Skip to content

जवळच्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या रागावर हा उपाय करून बघा!

राग आणि अबोला ……


शिरीष जाधव
पुणे,
९ मे २०२०


सगळ्या प्राणीमात्रात माणवाला निसर्गाने एक विशेष देणगी दिलेली आहे. मन,भावना, इमोशन्स….आणि ते व्यक्त करण्यासाठी बोलण्याची शक्ती. सहज कल्पना केली की आपल्याला बोलता नाही आले तर? तर मग आपल्याला व्यक्त होताना काही प्रमाणात मर्यादा पडतील. आपलं व्यक्त होणं समोरच्या व्यक्तीला पटकन समजेलच असे नाही. मग ते समजावं म्हणून आणखी व्यक्त व्हावे लागेल. यासाठी आपण डोळे, भुवया,हात,हावभाव याचा आधार घेऊ. नव्हे तो घ्यावाच लागेल.

तर होत काय आपल्या कडून या धकाधकीच्या काळात वागताना, जगताना, काम करताना, नातं जपताना कधी कधी अपेक्षा जपणं किंवा पूर्ण करणं शक्य होत नाही. तसही सगळ्या व्यक्तींची मनं सांभाळताना आपला कधी कधी खुळखुळा होऊन जातो.

पण समोरची व्यक्ती तिच्या अपेक्षेला येवढी घट्ट चिकटलेली असते कि तिला आपल्या भूमिकेत येऊन आपली अडचण पहायला वेळच नसतो.साहजिकच मग मनात राग जमा होतो.या नंतरच्या प्रतिक्रिया मग वेगवेगळ्या असतात.कमी बोलणे, त्रोटक उत्तर देणे,अबोला धरणे,दुर्लक्ष करणे इत्यादी .

अशा वेगवेगळ्या व्यक्त होण्यातून मग अशा व्यक्ती व्यक्त होऊ लागतात.चेहऱ्यावरील हावभाव आणि डोळ्यांतील भावमुद्रा मात्र प्रामाणिकपणे सगळं सांगत असतात.अशावेळी राग आलेल्या व्यक्तीने स्वतःच्या अपेक्षित भूमिकेतून बाहेर येऊन ज्याच्यावर आपला राग आहे त्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन घटनांचा तपशील तपासायचा असतो.

क्रिया म्हटलं की प्रतिक्रिया ही ओघानेच येते. मात्र ती विक्षिप्त नसावी एवढंच.एक वाक्य खुप महत्त्वाचे आहे.

Forgive and Forget.

पण हे प्रत्यक्ष आचरणात आणणे येवढे सोपे नसते.दुस-याला उपदेश करणारी प्रत्येक व्यक्ती याला अपवाद असेलच असे नाही. यासाठी आणखी दोन शब्द खुप महत्त्वाचे आहेत.

Sorry and Smile.

समोरचा चुकला असेल आपण क्षमा करुन हे विसरून जाऊया किंवा चला आपण साॅरी म्हणूया आणि छान असं स्माइल करुया. या दोनही गोष्टी खूप सोप्या आहेत.याला एका पैशाचा पण खर्च येत नाही. मात्र आपल्यात विनयशीलता आणि विवेक या गोष्टी असाव्याच लागतात.

रागाला धरून ठेवलं तर त्रास हा फक्त आपल्यालाच होतो आणि अबोला जपत गेलो तरीदेखील घडलेल्या घटनेचे शल्य आपल्याच मनाला चटके देत असते. आपल्याला ते वारंवार घडलेली घटना सांगत असते.म्हणून राग ही भावना चांगली नसते आणि अबोला हे त्याचे उत्तर नसते.शेवटी काय हो.आयुष्य खूप छोटे आहे.आयुष्य खूप सुंदर आहे.

पण आयुष्य जगलं तर आणि नातं जपलं तर.!!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!