Skip to content

‘स्व-व्यवस्थापन’ करून आत्मविश्वास असा डेव्हलप करा!

स्व- व्यवस्थापन


श्रीकांत कुलांगे (मानसशास्त्रज्ञ)

वेबसाईट


आकाशला वेळेचे नियोजन करायला जमेनासे झाले त्यामुळे त्याची चिडचिड व काम वेळेवर होत नाही म्हणून चिंता. नुकतंच मॅनेजर पदी कामावर रुजू झाल्यामुळे इतरांचे पण व्यवस्थापन नीट होत नव्हते. साहजिकच वैतागून माझ्याशी बोलला की कसं करायचं? त्याची दिनचर्या ऐकून त्याचा प्रॉब्लेम समजला. आधी स्वयंपरिवर्तन आणि मग जगपरिवर्तन. त्याला स्वतः मध्ये बदल घडवायचा सल्ला दिला. कुठलीही गोष्ट जर व्यवस्थित करायची असेल तर आपण स्वतः व्यवस्थित असले पाहिजे. आकाश स्वयंव्यवस्थापनामध्ये कमजोर होता.

स्वतःचे व्यवस्थापन करताना आपल्या काही नकारात्मक मानसिकता कारणीभूत असतात म्हणून त्यापैकी काही पैलूंवरती चर्चा केली पाहिजे:

१. विस्कळितपणाची सवय- काम करायची यादी, वेळापत्रक, काय कुठे ठेवतो त्याची माहिती,आपला वेळ वाचवत असते.

२. मत्सर- ही भावना माणसाला वाळवी सारखी पोखरत असते. इतरांकडे लक्ष न देता, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे होते.

३. आळस – आजचे काम उद्यावर ढकलत राहतो. त्यामुळे पश्चाताप आणि निराशा हातामध्ये येते. व्यायाम, योग, मेडिटेशन करणे उत्तम.

४. विश्वास नसणे – विश्वासू व्हा आणि आपल्या कर्मचार्‍यांवर विश्वास ठेवा. स्वत: साठी स्वतः जबाबदार रहा.

५. संताप – हा आपल्या विनाशाचे कारण. सारासार विचार शक्ती गमावतो. सहकारीआपल्यापासून दूर जातात. शांती महत्वाची आहे.

६. सुडाच्या भावना – भावनांवर कंट्रोल ठेवणे कठीण नाही. प्रयत्न केल्यास तोच वेळ आणि उर्जा कामात खर्च करता येईल.

७. आपण आहोत तसे न स्वीकारणं – परिस्थितीचा स्वीकार हा आपल्या हातात असतो. मंथन करून वाईट सवयी कमी करा.
८.आभार- तक्रार करण्याऐवजी आभार मानले तर आपली उन्नती व्हायला वेळ लागत नाही.

९. संशयी वृत्ती – यामुळे आपला वेळ व्यर्थ जातो म्हणून अमूल्य वेळ खर्च करण्याच्या पाठीमागे पळू नका.

१०. प्रयत्नशील राहणं- हा एक स्वतःच्या व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग आहे एक रस्ता बंद झाला तर दुसरा तयार हवा.

स्वयं व्यवस्थापनामुळे आत्मविश्वास, चिकाटी, लवचिकता, संयम, समजूतदारपणा आणि भावनिक नियमन होते. हेच स्किल मग घरी, ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये, समाजकार्यामध्ये कामाला येते. जग बदलायला तुम्ही तयार असाल तर स्वतःला तयार करा. मनाची सकारात्मकता या ठिकाणी अत्यंत उपयोगी पडू शकते, पहा जमते का…



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??


छंद जोपासण्यासाठी

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!