Skip to content

इकडचं तिकडं करणाऱ्यांपासून स्वतःची सुटका अशी करा!

Gossiping …….


अर्चना दिनेश पाटील

@आरसा मनाचा ससा


आज मी तुमच्या साठी एक भन्नाट विषय घेऊन आली आहे …जे तुमच्या आमच्या जीवनात घडत पण आपण इतरांनी सांगितलेल्या गोष्टींवर तासं तास विचार करतो ..मानसिक स्वास्थ्य खराब करतो . ते काही वेगळं नसतं..अनेक लोक एकमेकांच्या बद्दल सांगत असतात ….गंमत फक्त एवढी काही त्याला चर्चा म्हणतात तर काही चुगली ….

आपल्या आयुष्यात असे काही लोक जोडले गेलेले असतात जे सतत एकच काम करत असतात ..दुसऱ्याचं तुमच्या जवळ सांगायच आणि तुमचं दुसर्यांजवळ…. तेही त्यांच्या सोईने , म्हणजे कोण आपल्या बद्दल काय बोललं हे ते आपल्याला सांगतील , पण ते तिथं आपल्या बद्दल काय बोलून आले ते नाही सांगणार …

मग जे विचारी सद्सद्विवेक बुद्धीने वागणारे असतात ते त्या गोष्टी अथवा चुगली ,अथवा चर्चेला फार काही प्राधान्य देत नाही ..परंतू काही असतात ज्यांच्यावर या गोष्टींचा प्रभाव पडतो व त्या पद्धतीने ,त्या व्यक्तीच्या सांगण्यातील सत्यता न पडताडताच ते त्यावर विश्वास ठेवून इतरांबरोबर नाते संबंध अथवा व्यक्ती संबंध खराब करतात ..

मग असे अनेक लोक आपल्या आजू बाजूला असतात … रोज कोणी ना कोणी काही तरी सांगत ..आता सांगतात म्हणजे तुम्ही एकूण घेतात म्हणून सांगणारे सांगतात हे नाकारता येणार नाही … आणि आपण त्या इतरांनी सांगितलेल्या गोष्टींवर तासं तास विचार करतो ..मानसिक स्वास्थ्य खराब करतो . कारण आपली बुद्धी व विचार तसेच दृष्टीकोनाची दिशा ही इतरांच्या सांगण्या व बोलण्यावर आपण वागत असतो ….म्हणूनच ज्या दिवशी तुम्ही इतरांच्या कडून एकूण वागायचं थांबवाल त्या दिवशी तुमची दृष्टी ,तुमचे विचार व तुमचं वागणं हे तुमचं असेल …

आता बघाना प्रत्येक वेळी कोण आपल्या बद्दल काय आणि कसा विचार करतो याचाच आपण विचार करत बसलो तर आयुष्य फक्त आणि फक्त त्यातच संपेल ..

कारण असंख्य लोक असंख्य विचार , कोणाला काय आवडेल कोणाला काय नाही कसं ठरवणार .कोण कसा विचार करेल याचा नेम नाही ..

तेव्हा प्रगती साधायची असेल , यशस्वी वाटचाल करायची असेल आणि सर्वात महत्वाचं डोक्याला शांतता हवी असेल तर अनावश्यक चर्चा व विषयांवर वेळ वाया घालवणे थांबवा ….म्हणजे तो वेळ योग्य विचार ,योग्य गोष्टी व योग्य व्यक्तींना द्या आणि परिणाम बघा …

मग तुम्ही म्हणणार कोणी ही काही ही बोललं तर कसं दुर्लक्ष करायचं ..जर तुमचा तुमच्या वागण्या ,बोलण्या व व्यवहारा तसेच तुमच्यातील नाते संबंधावर विश्वास असेल तर इतरांच्या पावती ची काय गरज …चांगली दिली तर स्वीकारा , वाईट दिली तर दुर्लक्ष करा… कारण तुम्ही जरा क्षण भर विचार केला की लक्षात येईल की आपल्या आयुष्यातील निम्मा वेळ हा चुकीच्या व्यक्तींना ,विषयांना ,गोष्टींना ऐकण्यात व बोलण्यात जातो …

म्हणूनच असे अनावश्यक निरोप व माहिती देणाऱ्या लोकांच्या पासून व विषयापासून थोडं लांबच रहावे . कारण हे gossiping करणारे लोक करमणूक म्हणून याचं त्याच्या जवळ ,त्याच याच्या जवळ सांगतात पण त्यातून अनेकांची आयुष्य उध्वस्त होतात याचं त्यांना गांभीर्यच नसतं .. म्हणून सहज म्हणून गोष्टी संगणाऱ्यांना सहज आयुष्यात येवू देऊ नका ….

तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा , चर्चा विषयाला धरून करा व्यक्तीवर नको …..बुद्धी ,पैसा व वेळ या अमुल्य गोष्टी आहे तेव्हा त्या योग्य गोष्टीवर खर्च केला तर फायदा नाही तर नुकसानच नुकसान ..

gossiping म्हणजे दलदल आहे ..एकदा अडकलात तर अडकतच जाणार ..खरं खोटं करण्यात आयुष्य संपेल पण आरोप संपणार नाही ..

तेव्हा शक्य झाल्यास तुम्ही या gossiping च्या दलदली पासून लांबच रहा …बाकी मातीत राहतो म्हंटल्या वर थोडा फार चिखल तर उडणारच …माणसात राहतो तो तर थोडे फार चांगले वाईट प्रतिक्रिया तर येणारच ..

“बघा पटलं तर ठीक नाही तर द्या सोडून ”



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!