
आपल्या मागे विचित्र बोलणाऱ्या व्यक्तींचं करायचं काय??
सुरेखा अद्वैत पाटील
आयुष्याच्या संकल्पना हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळया असतात… कुणाला कशाचे दुःख होईल किंवा कोणाबद्दल असूया वाटेल हे काही आपल्याला सांगता येत नाही… नवीन शेजारचे गोड बोललेत म्हणजे जुन्या शेजाऱ्यांबद्दल कुरघोडी करणारे. मी अशी माणसे पाहिले आहेत की आजवर फक्त वरवर गोड बोलून आपल्या पाठी काटा काढतात… आणि क्षणिक आनंद उपभोगतात.. कारण काय तर त्यांच्यापेक्षा आपली परिस्थिती सुधारलेली आपण मात्र आटोकाट प्रयत्न करूनही आहेत इथे आजवर जिथल्यातिथं आहोत..याचं शल्य यांना बोचतं.. त्यामुळे होतं काय त्यांचा हा वेळ नाही म्हटलं तरी आतून प्रतिस्पर्धा करताना वाया घालवतात… थोडक्यात दुसऱ्याच्या सुखामध्ये या लोकांना दुःख वाटत असतं…
कुटुंबाला हवा असलेला बडेजाव दाखवण्यासाठी प्रसंगी हे लोक कर्ज ही काढतात. किंवा तत्सम कुटुंबातील व्यक्ती गैरमार्गाला ही लागताना निदर्शनास येतं .. किंवा त्या स्वतः च म्हंटलं तर पुढाकार घेताना दिसतात.. काय तर म्हणे आम्हाला पण मोठा समजा किंवा पैसेवाला समजा… अशा लोकांनी ठरवलं तर हा वेळ स्वतःच्या प्रगतीसाठी खर्च करुं शकतील .दुसऱ्याची बरोबरी जरूर करावी पण ज्याची बरोबरी करणार आहात त्याचा संघर्ष बघा त्याच्यातील सद्गुण बघा व तसं होण्याचा प्रयत्न करा. उगीच दुसऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून क्षणिक सुखानं भारावून जाऊन .हाती काहीच उरणार नसतं. .
त्याऐवजी हा वेळ सत्कारणी लावला तर वरवर चांगलं वागण्या पेक्षा आतून पहिले स्वच्छ व्हावं … आणि स्वच्छ झाल्यावर नव्या जोमानं आपल्या कुटुंबासाठी नवीन उद्योग धंदा किंवा पार्ट टाइम जॉब करून ताठ मानेने पैसा कमवा.. आणि इतरांची बरोबरी करा.. यानं झाला तर नक्कीच फायदा त्यांचाच होईल… पण कुटुंबात गैर मार्गाने आलेला पैसा. सोबतच अपमान नालस्ती निंदा यालादेखील सामोर जावं लागतं… या गोष्टीचा तूर्तास त्यांनी विचार करून वागावं …
दुसऱ्याबद्दल नकार घंटा न वाजवता चांगले विचार ठेवले तरीसुद्धा आपल्या प्रगतीतील अडथळे निघून जातील.. दुसऱ्याचे पाय खेचून आपली दमछाक होणार हे मात्र खरं! सामाजिक जीवनात दिसणारा संघर्ष जात भावना यामुळे परस्परांवर चा विश्वास दुःख दैन्य आणि निसर्गनिर्मित संकटातून बाहेर पडण्यासाठी जात विसरून एकमेकांना केलेली मदत माणूसपणा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करून तुम्ही उच्च स्थानावर नक्कीच पोहोचू शकतात…
यामुळे परिस्थिती बदलण्याचे चित्र आपोआप समोर येईल… आणि स्वाभिमानाने नक्कीच जगता येईल….जसं कीं मांजराला वाटतं डोळे मिटून दुध प्यायलं म्हणजे कुणीच नाही बघणार. पण इथंच त्याची गल्लत होत असते..आणि मांजराला काठी बसतेच बसते. यांच्या अश्या उच्छनकूल वागण्यानं यांनाच भविष्यातील परिणामाला सामोरं जावं लागतं. व त्यावेळी कितीही सावरायचा प्रयत्न केला तरी त्यातनं बाहेर निघणं मुश्किल होऊन बसतं. कारण तोवर पाणी पुलावरून दुथडी वाहून गेलेलं असतं…संबंध संपुष्टात आलेले असतात. म्हणून जोवर या जगात आहात तोवर भरभरून आतून चांगलं वागावं, चांगलं जगावं व जगू द्यावं. .. कारण काय घेऊन जन्माला आलो.? आणी जाताना काय घेऊन गेलो.. याचा हिशोब चुकता तर. इथेच तर करायचाय.स्वच्छ प्रतिमा स्वच्छ मन कायम जपता नक्क्की येतं पण प्रयत्न आतून होणं गरजेचं.. आज कुणी गोड बोलतंय म्हणून आधीचे संबंध तोडावेत कीं आहेत ते संबंध जीवनभर सोबत ठेवायचेत? शेवटी निवड आपापली आहें..
यामुळे होणारा आपल्या आयुष्यावरील थेट परिणाम आपल्याला च भोगावा लागू शकतो. आपल्या विचारांना असलेली लवचिकता आपणच तपासून पाहावी. चांगले विचार चांगले कर्म ब्रह्मांडामधील एक अदृश्य शक्ती आपल्या चांगल्या गुणांनी आपल्या चांगल्या कृतीने विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करीत असते. यालाच आपण कर्माचा सिध्दांत म्हणूयात. संपत्ती गाडी आपण कधीही मिळवू शकतो. मित्र परिवार, आप्तस्वकीय ब्रह्मांडाकडे मागायला पाहिजेत. जे संबंध आहेत ते दृढ केले पाहिजेत…. हिच आपल्या जीवनातील खरी संपत्ती….म्हणूयात !.
बोध :संबंध जोपासा, आहें ती मैत्री घट्ट करा. आतून दुसऱयावर प्रेम करा. वरवर नको. ?
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
छंद जोपासण्यासाठी
क्लिक करून सामील व्हा!
??



