
स्वभावधर्म
डॉ. सोनाली उमेश गायकवाड
काही सांडले की मुंग्या जमा होतात, हे काही नवीन नाही. पण काल अशा मुंग्या बघून पार्थने (माझ्या लहान मुलाने )मुद्दाम आणून काही फराळाचे त्यांच्या समोर ठेवून त्या कशा खातात हे बघू लागला. एखादी मुंगी न खाता पुढे गेली की तो तिच्या पुढे तो दाणा करायचा. असा खेळ बराच वेळ सुरु होता.
नकळत माझ्या कडून सूचना झाली, सांभाळून हा एखादी मुंगी चावेल. त्यावर त्याचा निरागस प्रश्न आला, “मी तर त्यांना खायला देतोय मग त्या मला का चावतील?”त्याचा हा प्रश्न ऐकून मीही संभ्रमात पडली. पण लगेच त्याला कुणीही सांगेन तेच सांगितलं “अरे त्यात काय मुंगीच ती, तिचा स्वभाव आहे.चावू शकते ती.चावेल असेही नाही पण आपण सांभाळून राहावं”. म्हणाला “असं कस, एरवी तर तू म्हणतेस आपण कुणाला त्रास दिला तर कुणी तरी आपल्याला त्रास देत. मग आता तर मी मुंगीला त्रास नाही देत आहे. उलट खायला देतोय. ”
आणि मग माझ्या लक्षात आलं आपण वयाने मोठे झालो खरे. पण लहानच राहिलो. इतके दिवस आपल्या लक्षातच आलं नाही. आपण कुणाशी चांगले किंवा वाईट वागलो म्हणून कुणी आपल्याशी चांगलं किंवा वाईट वागत नसतो. प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. मग ते आपण असो वा इतर.
म्हणून आपण अमुक एक वागलो म्हणून समोरचा तसा वागला असे विश्लेषण करणे चूकच. एखाद्या व्यक्तीच्या कुठल्याही कृतीला व्यक्ती परतवे प्रतिक्रिया वेगवेगळ्या असूच शकतात.
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



