
कधी कधी माणसं अशी का वागतात हेच कळत नाही..
खोटेपणा
हा दाेष की गुण माहीत नाही पण मी नात्यांना खूप महत्व देते. आणि म्हणूनच कधीकधी माणसं अशी का वागतात हेच कळत नाही.म्हणजे बघा ना, मनापासून बोलायची ,संवाद साधायची इच्छा मुळीच नसताना देखील निव्वळ औपचारिकता म्हणून good morning किंवा Happy’Birthday चे मेसेज पाठवतात. मैत्री / नाते आहे असे भासावण्यापेक्षा माणसाचा कल ते निभवण्याकडे जास्त असावा असे मला वाटते.
माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो खरा, पण समोरची व्यक्ती इतकी ही मूर्ख नसते की तुमचे नक्की काय चालले आहे ते समोरच्याला कळूच नये.
मला असे वाटते की कुणीही मैत्रीचे / नात्याचे सोंग घेऊन त्यात समोरच्याला कसे फसवता येईल ह्याचा विचार करत वेळ वाया घालवण्यापेक्षा आपली ज्यांच्याशी खरी मैत्री / नाते आहे , खरंच आपुलकी, ओढ वाटते अश्या आपल्या माणसासाठी काय चांगले करू शकतो ह्यात वेळ सत्कारणी लावावा.
अश्याच काही खोट्या माणसांमुळे आजकाल मैत्रिवरचा , नात्यांवरचा विश्वासच नष्ट होत चालला आहे. मनापासून मैत्री / नाते निभावणारे खूप असतात.पण विश्र्वासघातकी माणसांचा शाप आयुष्यात निराशा आणतात.
मैत्रीत किंवा नात्यात जर विपरीत अनुभव मिळाला की मी विलक्षण दुखावली जाते. नकळत डोळ्यांच्या कडा ओलावतात. आणि त्यातूनचं मनात अशी गाठ पडते की मी मनातून विरक्त हाेते.
फक्त एकच विचार येतो की देवा अश्या माणसांना एकदातरी खऱ्या मैत्रीची जाणीव होऊदे.
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



