
एकनिष्ठता
आज नुकतच एक पुस्तक वाचत होते त्यात एक माणूस बार मध्ये बसून भरपूर दारू पीत असतो. सोबत एका मित्राला सुद्धा बोलावतो, आणि सांगायला लागतो माझी बायको चांगली नाहीये.मित्र विचारतो तुला कोणी सांगितलं तर तो व्यक्ती सांगतो अमुक एक व्यक्ती म्हणाला ही चांगली नाहीये. मित्र त्याला समजावतो अरे लग्ना आधी तुला किती मैत्रिणी होत्या, लग्नाआधी तिला नसतील का मित्र ती आता आहे का तशी कोणाचं ही ऐकून तू का तुमचा संसार उध्वस्त करतोयस आणि मित्र निघून जातो.
ह्याच्यावरून मला अस वाटतं मी काल ज्या व्यक्ती सोबत होते, त्याला वचन दिल मी तुला सोडून कोणाकडेच जाणार नाही फक्त तुझी बनून राहील, पण परीस्तिथी अशी असते की त्या व्यक्तीला सोडावच लागतं. ह्याचा अर्थ काही लोक सर्रास असा लावतात की समोरच्या व्यक्तीने धोका दिला. धोका म्हणजे नक्की काय? लोकांच्या मनात धोक्याची संकल्पना किती चुकीची आहे नाही का?
काल मी ज्या व्यक्ती सोबत होते, ती आज नाहीये, पण मी जेव्हा त्या व्यक्ती सोबत होते तेव्हा दुसऱ्या कोणाकडे बघत तरी होते का? पण त्याच्या काही सवयींमुळे किंवा परिस्थिती मुळे आपण त्या व्यक्तीचा त्याग करतो, म्हणजे आपण एकनिष्ठ नाहीत का? आणि आपण कसे आहोत असं प्रशस्तिपत्रक देणारे तरी कसे आहेत मग?
काल आपण ज्या व्यक्ती सोबत होते त्याच्या सोबत आपले काही शारिरीक संबंध असतील तर लोक आपल्याला आपण कसे चुकीचे आणि वाईट व्यक्ती आहोत हे सांगतील. पण आपण त्या व्यक्तीसोबत तसे संबंध ठेवले त्याच्यामागे आपलं त्या व्यक्तीवर असणारं अतूट प्रेम दृढ विश्वास होता जो काही कारणास ढासळला ह्याचा अर्थ असा का की आपण “स्लट”आहोत, तर मुळीच नाही आणि आपल्याला अस प्रशस्तिपत्रक देणारे तरी किती धुतल्या तांदळाचे आहेत?
मला असं वाटतं जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे फक्त तुझीच बनुन राहील दुसऱ्या कोणालाच ते स्थान देणार नाही, हिच तर असते ना एकनिष्ठता. आणि आज काही कारणांमुळे दुसऱ्या सोबत आहे, मला माझा भूतकाळ छळत नाही. मी वर्तमानात मनाने आणि शरीराने पण त्याचीच आहे, मग ही एकनिष्ठता नाही का?
आणि नसेल तर मग आपल्या सोबत जे चुकीचं घडलं चुकीच्या व्यक्तींमुळे आपला दोष नसताना, मग आपण तो दोष घेवून समाजाने दिलेलं प्रशस्तिपत्रक घेवुन जगणं कितपत योग्य आहे??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


