क्षमा करा आणि विसरून जा….!!!
पुणे,
२ जुलै २०२०
शब्द म्हणजे आपलं व्यक्त होणं.शब्द आणि उच्चार यांच्या मदतीने आपण एकमेकांसोबत संभाषण करतो. शब्द बोलण्याची एक कला असते. आपण व्यक्त होण्याचा हा एक आविष्कार असतो.आपल्या मनातील भावना आपण व्यक्त करतो पण प्रत्येकाला शब्द वापरून मनातल्या भावना व्यक्त करायला जमेलच असे नसते.अशावेळी मग ती व्यक्ती व्यक्त होण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरते.कधी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर भावना बोलून जातात तर कधी कधी डोळ्यांतून आसवं आपोआप पडायला लागतात.
डोळ्यांतून आसवं ही गळतात आणि रक्ताचे थेंब देखील. मनाला वेदना झाली की आसवं पाझरतात आणि डोळ्याला जखम झाली की डोळे रक्त सांडतात. माणसं भावनाविवश झाली की नकळत रडतात आणि माणसं आनंदी झाली तरीही त्यांचे डोळे अलगत पाणावतात. आसवं आहेत म्हणूनच आपल व्यक्त होणे आहे.मनावर आलेल दडपण आणि वेदनेला आपण आसवांनी वाट करुन देतो. याचा अर्थ पटकन डोळ्यांत पाणी येणारी माणसं कमकुवत असतात असा नाही पण ती कोमल ह्रदयाची मात्र नक्कीच असतात.
माणसाने शब्द वापरताना खूप काळजीपूर्वक वापरावेत कारण एकदा उच्चारलेला शब्द परत कधीही मागे घेता येत नाही. शब्दांनी माणसाच्या काळजाला घरं पडतात असं म्हणतातच ते उगीच नाही. शब्दांनीच पेटतात घरे आणि शब्दंच विझवतात आगी पेटलेल्या मनांच्या असे त्यामुळेच तर म्हणतात. कधी कधी आपण रागाच्या भरात बोलून जातो.आपण काय बोललो हे त्यावेळी आपल्या लक्षात येत नाही. पण नंतर आपण शांत झाल्यावर आपल्याला आपली चूक समजते. आपण अशा वेळी ज्या व्यक्तीला बोललो आहोत त्या व्यक्तीच्या बाजूने विचार करत असतो.
अशावेळी ” Forgive and Forget ” हे शब्द खूप महत्त्वाची भूमिका वठवतात. समोरच्या व्यक्तीचे चूक असूनही ती साॅरी म्हणत नसेल तर घटना विसरून जा आणि आपले चुकलं असेल तर ते स्वीकार करून साॅरी म्हणा.दिलगिरी व्यक्त करा.
शब्द हे आपल्या आयुष्यात जगताना एकमेकांना संबोधण्यासाठी निसर्गाने दिलेली एक अमुल्य देणगी आहे.आपल्याला बोलता येते म्हणून आपण काहीही आणि कसेही बोलू नये.कारण आपण उच्चारलेला शब्द आणि धनुष्याची प्रत्यंचा ओढून सुटलेला बाण एकाच प्रकारचे काम करतात.एक माणसाच्या मनाचा वेध घेते तर दुसरी माणसाच्या जिवाचा. पण परिणाम एकच असतो.म्हणून शब्द जर चुकीचे बोलले गेले तर माफी मागून चूक कबूल करणे केंव्हाही चांगले कारण वेदना नाही पण वेदनेची तीव्रता आपण कमी करू शकतो.कारण या जगातील कोणतीही व्यक्ती वाईट कधीच नसते मात्र ते कोणत्या द्रष्टीकोणातुन एखादी गोष्ट पाहतात त्यावर ते ठरतं.
म्हणून शब्द नेहमीच जपून वापरावेत कारण ते फुकट जरी मिळत असले तरी त्यांचा वापर कधी कधी खूपच महाग असू शकतो.पण तो कळाला तरचं………!!!
Copy right
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
छंद जोपासण्यासाठी
क्लिक करून सामील व्हा!
??