
तू दिवसभर घरी काय करतेस??
लीना देशपांडे
सुजीत कामावरून घरी आला तेव्हा घराचा दरवाजा सताड उघडा होता. दारात पोरांचे शूज आणी इतर चपलांचा खच पडला होता . शूज काढून हॉल मधे गेला तेव्हा टी .व्ही . चालूच होता , सोफा सेट वर पोरांची पुस्तकं , वह्या ,दप्तर विखुरलेली होती .जमिनीवर सगळीकडे खेळणी पसरलेली होती .
घरी आल्या आल्या ‘ बाबा , बाबा ‘ ओरडत येणारी पोरं आणी हातात थंड पाण्याचा ग्लास देणारी त्याची बायको शुभ्रा आज कुठेच दिसत न्हवती .त्याने पोरांना आणी शुभ्रा ला हाका मारल्या पण आतून काहीच आवाज येईना .
सुजीत धावत धावत बेडरूम मधे गेला तर तिथेही कुणीच न्हवता .बेड वरच्या चादरी विस्कटलेल्या , इतरत्र पडलेल्या उश्या , उघडलेलं कपाट आणी त्यातून पडणारे कपडे .सुजीत ने सकाळी आंघोळ केल्यवर बेड वर फेकलेला टॉवेल ही अजून तिथेच होता .
‘ अरे गेले कुठे सगळे ? ‘ वैतागून त्याने शुभ्रा ला फोन लावला तर फोन ची रिंग कपड्याच्या ढिगाऱ्याखालून ऐकू येत होती . शुभ्रा ने मोबाईल सुध्दा सोबत नेला न्हवता .
मोबाईल घेतल्या शिवाय आणी आपल्याला सांगितल्या शिवाय कधीच कुठे जात नाही शुभ्रा.ती नक्कीच किचन मधे असेल आपल्यासाठी काहीतरी खायला करत असेल .वेड्या आशेने तो किचन मधे गेला तर किचन ची ही तीच अवस्था होती . ओट्यावर भांड्यांचा ढिगारा , सिंक मधे खरकटी भांडी पडलेली होती आणी खाली सगळी कडे पाणी सांडलेले .
आत्ता मात्र सुजीत भलताच अस्वस्थ झाला. त्यच्या मनात भलते सलते विचार येऊ लागले .’ शुभ्रा आणी पोरांना कुणी पळवून तर नेले नसेल ना ??’ तो धावतच शेजारच्या काकूं कडे गेला तर त्यांच्या दाराला कुलूप होते .मग धावत खाली गेला तर सोसाइटी च्या मागच्या बागेत घसरगुंडी वर खेळत असलेली त्याची पोरं त्याला दिसली आणी त्याच्या जीवात जीव आला .पोरां जवळ गेला , पोरं नखशिखांत चिखलात लडबडलेली होती .
‘ आई कुठेय ? ‘ सुजीत ने पोरांना विचारले .पण त्यांना काहीच माहीत न्हवते .त्यांचे मख्ख चेहरे हेच संगत होते . पोरांना घेऊन घरी आला .पोरांना खरं तर आंघोळच घालावी लागणार होती पण फक्त हात पाय धुऊन द्यावेत म्हणून बाथरूम मधे नेले , तिथेही धुवायच्या कपड्यांचा ढीग पडला होता .
‘ शुभ्रा घर सोडून गेली की काय ? ‘ ह्या विचारानेच सुजीत ला घाम फुटला .हवा खायला म्हणून बाल्कनीत गेला , बघतो तर काय ? शुभ्रा डोळे मिटून आराम खुर्चीत बसलेली दिसली .
सुजीत ने आधी जाऊन शुभ्राचा श्वास सुरू आहे का ते बघितला . हुश्श । शुभ्रा जीवंत आहे ।
‘ शुभ्रा ‘ सुजीत ओरडला .शुभ्रा ने डोळे उघडले .
‘ काय झालं सुजीत ? ‘ शांतपणे म्हणाली .
आता मात्र सुजीत चांगलच चिडला होता .
‘ काय झालय म्हणून काय विचारतेस ‘ घर बघ आपला सुनामी आल्या सारखं दिसतय ? काय केलंस तू ?
शुभ्रा शांतपणे म्हणाली ‘ सुजीत तू नेहमी म्हणतोस ना की तू दिवसभर काय करतेस ?’
‘ आज मी खरंच काहीच केलं नाही ‘
सुजीत नी कपाळावर हात मारून घेतला .
हात जोडून शुभ्रा ला म्हणला ‘ बाई ग ! मला माफ कर .
ह्याच काय पुढच्या सात जन्मात तुला विचारणार नाही की तू दिवसभर काय करतेस ?
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
छंद जोपासण्यासाठी
क्लिक करून सामील व्हा!
??



