मुलं Online आम्ही offline
अश्विनीशी फोनवर बोलत असताना अचानक मुलांचा बोलण्याचा आवाज आला. काय झालं तर मुलाला बसल्या बसल्या झोप येतेय. म्हंटल, अग मग झोपू दे.तर म्हणाली, नाही ग, झोपू कस देणारं त्याला, शाळा सुरूय.
मला कळेना, शाळेत आहे मुलगा, तर घरी कसा झोपतो म्हणतोय?
आणि शाळा सुरु कधी झाल्या!
वाटलं हिच्या भागात सुरु झाल्यात की काय (ती हैद्राबादला असते.)
तर तिने सांगितलं online शाळा सुरु झाल्यात.
ऐकून मी अवाकच झाली !
सहा वर्षाच्या मुलाची Online शाळा !
आता शाळेत झोप आली तर बाईंच्या (sorry madam ) धाकाने ही पोरं झोपणार नाहीत.
पण घरी कस करणार?
एरवी घरीही झोपत नाहीत ही मुलं, दिवसभर घरात दंगा सुरु असतो.
नाही दंगा, तर टीव्ही समोर बसून असतात. तेव्हा झोपा म्हंटलं तरी झोपणार नाहीत ही.
पण शाळा!
आणि तेही घरात बसून !
मग तर झोप येणारच.
थांबवायचं कस आणि कुणाला? झोपला की टीचरला हा एकच यक्ष प्रश्न !!
फोन ठेवला मी, आणि मनात Online शाळेच्या गमती डोळ्यासमोर तरळू लागल्या.
शिकवण सुरु झालं की मुलांना भूक लागणार. एरवी अभ्यासला बसल्या बसल्या ह्यांना खायचं आठवत. कधी नव्हे इतकी भूक लागते.
हातातलं काम सोडून ह्यांना खायला दया नाहीतर अभ्यास थांबतो.
आता कोणाला थांबवणार? Online शिकवणाऱ्या टीचरला की मुलाला.
टीचर समोर हट्ट करता येत नाही. आईला कोण जुमानणार.
थोडा वेळ जातं नाही तर सू चा कॉल येणार. शाळेत परमिशन न घेता किंवा मधल्या सुट्टी शिवाय जाता येणार नसतं.
इथे काय होणार?
लिहिता लिहिता मागे पडला विद्यार्थी, तर वर्गात बाजूच्याच बघून लिहिता येत. इथे काय होणार? कुणाला विचारणार?
मूल एका जागी बसलं पाहिजे म्हणून आई शेजारी बसणार.
अर्थात स्क्रीनवर आपण दिसणार नाही ह्याची काळजी घेत. पण घरात कुणी आलं किंवा फोन आला म्हणून आई गेली तर मागे मागे मुलं ही उठून जाणार.
कुणा कुणाला आणि कायकाय सांभाळायचं.
चार वर्षाच्या मुलाला हात धरून शिकवावं लागतं. Online शाळेत ही टीचर हे कस करणार?
हे झालं लहान मुलांचं. मोठ्यांचे तालच वेगळे. ह्यांचं वेळेवर नेट सुरु होत नाही, तर कधी टीचर वेळेवर येत नाही. ह्या सगळ्यातून क्लास सुरु झाला की लिहायच्या वेळेस पेन वही नाही, कारण बॅग भरून सामान जवळ नाही. मग अख्ख घर पेन वही शोधणार. क्लासच्या मधून मग पाणी आठवलं की त्यांना पाण्याची बॉटल भरून दया.
शिवाय घरात कुणी कुणाशी बोलायचं नाही. भांड्यांचा, नळाचा किंवा कुठलाही आवाज होऊ दयायचा नाही.
एक ना दोन शंभर भानगडी. हजार अडचणी.
कस कस आणि काय काय सांभाळायचं.
पण प्रगती पथावर वाटचाल करायची तर काळाच्या पुढे सरकाव लागतं. स्पर्धेत टिकायचं असेल तर नवीन समस्यांना समोर जावंच लागणार. नवीन बदल स्वीकारावे लागणार. नवीन मार्गावर चालताना अडचणी येणारच पण त्या सगळ्याशी दोन हात करावेच लागणार.
कारण थांबला तो संपला
Show must Go On….
नव्हे, show must Go Online.
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
क्लिक करून सामील व्हा!
??

