Skip to content

काटेकोर स्वभावाची माणसं लईच डेंजर…

स्वतःला त्रास करून घेण्यापूर्वी


पौर्णिमा जगताप


मला असं वाटतं की आपण स्वतःला खुप पटकन माफ केलं पाहिजे कोणतीही चुक असली तरीही…कारण शिक्षा द्यायला तसे बरेच लोकं असतात. पण जर आपण माफ केलं तर जगणं त्यातल्या त्यात सोप्पं होईल.

काही लोकांना परफेक्शन ची सवय असते अगदी साध्या गोष्टींमध्ये सुद्धा… म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर…

झाडून काढल्यावर एक केस सुद्धा मागे न राहणे… बेडशीट टाकताना ते गादीला समांतर च टाकणे…जेवताना खाली अजिबात न सांडवणे अगदी भाताच एक शीत सुद्धा….त्यात जरा जरी कसूर झाली की या लोकांचा एक तर पारा हलतो किंवा ते स्वतःवर नाराज होतात.

त्यांना एकतर दुसऱ्याचं काही पटत नाही..त्यामुळे मदत घेण्याचा प्रश्नच येत नाही…सगळं स्वतःला करायचं असतं..पण सगळच जमेल असही नाही..त्यामुळे अजुनच स्वतःचा राग येतो.

आणि परिस्थीती तर पदोपदी परीक्षा बघत असते ..मनिध्यानी नसलेल्या अडचणी येत असतात…म्हणजे पोळ्या करत असताना गॅस संपणे….घरात असलेली पाण्याची टाकी भरायला लावल्यावर ती नको इतकी भरून वाहणे…जेवायला बसल्यावर किंवा मिक्सर लावणार इतक्यात लाईट जाणे…याला पण अशा लोकांची चिडचिड होते..अता या गोष्टी काय आपल्या हातात आहेत का…

मला सांगा आपण कुठे कुठे पुरणार…अहो माणूस म्हणून काही मर्यादा आपल्यालाही आहेत की नाही…मग… सगळं अपल्याच्याने व्हायलाच हवा असा अट्टाहास कशासाठी….

काही गोष्टी नाहीं होणार मनासारख्या….तर जशा होतील तशा होऊद्या…काही गोष्टींबाबत आपण उगाच काळजी करत असतो…ज्या की आपल्या हातात सुद्धा नसतात…

आणि काही वेळेस हातातल्या गोष्टी पण चुकू शकतात…

स्वतःला पटकन माफ करायला शिका.. मेंदुवरचा आणि मनावरचा ताण हलका होईल….शांत वाटेल…झाली तेवढी शिक्षा पुरे असा समजवा मनाला…

आपल्याला आपण नाही तर कोण माफ करणार ..कोण सांभाळून घेणार….तेव्हा काळजी घ्या….आणि आयुष्यातल्या चुकांचा आनंद घ्या…?



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??


छंद जोपासण्यासाठी

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!