
व्यक्तिगत आणि सामाजिकता.
समाज आणि मी काही वेगळे का ? मी , तू , ते , तो , ती , व्यक्ति व्यक्ति मिळून आणि समुह समुह मिळून समाज बनतो. रूढी,परंपरा, प्रथा अनंत काळापासून चालत आलेली आहे. हे आदान प्रदान, देवान घेवाण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते . काही गोष्टी लुप्त झाल्यात तर काही गोष्टी नव्यानी निर्माण झाल्यात, टिव्ही, मोबाईल यांनी आजची परिस्थिती दिवसेंदिवस बदलत गेली अन् अॅडव्हान्सचे जग निर्माण झाले. एकमेकांमधील संवाद कमी झाला .व्यक्ती एकलकोंडी झाली. स्वार्थपणा, महत्त्वाकांक्षा, स्पर्धा , परदेशातील शिक्षण आणि प्रशिक्षण तसेच नौकरी करण्यात मान्यता आली. आपल्या देशात नौकरी आणि शिक्षण घेण्यात कमीपणा वाटत गेला. परक्या देशात राहणे हे अभिमानस्पद वाटू लागले. आई-वडील तसेच नातेवाईक यांच्यातला दुरावा वाढु लागला.
आज कोरोना विषाणू चा प्रादुर्भावामुळे जबरदस्त समाजशिस्तात फरक दिसू लागले. कारण संसर्ग या भितीमुळे लोकांच्या वागणुकीत आणि वर्तणुकीत बराच फरक पडला आहे. स्वच्छता, घरात राहून कुटुंबाविषयीची ओढ, संवाद, घरातच राहून खेळ, घरातील लहान मोठ्या कामे एकमेकांच्या मदतीने होऊ लागली. कमी खर्च, अकारण खरेदी वर आळा बसला.
समाज, देश आपला आणि आपण ही भावना जागृत झाली.अंधश्रद्धा कमी झाली. घराबाहेरचे रस्ते, गल्लोगल्ली स्वच्छ झालेली दिसते आहे. पाण्याचा वापर , प्लस्टीकचा वापर कमी झाला आहे. वाहतूक आणि दळणवळण यंत्रणा, माणसांची ये_जाव कमी झाली यामुळे पर्यावरणात स्वच्छता येत आहे. आकाशातील चंद्र आणि तारे स्वच्छ लुकलुकतांना दिसत आहे . वाटते, नव्याने वसुंधरेचे सौंदर्य खुलते आहे.
पण, एक भितीही मनात वास करते आहे की कोरोना विषाणू संपल्यानंतर अशीच व्यवस्था राहील का ? जी स्वच्छता दिसते आहे ती सदैव राहील का? की परत आपल्या मधील निर्लज्जपणा, आणि बेशिस्तीपणा येईल ? काय आलेल्या संकटा पासून काही शिकलो, काही गोष्टींची जाणीव झाली, काही चांगल्या गोष्टी नव्यानी शिकलो, काही आत्मसात केलेल्या विचार; हे सर्वांचा विसर तर नाही ना पडणार.!
ही शिकवण कोरोना विषाणू चा प्रादुर्भावामुळे किंवा संसर्गाच्या भितीने का होईना आपल्यात रूजते आहे मग तिला अंगवळणी का आणू नये. कारण हवेमध्ये नेहमीच अनेक प्रकारचे विषाणू असतात त्याचाही पासून बचाव व्हायला पाहिजे.म्हणून नेहमीसाठी आपल्यात हात धुणे, रस्त्यावर कचरा घालू नये, रस्त्यावर थुंकू नये.प्लस्टीकचा वापर कमी करणे .गाई, म्हशी यांच्या फिरवण्यासाठी रस्त्यावरच्या बाहेरील भागात करावे, रस्त्यावर त्यांना फिरवू नये, रस्त्यावरील कुत्र्यांची संख्या कमी करणे, रस्त्यावरील जड वस्तूंची वाहतूक रस्त्यावरच्या बाहेरील भागात करावे. वाहतूकीचे नियम हे आपल्या साठीच आहेत याची जाणीव असणे.अश्या अनंत गोष्टी पण हे जीवनावश्यकते मधे असायला पाहिजे.
नाही का?
नाही तर नेहमीच कोरोनासारखे असणारे, नसणारे विषाणू आपल्या सोबतच खेळत असणारं आयुष्यभर. ! ??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


