Skip to content

एका चुकीमुळे समोरच्यातल्या चांगल्या गोष्टी विसरू नका..

समोरच्यातल्या चांगल्या गोष्टी विसरू नका..


अजय धागे


काही दिवसा पूर्वी मी एक गोष्ट ऐकली होती त्या मुळे मला एक गोष्ट समजली आणि काही शिकायला ही मिळाल ती गोष्ट तुम्हाला माहीत असावी असं मला वाटत.

एखाद्याच्या एका चुकांमुळे आपण त्यानी केलेल्या चांगल्या गोष्टी का विसरतो…

एका राजाकडे दहा खुंकार रानटी कुत्री होती. आता राजा म्हंटल तर तो राजाच असतो त्याच्या कडे खूप मोठे नोकरदार होते राजा जो कोणी नोकर चुका करत असे त्या नोकराला त्या रानटी कुत्र्या समोर टाकून देत असे. एकदा एका नोकराने चूक केली म्हणून त्याने नोकराला कुत्र्यांकडे फेकून देण्याचा आदेश दिला.

तो नोकर म्हणाला, “मी वीस वर्षे तुमची सेवा केली आहे, कृपया कुत्र्यां समोर टाकून देण्यापूर्वी वीस दिवस मला त्याच्या सोबत राहण्याची परवानगी द्या .” “राजा सहमत झाला.

वीस दिवस राज्याच्या कुत्र्या सोबत राहून
तो नोकर राजा समोर हजर झाला…

अटी प्रमाणे वीस दिवस पूर्ण झाल्याने राजाने आपल्या नोकराला शिक्षेसाठी त्याच कुत्र्या समोर टाकण्याची आज्ञा केली. जेव्हा त्याला आत फेकले गेले तेव्हा सर्वांना फार आश्चर्य वाटले की सर्व कुत्र्यांनी फक्त त्या नोकराचे पाय चाटले!

राजा पाहून चकित झाला,

“माझ्या कुत्र्यांना काय झाले?”

त्या नोकराने उत्तर दिले, “मी फक्त वीस दिवस कुत्र्यांची सेवा केली आणि ते माझी सेवा विसरले नाहीत. पणं मी संपूर्ण वीस वर्षे तुमची इमान राखून सेवा केली आणि ती तुम्ही माझ्या एका चुकी मुळे एका क्षणात सर्वकाही विसरलात!”

राजाला आपली चूक लक्षात आली आणि त्याने त्या नोकराला सोडण्याची आज्ञा दिली .

एखाद्याच्या एका चुकांमुळे त्यानी केलेल्या चांगल्या कामाला आपण कधीच विसरले नाही पाहिजे ही गोष्ट मी छान प्रकारे त्या दिवशी समजलो होतो….

धन्यवाद……??


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!