
आधी स्वतःवर प्रेम करूया….
बऱ्याच वेळा मनात विचार येतो की; आपण मातृदिन, पितृदिन, महिला दिन असे अनेक दिन या ना त्या कारणाने साजरे करीत असतो फक्त एक दिवस कधीच साजरा करीत नाही तो म्हणजे “मी” दिन.. असा जागतिक दिवस साजरा व्हावा असे माझ्या अनेक वेळा मनात येते, कारण; निदान या दिवसाचे निमित्त साधून का होईना आपण स्वतःकडे लक्ष देऊ..
अनेक वेळा इतरांसाठी जगताना स्वतःसाठी जगायचेच राहून जाते.. स्वतःवर प्रेम करायचेच राहून जाते.. आपण स्वतःला इतके गृहीत धरायला लागतो की, आपल्यातील ईच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, क्षमता या गोष्टींचा जणू विसरच पडतो.. इतरांचा इतका विचार करायला लागतो की, स्वतःचे अस्तित्वच विसरुन जातो..
दुसऱ्यांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीवर शाबास्की देतो पण स्वतः केलेल्या चांगल्या गोष्टीवर स्वतःचीच पाठ थोपटायची विसरुन जातो.. इतरांसाठी आपल्याकडे वेळच वेळ असतो पण थोडा वेळ स्वतःसाठी आपण काढू शकत नाही..
खरं सांगायचं तर आपण मुळात; स्वतःला स्वीकारायलाच तयार नसतो.. जसे आहोत अगदी तसे.. त्यामुळे कायम इतरांशी तुलना करत राहतो..
मोर छान दिसतो म्हणून कावळा जगणे सोडून देत नाही किंवा कोकिळ गोड गातो म्हणून साळुंकी ओरडणेही सोडत नाही..
अगदी त्याचप्रमाणे आपण जसे आहोत तसे स्वतःच्या गुण दोषांसकट स्वतःचा स्वीकार करुन स्वतःवर मनापासून प्रेम करणे गरजेचे असते आणि स्वतःवर जर प्रेम केले तरच आपण इतरांवरही प्रेम करू शकतो..
त्यामुळे आधी स्वतःवर भरभरून प्रेम करुया, स्वतःचा निरपेक्ष स्वीकार करूया आणि स्वतःसाठी एखादा “मी” दिवस नक्की साजरा करुया..
Love yourself ❤️❤️
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
छंद जोपासण्यासाठी
क्लिक करून सामील व्हा!
??



