणून आनंदी होती.मग वेळ जाण्यासाठी प्रत्येकाने आपापले छंद जोपासले.
त्यातून सकारात्मक विचार केला तर बरेच दिवस न मिळणारा वेळ मिळाला आणि त्यातून कला गुणांना वाव मिळाला.
आता मात्र पालक आणि मुले यांना पुढे काय हा प्रश्न भेडसावू लागला आहे.कारण पुन्हा ही गाडी रुळावर यायला किती वेळ लागेल याची काही शाश्वती नाही.
या कालावधीत मुलांना सांभाळणे .त्यांच्याकडून अभ्यासाचा सराव करून घेणे आवश्यक आहे.
अन्यथा मोठ्या कालावधीनंतर पुन्हा ती शिस्त,नियम,एकाग्रता साधता येणे कठीण जाणार आहे.
ऑनलाईन शिक्षण असा विचार केला तरी ते सर्वांसाठी म्हणावे तसे उपयुक्त ठरेल असे वाटत नाही.
मुलांना जबरदस्तीने मोबाईल ,लॅपटॉप समोर बसवणे अत्यंत अवघड आहे .
त्याशिवाय डोळ्यांवर येणारा ताण आणि त्याचा मेंदू वर होणारा विपरीत परिणाम याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
लहान मुलांची मानसिकता जपणे ही आज पालकांसाठी एक फार मोठी परीक्षाच आहे.
मुले लहान असली तरी त्यांना सगळं समजतं आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
अगदी लहान आणि किशोर वयीन मुले यांचेही प्रश्न भिन्न भिन्न आहेत.
पालक आणि शिक्षक आणि मुले यांनी समन्वयाने या परिस्थितीचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुलांना रोजच्या सवयी , शिस्त,अभ्यास , सराव,खेळ यात सहभागी करून घेणे आवश्यक आहे.
या कालावधीत मुलांना सांभाळणे त्यांच्या मानसिकतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
घरात आई,वडील,बहीण, भाऊ, आजी,आजोबा यांच्या मदतीने हा प्रश्न सोडवता येईल.
मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपले पाहिजे.ही उद्याची नवी पिढी दोन्ही दृष्टीने सशक्त करणे ही एक मोठी जवाबदारी आहे.
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
क्लिक करून सामील व्हा!
??

