Skip to content

आहे त्या गोष्टीत आनंद कसा घ्यावा?? वाचा पूर्ण लेख!

आहे त्या गोष्टीत आनंद कसा घ्यावा?? वाचा पूर्ण लेख!


सौ. सुलभा घोरपडे


काही वेळा आपल्याला वाटते , मी इतरांसारखा, हुशार , चाणाक्ष वगैरे नाही . मला कोणतीच कला येत नाही , माझी आर्थिक परिस्थिती , कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे , त्यातून मला वेळच नाही .
या सर्वातून मी मला वेळ कसा देऊ ?

खरंतर प्रत्येकाच्या जीवनात हे असंच असत , कुटुंब असते , जबाबदारी असते , नोकरी असते , त्यातूनच स्वतःसाठी वेळ काढायचा असतो .
आपण मोठ्या झालेल्या लोकांची नावे ऐकतो , अमिताभ बच्चन , लता मंगेशकर , आशा भोसले , बाबा आमटे , न्यूटन, सचिन तेंडूलकर वगैरे वगैरे यांच्यासारखे आपल्यात धैर्य नाही त्यामुळे मी काहीच करू शकत नाही .

पण आपल्याकडे जे नाही तेच आपण बघतो आणि जे आपल्याकडे आहे त्याकडे साफ दुर्लक्ष करतो.

तर जे नाही ते नसूदेत पण जे आहे त्याकडे तरी लक्ष दिले पाहिजे .
प्रत्येकात विचार करण्याची क्षमता असते हे तर नक्कीच आहे. त्याचाच वापर करत गेलो तरी स्वतःसाठी नवीन काहीतरी करून आनंद घेता येतो.

कोणतीही नवीन गोष्ट शिकलो की आपल्याला आनंद वाटतोच .
सायकल चालवताना , स्कूटर चालवताना तोल संभाळणे ,आणि चालवायला आली की आनंद वाटतोच की !

पोहताना पाण्यावर तरंगायला आले की जे वाटते तोच आनंद .
अगदी कोणतीही नवीन गोष्ट मग नवीन खेळ ,मोबाईलमधील नवीन गोष्टी , किंवा नवीन खाद्यपदार्थ कसे बनवतात , सुट्टीदिवशी नवीन ठिकाणी फिरून येणे , तेथील माहिती करून घेणे, आपल्या आवडीच्या विषयात आजून थोडे खोल जाणे .एखादा विषय समजून घेऊन त्या ज्ञानाचा आपल्या जीवनात वापर करणे त्यातूनही आनंद वाटतो .

जे काही करायचं ते आपल्याकडे जे आहे त्यातूनच करायचं , जे नाही ते नाही त्याचा विचार करण्यात वेळ कशाला घालवायचा.

शेवटी काय आपल्याकडे जे आहे त्यातूनही आंनद घेऊ शकतो आणि आनंद घेता घेता त्यातूनही एखादी आपल्याला नवनिर्मीती गवसते .



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??


छंद जोपासण्यासाठी

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!