Skip to content

जिंदगी प्यार का गीत है..

जिंदगी प्यार का गीत है..


अमिता भिलारे लोणकर


काल टीव्हीवर बातमी पाहिली सुशांत सिंग राजपूतने राहत्या घरी आत्महत्या केली, विश्वासच बसेना दोन दिवसांपूर्वीच त्याचा एम एस धोनी चित्रपट पाहिला ,खूप शिकण्यासारखे आहे चित्रपटांमधून आणि सुशांतने खूप चांगल्या प्रकारे भूमिका निभावली .छिछोरे फिल्म मधून सुद्धा खूप छान संदेश दिला आहे सुशांतने, अक्सर हम हार-जीत सक्सेस ओर फेलियर के बीच इस तरह से फस जाते है कि भूल जाते है कि जिंदगी मे सबसे जरुरी होती है जिंदगी और आज वही जिंदगी से हार गया कारण काहीही असू शकते….

या जगात दुःख ताणतणाव अडीअडचणी वेदना कुणाला नसतात? आपला जन्मच मुळी अडचणीतच झाला आहे जन्माला येताना रडतच आलो आहे. जीवन म्हटली की यश-अपयश हार-जीत up down आर्थिक, मानसिक ,शारीरिक त्रास, हाल-अपेष्टा ,मान-अपमान हे सगळं आलंच, पण या सगळ्यातूनही आपल्याला आपली मानसिक स्थिती उत्तम ठेवता आली पाहिजे .गेलेले दिवस भूतकाळ व भविष्यकाळ पुढची चिंता यामध्येच आपण जगत असतो, पण आज मध्येच जगून घ्या, मागची आठवण नको पुढची चिंता नको ,जे काय जगायचे ते आज आत्ताच हा क्षण आपल्या हातात आहे, उद्याची शाश्वती नाही देऊ शकत कोणीही .

एक दिवस सगळं इथेच सोडून जायचे पण आपण अडकलोय पैसा, प्रॉपर्टी, गाडी ,बंगला प्रतिष्ठान मी का कमीपणा घेऊ? मी का फोन करू? मी का बोलू? अगदी आपला अहंकारही हे काहीच सोबत येणार नाही. येणार आहे आपण दुसऱ्याच्या हृदयात तयार केलेली आपली जागा, माणुसकी, इतरांवरच आपलं प्रेम ,आपल्या परीनं केलेली दुसऱ्याला मदत, कोणी अडचणीत असताना मी आहे काळजी करू नकोस हे धीराचे दोन शब्द.

वर्तमानात जगा भरभरून, अगदी लहान मुलासारखं स्वच्छंदी, आनंदी कोण काय म्हणतं याकडे लक्ष न देता हसू आलं तर हसा ,रडू आलं तर रडा, मोकळे व्हा चिंता, राग, द्वेष ,काळजी मनात साठवू नका नाहीतर मनाला खूप त्रास होतो मानसिक त्रास हा शारीरिक त्रासापेशा ही भयंकर आहे मानसिक त्रासावर ही उपाय आहे सायकॅट्रिस्ट कडे जाऊन योग्य गोळ्या-औषधे वेळेच्या वेळी घेतली तर हा आजार पूर्णतः बरा होतो शरीरा सारखं मनही आजारी होतं त्यावेळी त्याला योग्य उपचारांची गरज असते जवळच्या मित्रमैत्रिणींशी बोला वाटल्यास आपल्या आई-वडिलांशी प्रॉब्लेम शेअर करा संगीत ऐका योगा करा ध्यानधारणा करा कुणी जवळ नसेल तर एका कागदावर पेन ने लिहून काढा मनातले विचार भावना पण मोकळे व्हा तेही नसेल जमत तर कुंडीतल्या रोपाकडे बघून त्याच्याशी मनातलं सुख-दुःख शेअर करा किंवा एखाद्या आपल्या आवडत्या निर्जीव वस्तू कडे घड्याळ, पेन ,वही, कॉफीचा मग अगदी काहीही त्या वस्तूकडे पाहून आपलं मन मोकळं करा.

धावत्या युगात आपणही धावतोय पण मनाला समाधान लागेल अशा छोट्या गोष्टी दिवसातून पाच ते पंधरा मिनिटे वेळ काढून आवर्जून करा
श्री रामदास स्वामिनी मनाचे श्लोक मध्ये म्हटल्याप्रमाणे
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे.

मरण तर येणारच आहे पण मरण्याच्या अगोदर जीवन जगायला शिका मरण कसे कुठे कधी आपल्याला कवेत घेईल सांगता येणार नाही जीवन हे परमेश्वराने माणसाला दिलेलं मोठं गिफ्ट आहे त्यामुळे जे नाही त्यासाठी रडण्यापेक्षा जे जवळ आहे त्यात आनंद मानून जगण्याची कला शिका प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायचा आणि होता होईल तेवढा तो समोरच्याला ही द्यायचा.

सौतन चित्रपटातल्या एका गाण्यात खूप खोल अर्थ सांगितला आहे जीवनाबद्दलचा, जिंदगी प्यार का गीत है इसे हर दिल्को गाना पडेगा फुल जीवन मे गर ना मिले तो काटो से भी निभाना पडेगा.

असंच काहीस आयुष्य आहे पण एक खरच एक गुणवान कलावंत आपल्याला आयुष्याचा अर्थ चित्रपटातून सांगून गेला पण जीवनाच्या चित्रपटात तो का हरला ही कधीही न सुटणार कोडंच!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!