
‘चुकामुक’ ला एक चान्स देऊन बघूया..
मिनल महेश झवर
आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची आणि आपली थोडक्यात “चुकामुक” होणं.. हा कधीच नवीन अनुभव नसतो…
पण, वस्तू ची चुकामुक झाली तर जास्त फरक पडत नाही म्हणजे ती वस्तू जीवनावश्यक नसेल तर माणूस म्हणतो आज ना उद्या मिळेल पण… चुकामुक माणसांची झाली तर जीवनात खूप असंतुलन होतं… म्हणजे चांगल्या वेळेवर वाईट माणसाचं भेटणं आणि वाईट वेळेवर चांगल्या माणसाचं फक्त भेटणं पण….त्याचं आपल्या आयुष्यात नसणं किंवा आपल्या आयुष्यात त्याला यायची किंवा घ्यायच्या वेळात झालेली चुकामुक…
त्याच्या सोबत राहू ही शकत नाही आणि त्याला सोडू ही शकत नाही अश्या चुकमुकीमुळे कधी कधी अक्षरशः चीड येते…
आता का? आता काय? आणि आता काहीच करता येत नाही किंवा करायची हिम्मत किंवा वय नाही मग आता का भेटला/भेटली?
आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, मन सैराट होतो , कधी कधी करून घ्यायचं जे होईल बघून घेऊ म्हणत “बगावत” करतो कधी मनाला घट्ट “लगाम” देऊन पकडून ठेवतो पण….
दोन्ही परिस्थितीत अस्वस्थता…
त्याच्यात समजा जो मिळाला/मिळाली त्यांच्या समोर ही गोष्ट ही भावना मांडू शकला नाही तर अजूनच कठीण परिस्थिती…कारण फक्त फक्त आतल्या आत सहन करणं खूप अवघड असतं…
काही ही असो…
योग्य वेळी योग्य माणसं जीवनात येणं हे खूप मोठ्ठ भाग्य असतं… सगळ्यांसोबत असं होतं नाही…
कोणाला चांगले मित्र कोणाला प्रेम करणारे अश्या वेळेस भेटतात जेव्हा त्यांना आपण आपल्या आयुष्यात त्यांना योग्य जागा द्यायची इच्छा असूनही देऊ शकत नाही…
तुमच्या जीवनात अशे योग्य माणसं आलेले असतील ज्यांना तुम्ही आता काही नाव देऊ शकत नाही पण त्यांच्या कोणत्याही कसल्याही प्रकारे तुमच्या सोबत असने तुम्हाला आनंद,आत्मविश्वास आणि गर्व जाणवत असेल तर त्यांना गमावू नका..
त्यांचा जीवनात यायचा वेळ चुकलाय पण त्यांना जीवनातून काढून तुम्ही परत एक चूक करू नका…
“चुकामुक” ला एकदा चान्स देऊन बघा..
बहुतेक आयुष्यात ह्या “चुकमुकी” मुळेच योग्य वेळ येईल…
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



