Skip to content

व्यक्त व्हा, मन मोकळे व्हा, पण कोणाकडे ?

व्यक्त व्हा, मन मोकळे व्हा, पण कोणाकडे ?


वैभव राऊत


सुशांत च्या आत्महत्येने सर्व सुन्न झाले आहेत. त्याच्या अश्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे . सुशांतच्या मृत्यूचे पडसाद सोशल मीडियावर सर्वात जास्त उमटले. अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली काहींनी त्याला कायर म्हणून हिनवले. आत्महत्या हा पर्याय योग्य नाही हे सर्वमान्य आहे पण त्याच्या मृत्यूनंतर त्याला कायर म्हणून नक्की आपण काय साध्य करणार आहोत.

सुशांत चा मृत्यू कसा झाला त्याला कोण जबाबदार याच्या विषयी अनेक तर्कवितर्क लोक आपापल्या परीने लावत आहेत. खरे काय आहे ते तपासाअंती कळेल किंवा कळणार हि नाही कारण सुशांत अनेक उत्तरे अनुत्तरित ठेवून गेला आहे.

तर मानसिक तणाव आणि त्यावरील उपाय हा नक्की खूप गंभीर विषय आहे. कारण मानसिक तणावाखालील व्यक्ती सहज रित्या ओळखणे शक्य नाही. ह्या घटने नंतर अनेकांनी मन मोकळे करा, मित्रांसोबत चर्चा करा, जर कोणी संपर्कात नसेल तर संपर्क साधा अश्या अगदी चांगल्या गोष्टी सांगितल्या . हेतू अगदी शुद्ध आहे आणि त्याने कित्येकांना फायदाच होईल. पण आपली समस्या नक्की कोणापुढे मांडायची हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. अनेक मानसिक तणावाखालील लोकांना हा देखील न्यूनगंड असतो कि आपल्या समस्या जर चव्हाट्यावर आल्या तर त्यांचा बाजार मांडला जाईल, आपले हसू होईल.

लोक आपल्या कडे एक नकारात्मक व्यंक्तीं म्हणून पाहू लागतील कदाचित आपल्या पासून दूर पळतील.

वरील सर्व प्रश्न हे त्याला त्या तणावाखाली सुद्धा भेडसावत असतात. तर मुद्दा असा कि, आपले मन मोकळे करायला योग्य व्यक्ती कशी शोधणार? असा कोण असेल जो आपले प्रश्न अगदी स्वतःचे समझून आपल्याला मार्गदर्शन करणार? नको नको वाटणाऱ्या ह्या जीवनात आपल्याला आशेचा किरण दाखवणार. ह्या सर्व प्रश्नाने त्याचे डोके अजून चक्रावून जाते.

हल्ली आपण पाहतो आजूबाजूला सर्व जग हे शोऑफ वर सुरु आहे. त्यात सोशल मीडिया ने अजून भर टाकली आहे. आपला वर्गमित्र आपले सवंगडी किती खुश आहे आणि आपण कोठे अडकलो आहे हि भावना सुद्धा मानसिक तणावाला आमंत्रण देते. तर सोशल मीडिया वर व्यक्त होताना आपण देखील काही खबरदारी घेणे योग्य ठरेल. सोशल मीडिया हे एकमेकांना जोडण्याचे साधन आहे हे समजून घेतले पाहिजे.

तर मानसिक तणावाखाली असलेल्या व्यक्ती ला स्वतःला आधार देणारी व्यक्ती शोधणे सुद्धा एक खूप मोठे आव्हान आहे. त्यावर एकच उपाय आहे, कोणी जर तुमच्या जवळ व्यक्त झाले कींव त्याने तुम्हाला त्याचा खाजगी प्रश्न तुम्हाला सांगितले तर त्याच्या ह्या विश्वासाचा आदर करा. त्याच्या प्रश्नांना चव्हाट्यावर मांडू नका. त्याला सर्वतोपरी मदत करा. आणि जर जमत नसेल तर निदान त्याच्या प्रश्नांविषयी गोपनीयता पाळा.

एकमेका साहाय्य करू सर्वाना सोबत घेऊन जगू..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!