
पति आणि पत्नी मध्ये काही अशा लैंगिक गोष्टी असतात
पति आणि पत्नी मध्ये काही अशा लैंगिक गोष्टी असतात की त्याबद्दल फारस कुणाजवळ बोललं जात नाही आणि कुटुंबात देखील कुणाजवळ सांगता येत नाही. दोघांमध्ये आतल्याआत धुसफुस चालू असते. शीतयुद्ध चालू असते पण त्याचा केव्हा भडका उडेल हे सांगता येत नाही .
माझ्या मैत्रीणीच्या बाबतीत हेच झालं होत की ती कुणाजवळ बोलू शकत नव्हती किंबहुना नवऱ्याजवळ ही बोलत नव्हती . स्त्री ही मुळातच लाजाळू असते आणि लैंगिकतेबद्दल काही प्राॕब्लेम असेल तरीही नवऱ्याजवळ बोलायलाही स्त्रीचे मन कचरत असते.
पतीपत्नीची कामेच्छा एकसारखी असावी पण काहीवेळेस असे होत नसते. काहीवेळेला पती लवकर उत्तेजित होतो तर स्त्रीला उत्तेजित व्हायला वेळ लागतो. पतीची कामतृप्ती लवकर होते आणि स्त्रीला थोडा वेळही लागू शकतो तर काही वेळेस स्त्री लवकर उत्तेजित होते. तर पतीला वेळ लागतो याची कारणेही अनेक असू शकतात. ज्यामध्ये स्ट्रेस , वयामध्ये जास्त फरक , मेडिकल कंडीशन्स , टेंन्शन ,जबाबदारीचे अतोनात ओझे , मुलांचे पालनपोषण ,शुगर वगैरेसारखे आजार या सारखी कारणे असू शकतात.
पतीपत्नीचे नाते चांगले टिकण्यासाठी लैंगिक जीवनाचे महत्त्व आहेच आणि लैंगिक जीवनात समस्या असतील तर त्या वेळीच सोडवल्या तर पतीपत्नीच्या नात्यात दुरावा होणार नाही .
जीवनात प्रेम , आनंद जसं महत्त्वाचे तेवढेच शारीरिक संबंध ही महत्त्वाचे आहेत .
त्यासाठी पतीपत्नी ने एकमेंकांशी निसंकोचपणे बोलले पाहिजे , संवाद साधला पाहिजे . कारण एकमेकांबद्दल दोघांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात आणि रागाने न बोलता सन्मानाने बोलल पाहिजे .
एकमेंकाचा मुड फ्रेश होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी कुठे बाहेर फिरायला जाऊन दुसऱ्या ठिकाणी शारीरिक संबंधाचा आनंद घ्यावा . किंवा बेडरूममध्ये रूमफ्रेशनर , अरोमॕटिक कॕडल्स लावणे , एखादे प्रेमसंगीत जेणेकरून मूड तयार होऊन पतीपत्नीच्या संबंधात रोमांचकता येईल….
आणि नाते दृढ व्हायला मदत होईल…
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



