Skip to content

कुणी कान देता का? आजकाल लोकांना एकूणच घ्यायचं नसतं!

कुणी कान देता का?


विक्रम इंगळे

16 जून 2020


आजकाल मला असं वाटतं की ह्या जगात कानांची कमतरता आहे. असा कान मिळणं मुश्किल झालंय जो शांतपणे माझं बोलणं ऐकून घेईल. प्रत्येक कान कुठल्या तरी गोष्टीत, जरी अनावश्यक असल्या तरी, गुंतलेला असतो. का असं म्हणूया की आपण किती गुंतून गेलोय असे तो आपल्याला दाखवतो. आजकाल सांगणारे/ज्यांना काहीतरी बोलायचं आहे असे लोक आहेत पण त्यांचं ऐकणारे फारसे उरले नाहीत. आपण ह्यालाच सुसंवादाचा अभाव असे म्हणतो का?

बहुतेक जणांना हा एक न समजलेला अथवा न सांगता येणारा त्रास आहे. की, मला बोलायचं आहे पण ऐकून घेणारे कुणी नाही. ऐकायला कोणी नसणे ही एक समस्या होऊन बसली आहे. आजुबाजुला माणसे नसतील तर एक वेळ समजू शकतो पण आजूबाजूला सगळे असून सुद्धा, ऐकायला कोणी नाही ही वस्तुस्थिती आहे.

जसं ऐकणार्‍या कानांची कमी तशीच किंवा त्यापेक्षा जास्त कमी आहे ती समजून घेणार्‍या मनांची. शब्द कानातून जात नाहीत तर ते मनात कसे जाणार!

आजकाल लोक समजून घेण्यासाठी ऐकत नाहीत तर प्रतिक्रिया देण्यासाठी ऐकतात. पहिली दोन वाक्यं कानावर पडली की पुढचे न ऐकता मनात प्रतिक्रिया/उत्तर तयार असते. त्या उत्तरात लॉजिक पेक्षा बर्‍याच वेळा पूर्वग्रहदूषितपणा आढळतो. सांगणार्‍या व्यक्तीचा स्वभाव, मानसिक परिस्थिती लक्षात न घेता एक सल्ला देऊन टाकायचा, तू हे कर! किंवा तू हे करू नको. असं सांगण्यापेक्षा मला वाटते की एखाद्या गोष्टीचे/निर्णयाचे हे चांगले परिणाम अणि हे वाईट परिणाम असे सांगून शेवटचा निर्णय ज्या त्या माणसावर सोडून द्यावा.

शिवाय हे पण वाटत असतं की फक्त माझंच (सल्ला देणार्‍याच) ऐकलं पाहिजे कारण मी सांगतो तेच बरोबर आहे. ह्या सल्ल्यांमधे एक प्रकारचा अहंभाव असतो. त्यामुळे कधीकधी विचार येतो की इव्हॉल्यूशन अणि शास्त्रीय प्रगती मुळे माणसाला शहाणपण आले असेल पण तो जास्त असंवेदनशील (इनसेंसेटिव्ह) झालाय!

मन संवेदनाहीन व्हायच्या मागे कारण ‘मला काय त्याचे’ ही बेफिकीर वृत्ती असेल का! का ह्या जीवघेण्या अनामिक चढाओढीत माणसाला स्वतःला एवढं बोलायचं असतं की त्याला इतरांचे ऐकण्यात इंटरेस्ट नाही!

किंवा अशी वृत्ती झाली असेल, माझं कुणी ऐकत नाही तर मी तरी कशाला ऐकू! किंवा असही असेल ना, की सांगणार्‍या माणसाला काय सांगायचं हेच नीट सांगता येत नसेल! कारण काहीही असुदे, कनेक्ट तुटत चालला आहे, हे मात्र खरे. ऐकणारे कान अणि समजून घेणारी मनं, मिळणे कठीण झाले आहे हे पण खरे!!

मन इनसेंसेटिव्ह होण्यामागे मला वाटते की आजकाल लोक स्वतःला अणि इतरांना नको तेवढे जज करायला लागले आहेत. अणि ते सुद्धा चुकीचा क्रायटेरिया लावून.

दुसरं म्हणजे, आजकाल बहुतेक लोकांची मतं ही वस्तुस्थितीशी निगडित नसतात. अणि महत्वाचे म्हणजे, आजकाल समजून घेणे, ज्ञान अणि माहिती अणि व्यक्ती/गोष्टी/घटना स्वीकारण्याच्या कल्पना बदलल्या आहेत. त्यातच भर घातली वेळेच्या अभावाने!

नसतो असा नाही पण जातो कुठे हाच सगळ्यांना प्रश्न आहे!!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!