
काही घटना काहीतरी शिकवतात.
मागील वर्षी उन्हाळ्यात सिंधूदुर्ग , सावंतवाडी , गोवा , पणजी फिरायला पतीपत्नी गेलो होतो .
सुरूवातीला सिंधूदुर्ग बघीतला आणि दुसऱ्या दिवशी गोवा पणजीला गेलो . बिचवर गेलो , गर्दी खूप होती , गर्मी पण खूप होती , पाण्यात जाण्याचा मोह आवरता नाही आला म्हणून मग चपला , वगैरे पाण्याबाहेर ठेवले आणि पाण्यात गेले .
पाण्याच्या लाटा येत होत्या .चौफेर समुद्र पसरलेला होता पाहून आनंद खूप वाटत होता . बराच वेळ झाल्यानंतर पाण्याबाहेर आले तर चप्पल तीथे दिसली नाही माझे पती आणि मी दोघे पण शोधत होतो पण नाही सापडली , चप्पल नवीनच होती. आठवड्यापूर्विच नवीन घेतलेली होती .
खूप वाईट वाटले , मी माझ्यावरच रागावले आणि पतीवर पण चिडले .
आम्ही सगळीकडे शोधत होतो , माझ्या डोळ्यात पाणी पण आले , गाडी दूरवर उभी केली होती तिथपर्यंत बिना चप्पलच चालत जायच म्हणजे नको वाटत होतं .
तेवढ्यात तीथेच दोन्ही पाय नसलेला मनुष्य कुबड्यावर उभा राहून पैसे मागू लागला .
पण माझे लक्ष त्याच्या पाय नसलेल्या कुबड्याकडे होते , तो पैसे मागतोय हे क्षणभर मी विसरलेच , मला त्या क्षणी वाटले आपण चप्पल नाही म्हणून एवढं चिडलोय आणि याला तर दोन्ही पाय नाहीत , त्याला थोडे पैसे हातावर ठेवले , पण माझा राग कुठल्या कुठे पळून गेला .
यातून हेच कळाले आपण आपल दुःख बघत बसलो तर तणाव वाटतो , पण जेव्हा आपण आपल्यापेक्षा मोठे दुःख पाहिले तर तणाव विसरून दुसऱ्याला मदत करावी वाटते .
आपल्या जीवनातही अशा काही घटना घडलेल्या असतात त्यातून दुःख होते पण जेव्हा जेव्हा आपण आपल्यापेक्षा मोठ्या घटना समाजात पहातो तेव्हा आपल्याला आपले दुःख विसरून निश्चितच दुसऱ्याला मदत करावी वाटते .
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
छंद जोपासण्यासाठी
क्लिक करून सामील व्हा!
??



