Skip to content

समाजाला Accept करा, समाज तुम्हांला Accept करेल!

समाजाला Accept करा, समाज तुम्हांला Accept करेल!


Adv. Sachin Shinde

(Marriage Counselor)


MENTAL HYGIENE ह्या विषयाशी निगडित ‘MIND@PEACE’ ह्या सदरा खाली आजचा लेख.

Now what is Social Acceptance….?
बऱ्याच वेळेला आपण बघतो आजू बाजू ला, कि कोणी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती सारखी वागायचं, बोलायचं, त्याच्या सारखे पेहराव करायचा प्रयत्न करत असते. आणि दुसरे कशाला… आपण पण कधी कधी असे करतो किंवा वागतो…पण असं करत असतांना आपण आपला स्वतःचा अस्तित्व विसरतो का….? जे आपण स्वतः आहोत, आपला स्वभाव, आपले वागणे, आपले कपडे घालायची style, आपली खाण्यातली आवड …. वगैरे वगैरे …. दुसऱ्यांना खुश करायच्या नादात, आपलं आनंद कशात आहे तेच आपण विसरून जातो.

ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर ….समजा आपल्याला कोणा एखाद्या अती श्रीमंत माणसा कडे पार्टी ला जाण्याकरता आमंत्रण आले तर आपली पहिली धडपड काय असते….? …हां बरोबर…कुठले कपडे घालावे…? Western का Traditional …? कुठली आणि कशी चप्पल, Sandle, बूट वगैरे….काय घालावे …? जेणेकरून आपण त्या Crowd मध्ये उठून दिसावे किंवा तिथल्या लोकां मध्ये Suit व्हावे … काय गम्मत आहे नाही.. आपण हा विचार कधीच करत नाही, कि मला तिथे दोन ते तीन तास Party मध्ये आरामात आणि माझ्या Comfort Level वरती वागता यावं, म्हणून मी काय घालावे किंवा काय पेहराव करावा…? म्हणजे बघा हां, मी जर का तब्बेयेतीने जाड आहे तर मी काही तरी हलकं फुलकं सुती ड्रेस घालावा ज्या मध्ये मला अराम वाटेल, मी मोकळे पणाने वावरू शकेन, कुठले हि शरीरावर आणि ओघाने मनावर ताण न येता मनसोक्त गप्पा मारावे, पोट भर निवांत जेवण करता यावे…etc….

पण हेच जर का मी त्या लोकांना दाखवण्यासाठी किंवा त्यांचे Locality ला suit होण्यासाठी काही तरी असे घातले, जे मला अजिबातच suit होत नाहीये, म्हणजे काही तरी अंगाला चिटकून, घट्ट कपडे, उंच टाचेची Sandle, ज्या मध्ये मला नीट चालता हि येत नाहीये …तर मी ती पार्टी मनापासून Enjoy करू शकेन का…? मला तिथे मोकळ्या पणाने वावरता येईल का…? नाही…
मग हा सगळा ताम झाम कशा साठी…? कोणा साठी…? का आणि काय कोणाला दाखवायचे आहे आपल्याला ..?
“Can’t I be just like what I Am….?”
This is what we can call as Social Acceptance !
Ability to accept or to tolerate differences and diversity in other people or groups of people.
मान्य करू यात कि आपण इतरां पेक्षा वेगळे आहोत. किंबहुना इतर माझ्या पेक्षा वेगळे आहेत.

Each individual is different and Unique in himself or herself !

मग एकमेकांन सारखं वागायचे, दिसायचे अट्टाहास का…? आणि ह्या नादात आपण काय आहोत, आपली ओळख काय, आपले अस्तित्व काय, हे आपण का विसरतो … आपल्याला समाजा मध्ये स्थान हवे आहे, तरी गरजेचे नाही, कि जे आपल्याला जमत नाही ते करावे फक्त लोकांना दाखवण्यासाठी, किंवा आपण जे नाही ते सिद्ध करायचा हट्ट करावा … त्या पेक्षा मी जे आहे तसाच समाजाने माझा स्वीकार करावा असा प्रयत्न करायला काय हरकत आहे…? माझ्या मध्ये ती धमक असेल, आणि मला मी आहे तशी समाजा मध्ये मुक्त पणे वावरता येत असेल, तर मी समजेन कि समाजाने माझा , मी आहे तसा स्वीकार केला.

“I am accepted by my Society as I am because I have accepted my Society as it is…”

हां जिथे काही अडचणी असतील, काही कमी असेल तर आपल्या प्रयत्नाने ते बदलायचा प्रयत्न नक्की करावा. पण समाजाला विश्वासात घेऊन एक मेकांच्या साहाय्याने केला तर परिणाम नक्कीच उत्तम होतात.

“एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ….”

एक छोटं सं उदाहरण देते आणि माझं म्हणणं संपवते….. माझ्या ओळखीत एक बाई आहेत ज्या कधीच कोणा कडे बघून हसत नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावर कधीच स्मित हास्य नसते त्या मुळे बाकीचे त्यांच्या आजू बाजू चे कोणीच त्यांच्या कडे बघून हसत नाहीत किंवा त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत नाही. त्यांची समाजा मध्ये अशीच ओळख निर्माण झालीये कि त्या कोणाशी बोलत नाही . तर तात्पर्य काय कि आपण समाजाला जे देऊ समाजा कडून आपल्याला तेच परत मिळेल…

“What you give will Come Back to you like a boom rang”…..

सर्कस मध्ये जेंव्हा एक व्यक्ती चेहऱ्यावर जोकर चा मुखवटा लावून येतो तेंव्हा त्याला बघू सगळे हसायला लागतात. त्या मुखवट्या मागच्या माणसाच्या डोळ्यात पाणी असले, तरी ते कोणाला दिसत नाही. तसेच आपण समाजा मध्ये आपल्या चेहऱ्यावर जो मुखवटा लावून फिरू, त्याच्या वरून लोक आपल्याला ओळखतील… त्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही होऊ शकतात. बऱ्याच वेळेला आपल्याला चेहऱ्यावर नक्कीच मुखवटा लावून वागावे लागते. म्हणजे बघा हां…

कित्त्येक वेळेला आपल्या समोर आपल्याला न आवडणारी व्यक्ती येते, तर अश्या वेळेला आपण आपला नावडते पणा उघड उघड पणे आपल्या चेहऱ्यावर दाखवले तर, आपण नकळत पणे Negative Waves Spread करू. पण म्हणून आपल्याला कधी कधी चेहऱ्यावर कृत्रिम हसू किंवा स्मित हास्य आणावे लागते. त्या मुळे होणार काय कि आपण आपल्या भोवती एक Positive Wave निर्माण करू, आणि काय घ्या…, जी व्यक्ती आपल्याला आज पर्यंत आवडत न्हवती, ती हळू हळू आवडायला लागेल आणि आपल्या एक मेकां बद्दल तक्रारी दूर व्हायला मदतच होईल…. पण कधी तरी हे हि खरं कि आपल्याला आपला विरोध उघड उघड दर्शवावाच लागतो त्या शिवाय दुसरा मार्ग नसतो. असो…!

मग हा मुखवट्यांची खेळ नकोच. फक्त काळजी एवढीच घ्या कि जिथे गरज नाही तिथे उगाच विरोध दर्शवू नका आणि शक्य तितके Positive Waves Spread करा. तेंव्हा सगळे मुखवटे काढून फेकून द्या आणि मुक्त पणाने जसे आहात तसे वागा. पण अर्थात समाजाने आपल्याला, आणि आपण समजला, सहज सामाऊन घ्यावे ते प्रयत्न करा.

समाजाला Accept करा, समाज तुम्हाला Accept करेल पण आपल्याला एखादी गोष्ट समाजातली खटकत असेल तर फक्त बतावणी करण्या पेक्षा स्वतः प्रवाहा विरुद्ध पोहण्याचा आणि सकारात्मक बदल घडवून आणायची धम्मक ठेवा…!

धन्यवाद !



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!