Skip to content

कोरोना ….. दुबई , भारत आणि अस्वस्थता…

कोरोना ….. दुबई , भारत आणि अस्वस्थता…


सुजित पांडुरंग पाटील


सकाळी ७ वाजता उठायचं , थोडा व्यायाम करायचा नंतर मस्त फ्रेश व्हायचं.थोडा तयार होऊन नाश्ता झाल्यावर हक्काच्या कामासाठी बाहेर पडायचे इतका घाईघाईचा असला तरीही आवडीचा दिनक्रम सगळ्यांचा आयुष्याच्या एक मोलाचा भाग आहे.

हे असं सगळ्यांचा आयुष्य ठरल्याप्रमाणे सुरू असताना अचानक कुठून तरी एक डोळ्याला न दिसणारा विषाणू येतो आणि आपल आयुष्य आपली धावपळ एकदमच थबकते.. आपण सगळे जगतमान्य लॉकडाउन मध्ये अटकतो.

आज 50 दिवस होतील , अख्ख जग Lockdown स्थितीत आहे जसजसे दिवस पुढे जात आहेत तसा सगळ्यांना कंटाळा यायला लागला पण आता फक्त कंटाळा नाही तर लोक अस्वस्थ व्हायला सुरू झाले.

थोडक्यात संदीप खरे यांची मराठीत कव्वाली सारखी गत झाली अख्ख्या जगाची.

” अगतिक झालो निष्प्रभ झालो , तरीही केला तुझाच धावा ,
रोकठोक मज आज बोलू दे , माणुसकीने एका देवा ,
जाब तुला रे कुणी पुसावा ,
जाब तुला रे कुणी पुसावा .”

आणी ही अस्वस्थता अगदी लहान शाळकरी मुलापासून ते महाकाय देशापर्यंत आहे.

दुबईतही बऱ्याच दिवसांपासून lockdown होतं , परंतु आता हळू हळू काही दुकाने सुरू करायला सुरुवात झाली आहे.

हॉटेल 24 तास सुरू आहे पण फक्त पार्सल ची व्यवस्था आहे , अत्यावश्यक सेवा पाहिले पासून सुरूच आहेत आता पार्क , मॉल्स व पर्यटन ठिकाण सुरू होण्याच्या मार्गात आहेत.

इकडे वाहतूक व्यवस्था सुरू आहे परंतु एका 4 Wheeler गाडीत फक्त 3 लोकच जाऊ शकता

ड्रायव्हर शेजारी बसण्यास मज्जाव आहे..व टॅक्सी च्या बाहेर बोर्ड लावले आहे ” स्वतच्या जबाबदारी वर प्रवास करावा ,”

दुबई सध्या सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बाहेर जाण्यास परवानगी आहे.

पण मास्क लावणे बंधनकारक आहे मास्क न लावता फिरणाऱ्याला 20 हजार रुपये शिक्षा आहे..

रात्री दहा नंतर बाहेर असणाऱ्या गाडीसाठी 60 हजार रुपये शिक्षा आहे…

सर्व सुरक्षा लक्षात घेऊन आपली आर्थिक मंदी वाचवण्यासाठी लोक बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. लोकांसाठी अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी इथले प्रशासन कसोटीचे प्रयत्नशील आहे सोबतच सर्व व्यवसाय , उद्योगधंदे सुरक्षित राहतील या साठी मदत करतेय…
सर्व लोक नियमांच तंतोतंत पालन करताना दिसताय , सुरक्षित अंतर ठेऊन दिसताय.

पुढील एक ओळ त्या देशांसाठी लागू पडते ज्यांची आरोग्य सेवा क्षेत्रात अग्रगण्य नाव आहे.

“इंद्रा सारखे वीर मातली ,
सांग गूढता मला यातली ,
माझ्या होऊन मज असह्य झाला विद्येचा अपमान,
ज्यांच्या धाके हटला सागर ,
भयादरांचे केवळ आगर ,
त्या भात्यातच विजयी शरांचे आज पडे का वाण.

ह्या ओळी तर अमेरिका , युरोपीय देश , रशिया या देशांना तंतोतंत लागू आहेत आर्थिक , लष्करी , राजकीय ताकदीने आपलं वर्चस्व टिकवायला हव्या त्या पातळीवर जाणारे अशी ओळख असलेले देश रुग्णांची वाढती संख्या पाहून अगदी असह्य होऊन गुडघ्यावर आलेले आहेत.

तसा भारतही आरोग्य क्षेत्रात बराच पुढे आहे अत्यंत महागड्या समजले जाणाऱ्या कॅन्सर , पोलिया, मलेरिया यांची जेनेरिक औषध बनवणे व अत्यंत स्वस्त दरात जगाला देण्याने भारताच्या डझनभर कंपन्यांनी मानाचे स्थान घेऊन ठेवलय.

पण चांगले हॉस्पिटल , डॉक्टर , औषधी हे जरी चांगलं असलं तरी लोकसंख्येचा प्रचंड डोलारा यासमोर सुविधा पुरणार किती.
संपूर्ण जगातले डॉक्टर्स , संशोधक ह्या विषाणू वर लस शोधण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत.

लवकरच ह्या Covid 19 ह्या विषाणू वर औषध येऊन जग पूर्ववत व्हावं हीच सर्वांची इच्छा आहे..

या lockdown एक सकारत्मक गोष्ट सुद्धा आहे. आपल्या जगण्याचा अर्थ हा आपल्याच प्रवासात असतो तो शोधवा लागतो आणि तो शोधण्यात एक मजा आहे. पण आपल्या “नियोजनबद्ध” जगात तो वेळ आपल्याला कधीच मिळत नाही. हे लक्षात आलं नसेल तर ते ओळखा. हि संधी कधी मिळणार नाही. आपलं घर, आपली माणसं आपली शक्ती वाढवतात मग ती शरीराची असो किंवा मनाची. इतकी मोठी ताकत या घरात लपलेली आहे ती बाहेर काढा.

लॉकडाऊन संपल्यावर याची गरज सर्वात जास्त असणार आहे. आपलं मन अणि डोकं शांत करण्यासाठी. कारण पुढचा काळ सोपा नसणार आहे.

शक्य असेल तर अभिप्राय नक्की द्या..

धन्यवाद .?


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!