Skip to content

मुलं, मोबाईल आणि अभ्यास!

मुलं, मोबाईल आणि अभ्यास!


विघ्नेश भोसले


पाल्य पालक मित्रत्वातुन समस्या सोडवुया.

मुल अभ्यास करत नाहीत ! मुल मोबाईल सोडत नाहीत ! त्याना कंटाळा येतो सतत तुम्ही त्यांच्या मागे कटकट करत असता, आपल्या अपेक्षांच ओझ नकळत त्यांच्यावर लादत असता त्याचा.

प्रत्येक मुल हुशार असत.प्रत्येकाची आवड नीवड वेगळी असते.आपण ते ओळखायला हव. त्याना कशामधे जास्त रस आहे ,ते कोणत्या गोष्टीबद्दल जास्त बोलत असतात.कोणत्या गोष्टी त्याना आवडतात? कोणत्या गोष्टींबद्दल त्याना रस नसतो ? हे सर्व प्रथम जाणुन घेण फार गरजेच आहे.

तुमच्यासोबत ते तेव्हाच संवाद सादतील जेव्हा तुम्ही त्यांच्या आवडीच्या विषयावर बोलाल (हा प्रत्येक माणसाचा स्वभाव गुण आहे त्याना त्यांच्याच आवडीच्या विषयामधे रस असतो )

सतत मोबाईल मधे गुंतुन राहणार्या मुलाना खर तर आपणच जबाबदार असतो,कारण मुल पालकांचाच मोबाईल अधीक वापरत असतात.
आपण दिवस भराचा किती वेळ मोबाईलवर घालवायचा याचा आराखडा तुम्ही तुमच्यासोबत मुलानाही पाळायची सवय करुन घ्यायला हवी .सर्व प्रथम तुम्हीच तुमच्यावर हे बंधन टाकने आवश्यक आहे.(टी.व्ही बाबतीत सुद्धा हेच नियम लागु आहेत.)

मुलांकडुन रागाने अचानक मोबाईल काढुन घेण्याने त्यांच्या माणसीकतेवर पऱीणाम होवु शकतो,त्यानाही वाटल पाहीजे की आपल्या घरात मोबाईल टी.व्ही. वापरण्याच्या वेळा आहेत.
त्यांच्या कला-गुणांसोबत आपणही जुळवुन घ्यायच.

त्याना तुमच्यात मित्रत्वाची भावना निर्माण होत नाही तो पर्यंत हळुवारपणे त्यांच्यासोबत वेळ घालवणे त्यांच्या आवडीत सामील होण महत्वाच आहे.

अभ्यासाच्या बाबतीत सर्वच स्मार्ट नसतात , हे सर्वप्रथम तुम्ही एक सजग पालक म्हणुन मानात पक्क करायला हव.

अभ्यासा बाबतीत आहे तेवढा अभ्यास टप्पयाटप्याने कंटाळा न येता सोबत बसुन हसत खेळत करुन घेवु शकता.(तुम्हालाही मजा येईल आणि मुलही छान अभ्यास करतात.) फक्त अट एकच मुलाना काही अडचण आली तर रागवायच नाही.कारण काही मुलाना वेळ लागतो एखाद उत्तर किंवा अभ्यास समजण्यात.

सर्वात महत्वाच मुलांच्या आवडत्या कलेत करीअर करण्याच्या वाटा तुम्ही त्याच्या सोबत मस्त शेअर करु शकता.मुलं मग आवडीने सर्व करु लागतात.मुलांच हे रुटीन या सर्वांची सवय पडली की तुम्हाला सुद्धा एक वेगळाच आनंद होईल.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.



Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!