Skip to content

Sharing असेल तर नात्यांमध्ये Caring सुद्धा नकळत होते!

माणसं दूर गेली की मग रागवायचं सोडून देतात…….!!!


शिरीष जाधव.
अहमदनगर
१०जुन २०२०.


नाती जपा !!!

विस्कटलेली नाती परत विणता येत नाहीत.
आपण आयुष्य जगताना लोकांची मनं जपायचा प्रयत्न करतो.आपल्याला आयुष्यात अनेक लोक भेटतात.काही जणांशी आपल्या विचारांची वेव्हलेंथ जुळते, काही जणांशी आपले मतभेद होतात.मतभेद झाले की मग आपण अशा व्यक्तींपासून चार हात अंतर ठेऊन वागतो.मग जर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली तर कधी कधी ती व्यक्ती बदलते.चांगली वागायला लागते किंवा आपल्याशी अत्यंत टोकाची भूमिका स्वीकारून वागू लागते. अशावेळी आपण समंजस पणाची भूमिका स्वीकारुन आपल्या मनावर नियंत्रण ठेवले तर अशा परिस्थिती वर आपण मात करू शकतो.

कधी कधी मात्र यापेक्षा वेगळी परिस्थिती असते. आपल्या सोबत वाटचाल करताना काही व्यक्ती आपल्या आयुष्यात नकळत प्रवेश करतात.आपल्या आवडी, स्वभाव या बाबत काळजी घेऊ लागतात. आपल्या सोबत त्यांची सुखदुःखे शेअर करतात.संवाद मग आपलेपणाची जागा घेतो.हक्काने मग आपल्या मनासोबत व्यक्त व्हायला लागतात. तसं यात काहीही वावग नसत.एक मन दुस-या मनाची मनापासून काळजी घेऊ लागते.

आपण अशावेळी त्या व्यक्ती वर दुख:द प्रसंग ओढवला तर म्हणतो ” तुझ्या आयुष्यात मी आहे ना आता,सो डोन्ट वरी.आय एम वीथ यू.”आपणही या,अशा उबदार शब्दांनी आपली वेदना विसरून जातो.निरपेक्ष मनाने एका मनाचं दुस-या मनाशी नात घट्ट होत जात.असूया नसते,अपेक्षा नसते पण एक अनामिक ओढ मात्र नक्कीच असते.अशावेळी नात्यात गुंफलेल्या मनाने दुस-या मनाला, व्यक्तीला टाळले,दुर्लक्षीत केले की मग अशावेळी मनाला वेदना नक्की होते.मग दुखावलेलं मन आपली दुखरी बाजू, वेदना समोरच्या व्यक्तीने समजून घ्यावी या अपेक्षेने जगायला लागतो.वागायला लागतो आणि एवढं करूनही जर नात्यातील व्यक्तीला हे समजले नाही तर स्वतःहून लांब निघून जातो.अगदी न रागवता कारण माणसं रागवतात ती हक्काच्या माणसावर.मनातल्या नात्यावर.

रक्ताच्या नात्यातील माणसांचे मात्र वेगळे असते.ती मुळात हक्क दाखवतात तो नात्याच्या माध्यमातून. नात असतं म्हणून मग अपेक्षा असते.अपेक्षा असण्याचे मूळ कारण नाते हे असते.अशी नाती निरपेक्ष असली तरच टिकतात.कधी कधी अशा नात्यात जर एखादी व्यक्ती खूप सहनशील असली तर मात्र नात टिकतं. मात्र एक व्यक्ती केवळ औपचारिकपणे पण समोरच्या व्यक्तीला न दुखावता नातं जपत असतो.पण अशा नात्यात प्रचंड मोठी दरी निर्माण झालेली असते.केवळ लोकलज्जेस्तव अथवा नाविलाज म्हणून लोक नात जपतोय अस दाखवत असतात.एकत्र राहात असतात.

नातं कुठलही असुद्या. मैत्रीचे, मानलेले,जपलेले अथवा रक्ताचे ज्या नात्यांना आपण काळजापर्यंत जपतो तीच नाती श्वासापर्यंत टिकतात. नात म्हटलं की संवाद खूप आवश्यक असतो.शेअरिंग असल की नात्याचं केअरिंग होत.जड झालेलं मन मनातल्या, काळजाच्या जवळ असलेल्या माणसाजवळ हलकं करता येत.म्हणून नाती जपायला हवीत.

नाती काळजीपूर्वक रोपायला हवीत.कारण नात्यात असलेली माणसं एकदा दूर गेली की मग रागवायचं सोडून देतात. आणि रोज आपल्यासोबत असली तरी खूप खूप लांब राहतात.

म्हणून नाती जपा.कारण एकदा नाती विस्कळीत झाली की कधीही पहिल्या सारखी होत नसतात.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??


क्लिक करून सामील व्हा!

??


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!