
घाबरायचं कशाला जगाचं जे होईल ते आपलं होईल.
8669713732
गारगोटी.
प्रेरणा देणारी गोष्ट.
काही कालावधीनंतर माणसाच्या मनातील एखादी घटना किंवा प्रंसग याविषयीची भिती कमी होते.माणसाच्या मनाची ही अवस्था त्याला नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी निसर्गाने दिलेली देणगीच आहे.उदा.जसं एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर सुरुवातीला आपण खुपचं अस्वस्थ होतो.पण,काही कालावधीनंतर या घटनेला सामावून घेण्याची मन तयारी करतं.मानशास्त्राप्रमाणे साधारण हा कालावधी बारा दिवसांचा असतो असं मी वाचलं आहे.
आता कोरोनाच्या बाबतीत हेच होतं आहे.आपण कोरोनाला सोबत घेऊन जगण्याची तयारी करायला लागलो आहोत.याविषयी सुरुवातीला मनात असलेली भिती आता कमी झाली आहे.पण, यामध्ये या दोन-तीन महिन्यांत झालेल्या अनेक उलथापालथीमुळे हीच भितीची जागा ताण तणावाने घेतली आहे.तो येणं साहजिक आहे कारण या कालावधीत प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीला ब्रेक लागला आहे.अनेकांचं न भरुन येणारं नुकसान झालं आहे.तरीही आपण या सगळ्यातून बाहेर पडणार आहोतच.
उपाय म्हणून निश्चितच काही कालावधी जाऊ द्यावा लागेल.ताण तणावापासून दूर राहण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करावे लागणार आहेत.त्यासाठी खालील गोष्टी आपल्याला करता येतील का पहा? त्यामुळे ताण तणाव कमी होईलचं पण त्याच सोबत नव्या वाटांचा देखील शोध लागेल.
योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या.
तुम्ही काम करत असलेल्या क्षेत्रातील योग्य व्यक्तीकडून सल्ला घ्या.या व्यक्तीला तुमचा भुतकाळ आणि कामाची पद्धत माहिती असावी.ती व्यक्ती सत्य मार्गदर्शन करणारी असावी.जर याअगोदर त्या व्यक्तीने तुम्हाला मार्गदर्शन केल्यामुळे फायदा झाला असेल तर यावेळी विश्वास ठेवा.धाडसाने हळूहळू कृती करा.
किमान एक वर्ष कामाचे टप्पे बनवा.
‘आता जितका वेळ बसलो आहे त्याच्या दुप्पट काम करुन मी वाया गेलेला वेळ भरुन काढणार आहे.जितके पैशाचे नुकसान झाले ते सर्व भरुन काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही,’
असा विचार करणं मुर्खपणाचं ठरेल.त्याऐवजी शांतपणे आजुबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेत सावधानतेने कामाची आखणी करा.एक वर्ष थोडा वेग कमी झाला तरी चालेल पण,अधिक नुकसान करुन घेऊ नका.त्रास आणि ताण कमी होईल याची काळजी घ्या.
चिडचिड होऊ शकेल अशा सर्व बाबी टाळा.
या काळात तुम्हाला सगळ्यांत जास्त काळजी कोणाची घ्यायची आहे तर,ती स्वत:ची काळजी घ्यायची आहे.जर प्रत्येकाने असं केलं तर सगळ्यांच्या हिताचं होईल.ज्या प्रसंगामुळे,व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास होतो त्यापासून शक्य तितकं लांब रहा.सकारात्मक राहता येईल यासाठी वाचन करा, आवडत्या व्यक्तींची व्याख्याने ऐका,चित्रपट पहा,ध्यानधारणा करा.
केवळ तुम्ही एकटे नाही.
परवा माझी आई मला म्हणाली,” घाबरायचं कशाला जगाचं जे होईल ते आपलं होईलं.” हे अगदी खरं आहे.कमी अधिक फरकाने प्रत्येकालाचं समस्या येत आहेत.जे बदल होतील ते सगळ्यांसाठीच होतील.त्यामुळे केवळ आपणचं अडचणीत आहोत अशी चूकीची मानसिकता बनवू नका.प्रत्येक व्यक्तीसाठी हा काळ नवीन आहे.आशावादी राहूयात. प्रयत्न करुनच आपण यातून बाहेर येणार आहोत. ते सुरु ठेवा.
नकारात्मक बोलणं आणि विचार करणं थांबवा.
नकारात्मक विचारांमुळे छोट्या अडचणीही मोठ्या वाटायला लागतात.भविष्यात काय होणार याची कोणालाच कल्पना नाही.तुमच्याकडे जितकी माहिती आहे तितकीच माहिती समोरच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे पुढे काय?हा विचार थांबवून वर्तमान स्थितीवर लक्ष केंद्रित करा.भविष्यात अडचणी वाढणार आहेत असा नकारात्मक विचार केल्यामुळे त्या कमी न होता जास्त वाढत राहतील.
नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीसाठी नव्या संधींची दारे कायम बंद असतात.
नकारात्मक विचारांची चर्चा दुसऱ्या सोबतही करु नका.अनेकवेळा मनात नसतानाही आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार पेरतो.मग ती व्यक्ती अजून कोणालातरी ते विचार देते.तुम्ही हे थांबवू शकता.शक्य तितक्या लवकर विचारात अशी दुरुस्ती करा.यामुळे तुम्ही सकारात्मक विचार करण्याकडे जास्त लक्ष देता आणि याचा पहिला फायदा तुम्हाला होतो.
लक्षात ठेवा,
आनंदी राहता येणं ही सामान्य गोष्ट नाही, तोच तुमच्या यशाचा पाया आहे.
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



