Skip to content

आयुष्यात घडणाऱ्या नकारार्थी गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, तर हाताळा!

आयुष्यात घडणाऱ्या नकारार्थी गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, तर हाताळा!


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


आपल्याला लहानपणापासून केवळ चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात आणि वाईट गोष्टींपासून दूर केले जाते. तसेच असे केलेले संस्कार जरुरीचे तर आहेच पण यातून एकांगी व्यक्तिमत्व विकसित होत असते. अशी मुलं पुढे अपयश पचवू शकत नाहीत. कोणत्याही अवघड स्थितीत यांना घाम फुटतो आणि निर्णय घेणे अवघड होते.

ज्यावेळेस एका ठराविक वयात आल्यानंतर आपला या जगाशी प्रत्यक्ष संबंध येतो, त्यावेळेस आपल्यामध्ये सुद्धा वाईट गोष्टी जन्म घेतात आणि ते नैसर्गिक आहे.

‘वाईट गोष्टी या नेहमी वाईट असतात, त्या आपल्यात अजिबात असू नये’ या गोष्टींकडे आपल्या सर्वांचा रोष असल्याने त्या कश्या हाताळाव्यात याविषयी आपण अज्ञानी असतो. त्या न हाताळता आल्याने आपल्या समस्येत भर पडत आहे. म्हणजेच एखाद्या प्रिय व्यक्तीमध्ये एखादी वाईट गोष्ट असणे, हे सहन न होण्यापलीकडचं बनत चाललं आहे. मग ते जोडीदार निवडताना असेल, मित्र बनवताना असेल किंवा एखाद्याला एखादं गुपित सांगायचं असेल.

मुळात आपल्याला आत्तापर्यंत जे काही चांगलं रंगवलेलं आहे किंवा भासवलेलं आहे, त्यावरच प्रेम होतं आलं आहे. म्हणून ज्यावेळेस वस्तुस्थिती समजते, तेव्हा एकतर आपण चिडतो, रडतो किंवा घुसमटतो.

म्हणून प्रत्येक व्यक्तींमध्ये निसर्गतःच नकारात्मकता व वाईट गोष्टी सुद्धा असतात हे स्विकारायला हवं. त्या आधी त्या आपल्यात सुद्धा आहेत हे पटवून घ्यायला हवं. तेव्हा येणाऱ्या अवघड स्थितीत आपण जलद मार्ग काढू शकू.

नाहीतरी सध्या सर्वच वाईट लपवून चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतच आहेत, पण खरं वागत नाहीयेत…

कारण मनात भिती असते लोकांकडून स्वीकारले न जाण्याची.

आणि याची सर्व पाळेमुळे रोवली आहेत, सदैव लहानपणापासून आपल्याला वस्तुस्थिती काहीशी वेगळीच दाखवण्यामध्ये.

कारण आपले पालनकर्ते सुद्धा वाईट गोष्टींच्या शिक्षणाबद्दल काहीसे अज्ञानी होते, असं आपण म्हणूया. पण आपला कल हे अज्ञान पुढच्या पिढीकडे संक्रमित होऊ नये यासाठी असायला हवं…

काही लहानपणीची उदाहरणे पाहूया..

● तिकडे अंधारात जाऊ नको..

● वाईट माणसांपासून लांब रहा.

● स्वतःची वस्तू दुसऱ्याला देऊ नको.

● जवळच जा, खूप दूर जाऊ नको.

● व्यवस्थित चालव, नाहीतर पडशील.

● दुकानातून सामान घेताना पैसे मोजून घे.

वरील सर्व वाक्यातून आपल्याला सांभाळत-सांभाळत एक शिक्षण मिळत आलेले आहे, हे मान्य. परंतु काहींच्या ठिकाणी प्रत्येक परिस्थितीची सुरुवात अशाच वाक्याने केली जाते. ज्याच्यातून असे भाव उत्पन्न होतात की अशा सर्वांपासून लांब रहा. आणि हाच आपला मुद्दा आहे की, त्यामुळे

वस्तुस्थितील वाईट किंवा नकारार्थी गोष्टी दुर्लक्ष करण्याकडेच आपला कल असतो, पण हाताळण्याकडे नसतो.

म्हणजेच घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाची वाईट किंवा नकारार्थी बाजूही सकारात्मक रितीने कशी हाताळता येऊ शकते हे कळायला हवं. कारण आयुष्यात आत्तापर्यंत भिडलेल्या बऱ्याच समस्या या भावना हाताळता न आल्यामुळे उत्पन्न झालेल्या आहेत.

म्हणून या भावना दुर्लक्ष करू नका, तर हाताळा.

तरच न डगमगता, न रडता, न चिडता वस्तुस्थितीचा सामना जोमाने करता येईल.

आणि हो, नवीन पिढी आपलं सूक्ष्म निरीक्षण करतीये..हे विसरू नका.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!