मेडिटेशन vs चिंता
मीनल महेश झवर
मेडिटेशन आणि चिंता एकाच विषयावर होऊ शकते असं मला वाटतं…
ज्या गोष्टीशी आपण पूर्णपणे आपल्या आत्म्याने जोडल्या गेलो आहोत जे काम करताना आपण सकारत्मक आनंदी आहोत आणि ती गोष्ट करताना आपण थोडा वेळ सगळं विसरलोय अगदी स्वतःला ही मला वाटतं असं काही करणं म्हणजे मेडिटेशन , आणि अशी छान वाटणारी तुम्हाला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीची अति काळजी घेणे किंवा ती आपल्यामनासारखीच झाली पाहिजे हे असं झालं नाही तर..असं झालं तर…हे म्हणजे मेडिटेशन चे रूपांतर चिंता मध्ये करणे.…
आणि सकाळी उठून ध्यान अवस्था मध्ये श्वाशाकडेच लक्ष देणे म्हणजेच मेडिटेशन असं मला वाटत नाही..
मेडिटेशन कुठे ही कधी ही होऊ शकते..
उगवणाऱ्या सुर्यकढे बघत बसने आणि रात्री चंद्राला मनसोक्त न्याहाळणे म्हणजे मेडिटेशन.
आपल्या छोटयाशा बागेत आलेले फुलं आणि झाड बघणे त्यांना पाणी देणे त्यांना कुरवळणे म्हणजे मेडिटेशन.
चित्र काढताना किंवा भीमसेन जोशी ऐकताना इतकं गुंतने की त्या ठिकाणी बाकी काय होतंय कोण काय बोलतंय ह्याच भान नसणे म्हणजे मेडिटेशन.
एखादी भाजी बनवताना पुस्तक वाचतांना एखादा सिनेमा बघताना गाडी चालवताना कोणतीही अशी गोष्ट जी करताना तुम्ही त्याच्यात रममान होता अगदी तुमचा आत्मा कनेक्ट होतो, तुम्हाला आनंद ,आत्मविश्वास आणि शांत वाटत ते करणे म्हणजे मेडिटेशन…
पण ही प्रत्येक गोष्ट करताना मनात काळजी, राग, नकारत्मक विचार आले की ती चिंता..
गाडी चालवताना अकॅसिडेंट झाला तर…
चित्र काढताना बिघडला तर..
भाजी बनवताना कोणाला आवडली नाही तर..
म्हणजे मुळात नसलेले आणि शोधून काढलेले दुःख आणि चिंता…
काल त्यांनी असं म्हंटल होतं…
काल ते अशे म्हणणार..
ह्या भूत आणि भविष्यात झालेल्या आणि होईल ह्या गोष्टींचा स्वतःला त्रास करून घेणे म्हणजे जो आज आपण जगतोय त्याला चिंते मध्ये टाकणे…
प्रत्येक गोष्ट मनापासून आनंद घेऊन पोसिटीव्ह राहून करणे म्हणजे मेडिटेशन मग ती काही ही असो…
आणि अशी प्रत्येक गोष्ट करताना त्याची काळजी करणे निगेटिव्ह विचार करून ते काम करणे म्हणजे चिंता..
आता शांत राहून आनंदाने आलेला दिवस चांगल्या गोष्टींमध्ये घालवायचा की आलेल्या दिवसात प्रत्येक गोष्टीची कामाची चिंता करायची हे आपल्या हातात आणि आपल्या विचारांवर अवलंबून आहे..
प्रत्येक गोष्टीत आणि कामात समाधान आणि सुख मानने ज्याला जमले त्याला सांसारिक ध्यानस्थ होणे जमले ?
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
छंद जोपासण्यासाठी
क्लिक करून सामील व्हा!
??