Skip to content

कधी आपलं आयुष्य त्या सुंदर वळणावर जाऊन पोहोचेल!

मनाची व्हर्जिनिटी अन आयुष्याची उलथापालथ


विशाल लोणारी


माझ्या आयुष्यात माझं एकटेपण चितारले गेलं आहे. त्याचा मला दाह रोजच सोसावा लागतो. असा एकही दिवस जात नाही की जेव्हा मला या जाणिवेने दुःख झालं नसेल. एकटेपण असे आहे आयुष्यात की मी रोज व्यथित होतो. रोज स्वतःवर हसतो. दुःखी होऊन मनातल्या मनात रडतो. कधी आपलं आयुष्य त्या एका सुंदर वळणावर जाऊन पोहोचेल. कधीतरी मी ही इतरांच्या सारखा सुखी होईल याचीच चिंता मनाला पोखरत जाते. ही भयानक काळजी स्वतःची विक्राळ रूप धारण करून माझ्या पाठी बसली आहे. रोजचा दिवस येतो तेव्हा माझंही मन फुलांनी बहरलेले असते. पण शेवटी ते काट्यांनी ओरबडून रक्तबंबाळ होतं.

आयुष्यात स्वतःचं हक्काची व्यक्ती नसणे, ती न भेटणे, अनेकदा नकार भेटणे या सगळ्या प्रकारात येणारी निराशा एकसारखीच गंभीर आहे. या बाबींना कारणीभूत वैयक्तिक आयुष्यात जमा झालेले अनुभव होय. कुणी कसे दिसतेय, कुणी वरवर किती आकर्षक वाटतंय, याला अजूनही खूप महत्त्व जगाने देणं सुरू ठेवले आहे.

त्यामुळे एकदा दोनदा तीनदा नव्हे तर सलग सात दहा वेळा अशा प्रकारच्या निराशाजनक अनुभवातून गेल्यावर मनातून माणूस प्रचंड तुटतो.रडून मोकळं होण्याच्या पलीकडे गोष्टी जाऊन पोहोचल्या जातात. मन आनंदी राहणं हळूहळू विसरायला लागतं. अन, यावर मग तात्पुरते उपाय योजून सगळं काही ठीक चाललं आहे अशी आपण स्वतःचीच जाणीव करून घेतो. मेंदूला या तात्पुरत्या गोष्टींत थोडंफार सुख मिळायला लागलं की त्याची पुढे सवय तयार होते. या तात्पुरत्या गोष्टी कोणत्याही असू शकतात. अगदी एखादे व्यसनही त्यांचं एक उदाहरण सांगता येईल. वयात आल्यानंतर हवीहवीशी वाटणारी व्यक्ती तुमचं निव्वळ आकर्षण ठरते. त्यानंतर जेव्हा खरं प्रेम होतं पण आपल्या भारतीय समाज व्यवस्थेत त्याची पूर्णता होईलच असे नाही. त्यामुळे आणखीनच मनाची निराशा वाढत जाते.

किनाऱ्यावरील रेतीत कोरले निशाण नवीन येणाऱ्या लाटा पुसत जातात. पण, प्रत्येकवेळी लाट ओसरली की काहीसे नवं त्या किनाऱ्यावर पुन्हा आपण उमटवतो. मात्र, याहीवेळी जाणारी लाट मनाचा आनंद हिरावून नेते. किनाऱ्याजवळ असलेल्या दगडावर उभ्या एकट्या बगळ्याप्रमाणे एकलेपण आपल्याला अनुभवायला मिळते. आजूबाजूला अनेक आपली माणसे असूनसुद्धा केवळ कधी दिसण्यावरून, कधी स्वभावावरून, कधी कुठल्या आवडी निवडीवरून वय जस जसे पुढे जात राहते तसे मग आयुष्यात येणाऱ्या लोकांची दाटी होऊ लागते. नुसतीच साखळीच्यात साखळी गुंतवत जावी तशी माणसे खूप जोडली जातात पण ती आपलेसे करत नाही. कुणीच आपले कधी होत नाही. अशी परिस्थिती कधी न भरून येणारी दुभंगलेपण मनात तयार करते. कितीही खोटा आनंद थापला तरी चेहेऱ्या पल्याड, खोल डोळ्यात माणसाला त्याचं एकटेपण कॅन्सरसारखं पोखरत असते.

प्रेमाच्या मायेच्या आपुलकीच्या सद्भावनेच्या चिक्कार गोष्टी समोर आल्या. मन रममाण करणाऱ्या अनेक गोष्टी समोर येत असतील. तरी त्यातून मिळणारा आनंद, सुख अतिशय छोट्या स्वरूपाचा असतो. हे सगळी तात्काळ पण अल्प परिणाम करणारे घटक ठरतात. प्रेम न मिळाल्याने चिरकाल टिकल्या आसुसलेलेपणाला मग हद्द उरत नाही. अन, परिस्थिती मात्र , वेगळं विचित्र चित्र मांडत असते. प्रेम नसलेल्याचं आयुष्य सुरू असते. असे लोक ठीकपणे अभिव्यक्त होत असतात. हसत असतात. जर प्रेमाशिवाय राहणं हे एवढं एकच दुःख त्यांना असेल. इतर कोणत्याही प्रकारचा त्रास नसेल जीवन ते व्यवस्थित जगतात. त्यांच्या आयुष्यात जास्तीच्या तक्रारी नसतात. वरवर हसणारी व्यक्ती आतमध्ये खोलवर अगदी तुटलेली एकाकी पडलेली असते. या एकटेपणावरच्या तात्पुरत्या उपायांनी बेजार झालेली असते. त्यातील बेगडी,फोलपणा लक्षात राहूनसुद्धा तोच मार्ग पुन्हा पुन्हा अवलंबला जातो. यात विकृतीपासून विध्वंसकपणा, गुन्हेगारी प्रवृत्ती, विघातकी कृत्ये, मत्सर, द्वेष, ईर्ष्या अनेक मनाचे विकार जखडून जाऊ शकतात. त्यातून बाहेर काढणारं प्रेम अशाप्रकारे एकट्या असल्या व्यक्तीला वेळीच मिळायला हवे.

एकटेपण वयाच्या अगदी कोवळ्या टप्प्यापासून ते परिपक्व होणेपर्यंत ज्याच्या आयुष्यात सोबत करते. त्याला हळूहळू इतर त्याला आणखीन एकटे पाडणाऱ्या व्यक्तींचा राग येतो. दुस्वास होतो. नंतर मात्र स्वतःवर त्याचे भयानक चिडचिड, संताप होणं सुरू होते. हे मग जसे जसे त्याला नकार भेटत जातात तसे वाढते. केवळ प्रेमातील नकारांमुळे आयुष्याची उलथापालथ सुरू होते. शरीर व्हर्जिन असेल तर त्यावर मास्टरबेशन सारखे तात्पुरती सुखद उपाय जगात आहेत. लोक त्याचा अवलंबही करत राहतात. पण, मनाच्या व्हर्जिन असण्यावर असे वासनिक- क्षणिक उपाय उपयोगी पडत नाही. त्याला प्रीतिभरला दीर्घकाळ भावनिक सहवासच तारून नेऊ शकतो. शरीराचे उपाय क्षणिक असतात म्हणून त्यांची गरज सातत्याने होते. पण, मनाचे तसे नसते. ते एकदा कधी कुणावर प्रेम करू लागते तर ती व्यक्ती मात्र कदाचित सोडून गेली तर ते कलेकलेने कमी होत राहते. चंद्रासारखे. अन, कधीच मग त्याला पुनः आधार मिळाला नाही. जर मिळूनही त्याच्यातून निराशाच उदयाला आली तर मग आयुष्यात फक्त अमावशी अंधकार उरतो. ज्यात मग आयुष्य जर आजूबाजूच्या इतरही गोष्टीच्या असफलतेने व्यतीत होत असेल तर, जगण्यालाही अर्थ उरला नाही. अशा भावनांची मनात कोंडी होऊ लागते. ती कोंडी फुटणे खूप आवश्यक आहे. अनेकदा प्रयत्न करून त्या कोंडीचा बाहेर निघण्याची प्रयत्नकाष्टा होते. तरी, तो कोंडी फोडण्याचा लाईफटाईम व्हॅलीड पासवर्ड ठरत नाही. त्यामुळे या जगी अधुऱ्या प्रत्येक प्रेमाला पूर्णत्व लाभायला हवे.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!