Skip to content

एखादा दिवस मोबाईल बंद ठेवून बघा.. स्वतःसाठी जरा जगा…

एखादा दिवस मोबाईल बंद ठेवून बघा …. स्वतःसाठी जरा जगा…


सौ.सुलभा घोरपडे


काही काळ कुटुंबात घालवा… गप्पा मारा… एखाद्या झाडाखाली निसर्गाच्या सानीध्यात जाऊन बसा…आणि निसर्गरम्य वातावरणात रममाण व्हायला कोणाला आवडणार नाही ? अगदी सर्वानाच निसर्गाचे आकर्षण असते.

निसर्गरम्य ठिकाणी फिरायला आपण गेलो तर मग आजूबाजूला लक्ष आपोआप वळते… छान दाट हिरवीगार झाडे…. पण फोटो काढायला मोबाईल नाही . किती वाजले बघावे म्हणल तरी ते सुद्धा हल्ली आपण मोबाईलमध्येच बघतो….

मग झाडाखालचे थंड वातावरण खूणवायला लागते… फुलांचा दरवळणारा सुगंध आनंद देतो…घोंगावणारा वारा शितलता देतो… खळखळ वाहणारी नदी ….. हिरवाईने नटलेले डोंगर अल्हाददायक वातावरण मनाला अलौकिक प्रसन्नता देतात . आरोग्य छान राहण्यास मदत होते.

निसर्गातील शक्तीची जाणीव होते.
पशू पक्षांचा किलबिलाट ऐकावा वाटतो एरवी त्याकडे आपले लक्षही नसते.
निसर्गातील संगीत ऐकायला येते.
डोळ्यांनी टिपलेले निसर्गाचे अलौकिक रूप तीथे रमण्यास भाग पाडते..

काही जुनी गाणी ओठावर येतात … निसर्गाचे सुंदर दृश्य आणि आयुष्यात घडलेले सुंदर अनुभव यांचा मेळ घालता येतो….
त्यावेळी एक समजते कि स्वतःला थोडा वेळ दिला…. आणि निसर्गाकडे पाहिले कि….असे वाटते … आपल्यासारखे जगात श्रीमंत कोणीच नाही …..

निसर्गाच्या सानीध्यात घालवलेल्या ,अशा छोट्या छोट्या क्षणानी … मन उत्साही होते .नवीन ऊर्जा मिळते .



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??


छंद जोपासण्यासाठी

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!