Skip to content

आत्महत्येवर संशोधन केल्यानंतर मिळाले थक्क करणारे खुलासे!!

आत्महत्या….एक संशोधन!


संकलन-सुरज रणदिवे

9921084710


ज्याप्रमाणे वाढती लोकसंख्या ही एक समस्या आहे, त्याचप्रमाणे आत्महत्येचे वाढते प्रमाण ही देखील एक समस्याच आहे.

आत्महत्येचं वाढतं प्रमाण म्हणजे समाजाला लागलेली एक कीड! असं म्हणायला काहीच हरकत नाही.

जगात प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या या असतातच मात्र त्यावरील उपाय म्हणून आत्महत्या करणं हे योग्य नाही,कदापी नाही!आयुष्यात येणाऱ्या समस्या या आपली परीक्षा घ्यायला आलेल्या असतात. या परीक्षेत आपण प्रत्येकानं यशस्वीपणे उत्तीर्ण व्हावं हेचं आपलं एकमात्र ध्येय असायला हवं.

आत्महत्ये मागे सांगितली जाणारी कारणे-

1.वैवाहिक समस्या(घटस्फोट,मानसिक छळ.इ)
2.शेती पिकाचे नुकसान, नैसर्गिक आपत्ती, कर्जाचा बोजा, इ
3.बेरोजगारी
4.विध्यार्थी दशेत आलेलं शिक्षणातील अपयश.
5.नैराश्याग्रस्थता.
हे सर्व प्रमुख व आणखी अनेक कारणांमुळे आपल्या देशात आत्महत्या केली जाते, मात्र आत्महत्या करणारे हे विसरून जातात की आपल्या आत्महत्येनं ती समस्या न सुटता ती आणखीनच गंभीर बनते, शिवाय (स्वतःचा)जीव जातो हे वेगळचं.

काही आश्चर्यकारक बाबी(संशोधन)-

●जगात दरवर्षी सुमारे 8 लाख लोक आत्महत्या करतात.
◆भारत देशात जगाच्या लोकसंख्येच्या 17.5% लोक राहतात, तर जगात आत्महत्या करणाऱ्या लोकांत भारतीयांचे प्रमाण 17% इतके आहे.
●अग्नेय आशियातील देशांत भारत देशात सर्वाधिक आत्महत्या घडून येतात.
◆जगात घडून येणाऱ्या स्त्रियांच्या आत्महत्येत भारत देशाचा 6 वा क्रमांक लागतो.
●जगात घडून येणाऱ्या पुरुषांच्या आत्महत्येत भारत देशाचा 22 वा क्रमांक लागतो.
◆भारतात घडून येणाऱ्या आत्महत्येत 80% लोक शिक्षित असतात जे प्रमाण देशाच्या सक्षरते(74%) पेक्षा जास्त आहे.
●देशात चेन्नई शहरात सर्वाधिक आत्महत्या घडून येतात.

आत्महत्येचे प्रकार-

●विशप्राशन(33%)
◆फाशी(38%)
●आत्मदहन(29%)

आत्महत्येविषयक कायदा-

●आत्महत्येचा प्रयत्न करताना आढळल्यास 1 वर्ष सशर्त कारावासाची शिक्षा होऊ शकते.
◆त्याचबरोबर IPC 309 अंतर्गत दंडात्मक कारवाई होऊ शकते.

शपथ – मी भारत देशाचा एक सुजान नागरिक म्हणून मी शपथ घेतो की मी माझ्या आयुष्यात कितीही मोठी समस्या आली तरी मी त्या समस्येसमोर हार न मानता व आत्महत्या न करता त्या समस्येला धैर्याने तोंड देईल.

???जय हिंद.???

धन्यवाद.

उद्देश-संशोधन व ज्ञानप्रसार.

संदर्भ-इंटरनेट.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!