Skip to content

मी माझी ‘फेव्हरेट’ आहे… मी आनंदी तर जग आनंदी!

मैं मेरी फेवरेट हूं


अस्मि(स्मिता)


जब वी मेट मधील करीना कपूरचा डायलॉग “मैं मेरी फेवरेट हूं” मला स्वतःला खूप आवडतो.

आपल्याला प्रत्येक व्यक्ती मधील काही ना काही गुण भावतात ना मग स्वतःकडे बघताना माणसाला न्यूनगंड का वाटतो? का वाटावा?? प्रत्येक व्यक्ती युनिक असते. अरे भगवान खुद सबको अपने हाथो से बनाता है और हम रोते रहते है

खरच इतकं अवघड का वाटत स्वतः वर प्रेम करणं. किती छान गोष्ट आहे ही. आरश्यात बघून आपण छान आहोत, आपल्यात किती तरी गुण लपलेत ह्याचा स्वीकार करायला हवा. आपणच आपल्या गुणांना ओळखलं नाही तर लोकांना आपल्यातील गुणांची ओळख कशी होईल?

बरं स्वतःवर भरभरून प्रेम करणं म्हणजे स्वार्थी हा अजून एक गैरसमज. आपल्याकडे जे असतं तेच आपण देऊ शकतो. कर्ज मागणारा पण तुमच्याकडे पैसे आहेत का? हे आधी बघतो,मगच मागतो. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकत नाही तर दुसऱ्यांना कस देणार? नाहीच देऊ शकत कारण ती गोष्ट तुमच्याकडेच नाहीये. रडत राहिल्याने प्रेम नाही सहानुभूती मिळते आणि ती क्षणिक असते. खूप साधं सोपं जगावं. जनरली लोकं दुसऱ्यांनी कस वागायला हवं हे ठरवताना दिसतात, आशा,अपेक्षांच्या गुंत्यात जखडून घेतात. वर त्याग वगैरे ते वेगळंच प्रकरण. पण एक साधा सोपा विचार आहे की आपण आपल्या स्वतःच्या किती इच्छा, अपेक्षा पूर्ण करतो? ह्या शरीरात एक जीव घेऊन जन्माला आलोय. कुठल्यातरी इच्छेमुळेच ना, मग आपण सतत दुसऱ्यांच्या इच्छा, अपेक्षा, त्यांच्यासाठी त्याग वगैरे करत बसलो तर आपल्याच शरीरात आलेल्या जीवाकडे कुणी बघायचं? सर्वांचं करता करता, जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता तो ही थकतच असेल ना?

कुणीतरी येऊन मायेने पाठीवर हात ठेवावा, गोंजारावं ह्या अपेक्षेत रडण्यापेक्षा स्वतःच स्वतः गोंजारून बघायला काय हरकत आहे? स्वतःला गोंजारायच म्हणजे दुःख उगाळायचं नाही तर दिलखुलास प्रेम करायचं, आरश्यात बघून स्वतःलाच, “हाय, कसली गोड दिसतेय” हे म्हणणं किती किती भारी वाटतं. साडी नेसून नटून थटून मुरडत बसायचं आणि कुणी दखल घेतली नाही की एव्हढंस तोंड करून ह्यांनी माझ्याकडे बघितलं पण नाही म्हणून वाईट वाटून केलेला सगळा मेकअप उतरून टाकायचा. कश्यासाठी?

किती छान दिसतोय आपण ह्या आनंदात राहणं फार अवघड नसतं. सुरुवातच स्वतःपासून केली की साखळी जोडली जाते. खेळताना बघा आपण एकाचा हात पकडून सुरुवात करतो आणि बोलता बोलता वर्तुळ पूर्ण होतं. म्हणजे स्वतःपासून सुरुवात केली तरच बदल घडणार.

फार सोपं आहे हे, आरश्यात बघून स्वतःच्या सौन्दर्याची पावती स्वतःला दिल्याशिवाय बाहेर बघायचंच नाही. आत्म्याला विकार नसतात वगैरे ह्या जड विषयात मी जातच नाही. माझा आत्मा पण ह्या शरीरात काही इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेला आहे आणि त्यालाही संतुष्ट होण्याचा अधिकार आहे. असा विचार प्रत्येकाने करावा. कारण अतृप्त आत्मे कुणालाच तृप्त करू शकत नाही फक्त भटकत राहतात.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??


छंद जोपासण्यासाठी

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!