
माणसाचे सगळ्यात मोठे शत्रू अहं आणि गैरसमज आहे.
माणसाचे सगळ्यात मोठे शत्रू अहं आणि गैरसमज आहे. कारण या दोन गोष्टींमुळे मैत्री नातेसंबंध दुरावतात. ते दुरावण्यात एखादी छोटीशी घटना सुद्धा कारणीभूत ठरू शकते. खरं तर सगळं कळत जाणवत, अगदी वाटतही की बोलून घ्यावं आणि मिटवावे सगळे गैरसमज पण नाही होत अस कारण तेव्हा मात्र अहं अडवतो. गैरसमज आणि अहं नेहमी हातात हात घालून फिरतात. अहं आला की तर्कवितर्क वाढतात आणि त्यातून गैरसमज होत जातो.
माणूस हा कळपात राहणारा समाजप्रिय प्राणी आहे पण तरी देखील तो त्याच्यातील अहंभावाने एकटा पडतो. त्याच्यावर मात करायला हवी तरच एकमेकांना धरून राहणं शक्य आहे. बरेचदा गैरसमज होतात आणि कुणीच कुणाशी न बोलल्याने ते वाढत जातात किंवा ते नातं तिथेच तुटत. अश्या वेळी थोडासा अहं बाजूला ठेवून जर त्या व्यक्तीच्या जागी जाऊन विचार करावा मग आपल्याही चुका आपल्याला कळतात. कुठेतरी एक छोटीशी चूक घडते आणि त्याच मोठं रामायणाच घडतं. खर तर काहीच गरज नसते पण घडत जात आणि आपण हतबलतेने बघत बसतो.
बरेचदा रात्रीची झोप लागत नाही कारण दिवस कामात कसाही निघून जातो पण दिवसभरात घडलेल्या घटना मात्र रात्र झाली की उफाळून येतात त्यात भूतकाळही डोकावू लागतो आणि झालेल्या चुका आठवून त्रास होतो पण माफी मागायची हिंमत होत नाही. किंवा बरेचदा वेळ निघून गेली असही वाटतं. पण माफी मागण किंवा माफ करण ही खूप छोटीशी गोष्ट असते पण त्यात खूप समाधान लपलेलं असतं हे ती कृती केल्यावरच कळतं. आणि जेव्हा ते कळत तेव्हा पश्चाताप होतो आणि त्यामुळेच मन पुन्हा पूर्ववत होतं. मोकळं वाटतं, दडपण निघून जात, आतून आनंद वाटतो कारण केलेल्या चुका अश्रूंमध्ये वाहून जातात. एक नवीन दृष्टी मिळते, तीच व्यक्ती नव्याने आवडू लागते, जवळीकता अजून वाढते, संबंध दृढ होतात.
एका छोटाश्या कृतीमुळे जर इतके छान फायदे होत असतील तर काय हरकत आहे ना ती करायला. मनात काहीही राग नसणे यालाच तर आत्मसुख म्हणत असतील. आपल्या मनात कुणाबद्दल काहीच असूया, राग, द्वेष नसतील मन साफ असेल तर तिथे शांतता समाधान वास्तव्य करतील. मनात जे कप्पे असतात त्यात या सगळ्यात जास्त ताण माफ न करणे व माफी न मागणे याच कृतीमुळे आलेला असतो.
जोपर्यंत आपली मानसिकता होत नाही तोपर्यंत एक उपाय हमखास उपयोगी ठरतो. रोज रात्री झोपताना त्या व्यक्तीची मनातल्या मनात माफी मागावी किंवा माफ करावं हे सतत करत राहावं आपल्या मनातील सल निघेपर्यंत काही दिवसांतच त्या व्यक्तीत झालेला सकारात्मक बदल तुम्हाला जाणवू लागेल त्यात तुमचा अहं देखील कमी झालेला असेल आणि तूम्ही समोर उभं राहून देखील माफी मागू शकाल. आणि त्यातून मिळणारा समाधान तुम्हाला एक नवीन नातंच नाही तर नाते जपण्याची कलाही शिकवेल.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
छंद जोपासण्यासाठी
क्लिक करून सामील व्हा!
??



