
लॉकडाऊन हा उपाय किती बरोबर किती चूक?
उन्मेष गौरकर
संपादक श्रीमत दर्शन
कोरोना या आजाराशी गेल्या पाच महिन्यांपासून भारतीय लोक दोन हात करत आहेत. प्रशासकीय यंत्रणेचा या युद्धातील सहभाग महत्वाचा व खूप उपयुक्त ठरला आहे. कोरोना हा आजार संसर्गन्य आजार असल्याने आणि त्यावर योग्य असा खात्रीशीर उपाय कुणाकडेच उपलब्ध नसल्याने या आजाराची तीव्रता अधिक वाढली. जगातील विकसित, अविकसित असे सगळे देश या आजाराने त्रस्त झाली. हजारो लोक जगात मारल्या गेले, तर लाखो लोक आजही बाधित आहेत.
कोरोनावर खात्रीशिर उपाय कुणा कडेच नसल्याने आणि याच्या प्रदुर्भावाचा वेग पहाता, हा आजार पसरू नये, याची साखळी ब्रेक व्हावी म्हणून जगातील बहुसंख्य देशांनी लॉगडाऊन हा उपाय योजला. तो अनेक ठिकाणी उपुक्त ही ठरला, भारतानेही चार महिन्याच्या वर राष्ट्रीय लॉगडाऊन केले. यामुळे देशात कोरोना रुग्णाची संख्या प्रचंड वाढली नाही. पण ती काही भाग सोडता, अनेक भागात नियंत्रणात येऊ शकली नाही. यात महाराष्ट्राचा वरचा नबर आहे. देशातील विकसित राज्यात महाराष्ट्राचा वरचा नबर आहे. देशा बाहेर ये जा करणाऱ्या महाराष्ट्रीय लोकाची संख्या मोठी आहे. यात मुबई तर देशाची आर्थिक राजधानी, परिणामी जगात कोरोना पसरला तेव्हा त्याच्या संसर्गापासून महाराष्ट्र वाचले असते तरच नवल होते. महाराष्ट्रात शासकीय यत्रणानी हा आजार रोकण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यात लॉगडाऊन हा उपाय महत्वाचा. तोही देशातील इतर भागापेक्षा अधिक वापरला. तरीही महाराष्ट्रातील कोरोना पेशंटची संख्या प्रचंड वाढली नाही, तरी म्हणावी तशी नियत्रणात ही आली नाही.
उलट, शहरी भागातील कोरोनाचा प्रसाद खेडे गावानाही मोठ्या प्रमाणात मिळालाय.आज राज्यातील अनेक खेड्यात कोरोना पेशंट वाढत आहेत. ही वाढणारी संख्या रोकण्यासाठी अनेक जिल्ह्यात स्थानिक प्रशासकीय यत्रणानी लॉगडाऊनचा उपाय योजला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रुग्ण संख्या कमी करण्यात किती यश मिळालं , हा शोधाचा व अभ्यासाचा विषय आहे. पण देशात येवढ्या मोठ्या प्रमाणावर लॉगडाऊन राबवल्या नंतर त्याचे काय परिणाम झाले, हे सर्वश्रूत आहे. त्यामुळं लस मिळेपर्यंत , सार्वजनिक कडक लॉगडाऊन हा कोरोना रोकण्यासाठी योग्य उपाय आहे का ? हा प्रश्न पडत आहे. लॉगडाऊनमुळे होणारे फायदे आणि तोटे काय ? याचा विचार व्हायला हवा.
सुरवातीला आपण सद्य परिस्थितीत जिल्हास्तरावरील लॉगडाऊनचे फायदे पाहू-:
फायदे :
1. कोरोना ची साखळी ब्रेक होऊन रुग्णाच्या संख्येत घट होऊ शकते. काही जीव वाचू शकतात.
2. जिल्ह्यातील वाढत्या रुग्ण संख्येवर मोठ्या प्रमाणावर नियत्रण मिळवता येऊ शकत.
3. लोकांना शिस्त लावता येवू शकते.
4. गोधळ टाळता येऊ शकतो.
5. कोरोनात काळजी घेणे किती महत्वाचं आहे, हे लोकांना पटवून देता येत.
आता तोटे पाहू-
1. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत.
2. लोकात भीती निर्माण होते.
3. जनजीवनाची घडी विस्कटते.
4. लोकांचे ताण वाढतात.
5. समाजातील बेरोजगारांची संख्या वाढ.
6. आरोग्य विषयक सुविधा बंद पडल्या ने अनेक पेशंटचे हाल.
7. शाळा कॉलेज बंद या मुळे मुलाचे मोठे नुकसान.
8. स्वातंत्र्यावर घाला.
9. अनेक वेळा पोलीस व दंड लावणाऱ्या कडून लोकांवर अत्याचार.
10. अनेकांवर उपासमारीची वेळ.
11. एवढे करूनही कोरोना मुक्त होण्याची कोणतीही गॅरंटी नाही. भीती कायम.
या व्यतिरिक्त लॉगडाऊन मुळे निर्माण होणारे अनेक फायदे तोटे लोक सांगू शकतील. या सगळ्याचा विचार करता, लॉगडाऊनच्या फायद्यापेक्षा तोटे जास्त व अधिक दुरोगामी आहेत. तसेच फक्त जिल्हा पातळीवर काही दिवस लॉगडाऊन केल्याने कोरोना मुक्त होऊ शकतो , हे गॅरंटीने कुणीही सांगू शकत नाही. सभोवताली एक रुग्ण जरी लपून राहिला तरी रुग्ण संख्या वाढण्यास जास्त वेळ लागणार नाही. कुठल्याही गावात रुग्ण असले तर लॉगडाऊन 100 टक्के फेल होण्याची शक्यता आहे. लोकांनी काळजी घेतली नाही तर लॉगडाऊन पुर्वीची परिस्थितीत येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे जिल्हा स्तरावरील लॉगडाऊन हा korona वरील उपयुक्त उपाय योजना होऊ शकत नाही. हे सत्य आहे.
त्या ऐवजी ,
1.कोरोनाच्या नियमा विषयी लोकजागृती व लोकसहभाग वाढवणे ,
2. सगळ्यांना वेठिला धरण्या ऐवजी जे सोशल डीस्ट्सिंग, मास वापरणे याची काळजी घेत नाहीत. त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी फिरती पथके तयार करणे.
3. जास्तीतजास्त लोकाची टेस्ट करणे, टेस्टच्या सुविधा उपलब्ध करून देणे.
4. कोरोना रोकण्यासाठी लोक सहभाग वाढवणे.
5. कोरोना रुग्णाच्या उपचाराच्या स्वस्त, सोप्या सुविधा उपलब्ध करुन देणे.
लॉगडाऊन ऐवजी वरील उपाय योजना वर अधिक भर देणे गरजेचे आहे. मानवी इतिहासात यापूर्वी कितीही मोठ्या साथी आल्या तरीही लोक व्यवहार कधीच बंद केले गेले नाहीत, किंवा लोकांना सामूहिक कैद करून ठेवले गेलेले नाही. त्यामुळे लॉगडाऊन हा , कोरोनाचा , फक्त एक गाव, एक जिल्हा, एक राज्य या पूर्ता उपाय होऊ शकत नाही. जर लॉगडाऊनचा परिणामकारक उपयोग घेऊन ही महामारी रोकायची असेल तर, संपूर्ण देशातील कोरोनाचा शेवटचा एक पेशंट , बरा होपर्यंत देश बंद ठेवावा लागेल, तसेच पुढील अनेक महिन्यासाठी सर्व जगातील देशाशी संपर्क तोडवा लागेल, तरच काही महिन्यांच्या अथक प्रयत्न नंतर लॉगडाऊन ने कोरोना मुक्त होता येऊ शकते.
पण हे करने शक्य आहे का?
म्हणून लॉगडाऊन जारी करणाऱ्यानी या सगळया बाबीचा विचार करून कोरोना रोकण्यासाठी लॉगडाऊन योग्य की अयोग्य हे ठरवावे.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
छंद जोपासण्यासाठी
क्लिक करून सामील व्हा!
??



