
SELF ACTUALIZATION
Adv. Shahin Shinde
Pre Marriage / Post Marriage Counselling
Mediator in Family Court Pune
shahins.shinde@gmail.com
MENTAL HYGIENE ह्या विषयाशी निगडित ‘MIND@PEACE’ ह्या सदरा खाली आजचा (चौथा) लेख.
कभी हां कभी ना मधला एक Dialogue आहे ….
“किसी किसी के लिये जिंदगी का सफर हि सब कुछ होता है… वो मंजिल के बारे में नहीं सोचते ”
तर आजचा आपला विषय ह्याच्याशीच निगडित आहे ….
SELF ACTUALIZATION
म्हणजे आत्म बोध ….स्वतःची प्राप्ती …
बाप रे एवढे जड शब्द … !
चला सोपं करून बोलू यात .
SELF ACTUALIZATION म्हणजे, कोणीतरी स्वतः मधला REAL SELF आणि IDEAL SELF मधला फरक ओळखू शकला.
नाही कळलं …?
बरं…. IDEAL SELF म्हणजे मी सगळ्यांच्या दृष्टिकोनातून, माझ्या आईवडिलांची कशी चांगली मुलगी आहे, कशी माझ्या नवऱ्याची आदर्श पत्त्नि आहे, कशी माझ्या मुलांची आदर्श आई आहे, समाजाच्या दृष्टीने कशी एक चांगली नागरिक आहे ….उफ्फ कित्ती हा आदर्श पणा..!
WOW…HOW ‘IDEAL SELF’ I AM..!
BUT WHAT AM I IN ‘REAL SELF’…?
मी इतकी काय सर्व गुण संप्पन्न नाही हो…आणि मला व्हायचं हि नाही. खरं तर कोणीच तसं नसत, मग कशाला अट्टाहास इतकं छान छान दाखवायचं …? मुक्त पणाने, एकदम सहज आणि आरामात स्वतःला, दुसऱ्यांना, आणि निसर्गाला ओळखा… पण सगळ्या गुण दोषा सकट.
मी किती मोकळे पणाने जगतिये …माझ्या आयुष्यात मी किती समाधानी आहे …आयुष्याशी मी किती एक निष्ठ आहे …किती संवेदनशील आहे ….म्हणजे SELF ACTUALIZATION
स्वतःची कुवत ओळखून, स्वतःची ओळख निर्माण करणे . म्हणजे बघा हां …मला काय जमत, मी काय BEST करू शकते…?
म्हणजे मला गणित कळत नाही आणि मला तो विषय अज्जीबात आवडत हि नाही तरी मी ENGINEERING ला जायचे का …? आणि गेले, तर काय होईल …? मी कदाचित नापास होईन किंवा चुकून पास झालेच तरी मी मन लावून ते काम करणारच नाही. तेच जर का मला स्वैपाकाची आवड आहे आणि मला ते छान जमतं हि, आणि मी त्याच दृष्टिकोनातून माझा अभ्यास किंवा सराव केला तर मी उत्तम COOK बनू शकेन आणि कदाचित पुढे मोठे हॉटेल टाकेन. ते काम मी कायम ENJOY करिन कारण ते मला करायला मनापासून आवडत. तर मी आयुष्यात अखंड आनंदी राहण्यासाठी काय केलं पाहिजे …?
तर स्वतः मधला “मी” शोधा ..! मला नक्की काय आवडतं, मी काय उत्तम पद्धतीने करू शकते, माझं खरा आनंद आणि यश कशात आहे …? नाही नाही …यश म्हणजे किंवा यशस्वी होणे म्हणजे पैसे कमावणे नाही किंवा पैश्याने श्रीमंत होणे पण नाही…. यशस्वी होणे म्हणजे, जे मला उत्तम जमतं ते मी ओळखले आणि त्याला मी माझ्या आयुष्याचे ध्येय बनवले आणि मी खूप आनंदाने जगते…
माझ्या मध्ये कला आहे योग्य पद्धतीने communicate करण्याची, माझ्या आजू बाजूच्या लोकांशी संवाद साधण्याची, लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्याची, जे मनात असेल ते निर्भीड पणे आणि योग्य पद्धतीने जगा समोर मांडण्याची ….आणि मी माझ्यातले हेच गुण ओळखले आणि ओघाने वकील, COUNSELLOR, MEDIATOR ह्या पेश्या कडे वळले. मी माझे जगणे ENJOY करते .. 🙂
आपल्या कामाला आपले PASSION बनवता येते का बघा… बनवता आले तर उत्तम … !
मग एक वेळ अशी येते कि आपण पैसे कमावण्या साठी तर काम करतोच पण ते करत असतांना आपण ते जास्त ENJOY करतो …मग म्हणून कधी काही MONETARY GAIN नाही झाला तरी आपण निराश होत नाही.
हे मी फक्त एक उदाहरण दिले. शोधा बरे आपल्या मध्ये किती सारे गुण आहेत…? आणि त्या गुणांना ओळखून त्या गुणांचा योग्य वापर करून काय ACHIEVE करता येते का…
आपल्यातले कितीतरी लोक आई वडिलांच्या म्हणण्या प्रमाणे एखादे शिक्षण, एखादी डिग्री, इच्छा नसतांना, घेतल्या असतील पण आपल्यातले किती तरी लोक चांगले कूक असतात , चांगले DESIGNER असतात , चांगले लेखक असतात , चांगले DANCER असतात, SINGER असतात …..बाप रे लिस्ट खूप मोठी आहे ..
सांगायचे तात्पर्य हेच कि SELF ACTUALIZATION म्हणजे काय ….तर, आता आपल्या लक्षात आलेच असेल, कि स्वतः तल्या ‘मी’ ला ओळखा आणि मग त्याचा, स्वतःच्या पद्धतीने निर्माण करा… मग बघा जगण्यात काय गम्मत येते..!
बाद में ये मत सोचना कि “काश थोडी हिम्मत दिखाई होती तो साली जिंदगी आज कुछ और होती…!”
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


