
सगळीच माणसं बोलत नसतात…आणि बोलली तरी सगळं बोलतीलच असही नसतं….
शिरीष जाधव
पुणे,
१ जूलै २०२०.
बोलणं म्हणजे संवाद.मनाच व्यक्त होणं.सहज आठवा आपण दुस-यांशी कसं बोलतो? बोलायचं म्हणून बोलतो? मनापासून बोलतो?गरज म्हणून बोलतो? पर्याय नाही बोलावच लागेल म्हणून बोलतो? नेमकं का बोलत असतो हे आठवलं की सगळं हळूहळू लक्षात येईल.
आपण जवळच्या नात्यातील व्यक्तीला बोलतानाही जर आपल्या बोलण्यात स्नेह अन् काळजी जाणवली तर साद घातलेली व्यक्ती आपल्या मनाच्या कंपनांना पटकन लिंक होते.
उदाहरण म्हणून घेऊ या एखादा प्रसंग. पत्नी /पती कामावरून घरी आलेला आहे त्यावेळी त्याने पत्नी / पती बरोबर आपल्या कार्यालयात झालेले ताणतणाव एकतर विसरून जावेत,बाजूला ठेवावेत, चेहऱ्यावर दिसू देऊ नयेत. स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवून फॅक्ट्स स्वीकारून त्या आपल्या मनात सकाळपर्यंत तरी बाजूला ठेवाव्यात. यामुळे घरात ताणतणाव कमी होईल.पण काही व्यक्तींना हे बाजूला ठेवणं जमणार नाही किंवा आवडणार नाही. त्यांनी मस्तपैकी गरम चहाचा घोट घेत आपल्या जोडीदाराला ,मित्राला मनातलं सांगून वर दोन शेलक्या शब्दांत व्यक्त व्हावं अन् सगळं बोलून मोकळं व्हावं.
आपण करत असलेला संवाद……?
सहज आठवा आपल्याला दिवसभरात वेगवेगळे फोन येतात.आपण असे फोन आल्यावर कसे रिअॅक्ट होतो.बायकोचा फोन आला तर काय बोलतो.?अरे कामात आहे मी?काय आहे काही अर्जंट आहे का?मीटिंग मध्ये आहे जरावेळाने बोलतो?काय कटकट आहे कशाला फोन केलास?ओके नंतर बोलतो? I am busy now call me latter?
असे आणि या प्रकारे आपले संभाषण असते.आता बायकोने का फोन केला असेल ते पाहील तर वेगळं लक्षात येते.आपल्या बायकोला आपण बिझी आहोत, कामात आहोत हे माहीत असूनही तिने फोन केलेला असेल तर आपण एखादे महत्त्वाचे काम असेल हे समजून घ्यायला हवे. संवाद करताना नात्याच्या निकटतेनुसार प्रेम,काळजी, आधार,विनोद आणि महत्त्वाचं म्हणजे मनाची संवेदना आणि अगतिकता लक्षात ठेवून आपण व्यक्त व्हायला लागलो की मग नात्यातील ओल कायम टिकून राहते.
या व्यक्त होण्याची दुसरी बाजू पण आहे.आपण पती बरोबर किंवा पत्नी बरोबर वागताना आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्या ,परस्परसंबंध आणि बोलण्यातून नात्याला जपण्यासाठी रोपलेला आधार आणि आश्वासकता ही आपल्या संवादाचा आत्मा असायला हवी. नेहमी बोलताना मग ते समोरासमोर असो अथवा फोनवर असो एकाच स्वरात बोलणे कधीही नसावे. शब्द आणि स्वरांची लय ही वेळ, काळ,प्रसंग आणि गरज यांना सांधणारी असली की मग व्यक्त होणे अगदी जोडीदाराच्या मनापर्यंत पोहोचते.
हे प्रत्येकाला जमेलच असे नसले तरी नात्याची ती गरज असते हे मात्र खरं. आयुष्य सुंदर आहे आणि खूप थोडे पण आहे.आपल्या अहंकाराला आपण जपत आणि वाढवत गेलो तर मग जगताना आयुष्य आनंदाने जगता येईलच असे अजिबात नाही.
एक वाक्य नेहमीच लक्षात ठेवावे.” प्रेम त्यागात आहे की भोगामध्ये ?
” आपण जगतानाच जेवढं निर्व्याज व्यक्त होऊ, लोकांवर प्रेम करु त्याच्या कितीतरी पट ते परत आपल्या पदरात पडतं हे खरं आहे. म्हणून मनाचा मनाशी संवाद करताना मनापासून व्यक्त व्हावं.
Copy right
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
छंद जोपासण्यासाठी
क्लिक करून सामील व्हा!
??



