
मुलांना लैंगिक शिक्षण देताना पालकांसाठी महत्वाचे ‘८’ नियम !!!
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
१. पालकांनी लैंगिक शिक्षणाबाबत स्वतः अभ्यासू असले पाहिजे. आपली मते शास्त्रशुद्ध असतील तरच ते मुलांना समजावू शकतात. तसेच संशोधनातून येणाऱ्या नवीन माहितीबद्दल अपडेट असावे.
२. आईने मुलीला व सुनेला, तर वडिलांनी मुलांना लैंगिक ज्ञान द्यावे किंवा कोणताही संकोच न बाळगता आई-वडिलांनी एकत्रितपणे मुलांना लैंगिक शिक्षण द्यावे.
३. कोणतीही कामुक भाषा, कामुक चित्र, कामुक स्पर्श व कामुक हावभाव न करता माहिती द्यावी.
४. स्त्री व पुरुष जननेंद्रियांबाबत बोलीभाषेतील शब्द वापरू नयेत, फक्त शास्त्रीय भाषेतील शब्दांचाच वापर करावा.
५. लैंगिक शिक्षण हे पूर्ण बंद खोलीत व आई – मुलगी किंवा वडील – मुलगा असतानाच द्यावे. जेवणाच्या टेबलावर, टीव्ही पाहताना या विषयावर बोलू नये.
६. मुले-मुली कितीही लहान व मोठी असली तरी त्यांच्या खाजगी जीवनाचा आदर करावा स्वतःचे खाजगी आयुष्य त्यांना सांगून दडपण आणू नये.
७. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची थट्टा करू नये. एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही माहीत नसल्यास खोटे उत्तर न देता माहिती मिळवून मग मुलांचे शंकानिरसन करावे.
८. पालक महिन्यातून एखाद्या रविवारी लैंगिक शिक्षणाचा तास मुलांसाठी घेऊ शकतात.
लैंगिक शिक्षणाचे बाहेर कोठेही अद्याप क्लास नाहीत. भविष्यात कदाचित ते निघतीलही. “मुलांसाठी लैंगिक शिक्षण का महत्वाचे” या वाक्याखाली प्रभावी मार्केटिंग देखील करण्यात येईल आणि येत्या काळात तो ट्रेंड सुद्धा पहायला मिळू शकतो.
पण,
जवळच्या विश्वासू व्यक्तींनी मुलांना असे शिक्षण दिलेले केव्हाही उत्तम असेल.
म्हणून पालकांनो आपल्या मुलांशी दिलखोस्तपणे बोला, नाहीतर ते उत्तर मिळविण्यासाठी बाहेर बोलतील
आणि ते आत्ताच्या स्थितीत परवडणारंही नसेल आणि पचणारंही !
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
क्लिक करून सामील व्हा!
??

