आपल्या समस्येची गाठ मारून तिला फेकून टाका!!
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
मुंबई-पुणे सकाळी ६.४५ वा. तुम्ही जनरल तिकीट काढून रेल्वेने प्रवास करता. कल्याण स्टेशनवर फलाट क्रमांक ६ वर गाडी लागते. तुम्ही गाडीत चढता. तुमच्या लक्षात येतं की अख्खा डब्बा भरलेला आहे. आता कोण लवकर उठेल त्याचा अंदाज किंवा शोध घेऊन तुम्ही त्या व्यक्तीच्या कडेला केविलवाणा चेहरा करून उभं राहता. कर्जत जातं, खंडाळा घाट येतो…लक्षात येतं की आता पाय खूप ताणले जातायत आणि कालची धावपळ पण पटकन डोळ्यासमोर येते.
यावर सांत्वन म्हणून अतिशय फुशारकीने मन डायव्हर्ट करण्यासाठी तुम्ही मोबाईल काढता आणि मस्त गाणी ऐकता. ताणयुक्त भाग काहीसा दुर्लक्षित होऊन मन एकाजागी स्थिर होते, अनुभव म्हणून तुम्ही प्रात्यक्षिक करता, आणि यशस्वी सुद्धा होता. वेळ भरा-भरा निघून जाते आणि तुम्हालाही कळत नाही की पुणे केव्हा आलं !
आता इकडे होतं काय की, जो ताणयुक्त भाग दुर्लक्षित व्हावा यासाठी आपण आपलं मन वळवतो म्हणजेच बोध मनातलं दुखणं आपण अबोध मनात ढकलतो. इकडे आपल्याला वाटतं की ताण नाहीसा झाला, पण तो अबोध मनात छुप्या स्वरूपात वावरत असतो. हीच अशी प्रक्रिया मनाच्या दुखण्याबद्दल घडते.
एखादं असहाय्य दुखणं चिकटलं की आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करतो आणि तसं केल्यानं आपलं मनही स्ट्रॉंग होतं. पण जेव्हा ते मन स्ट्रॉंग होईल तेव्हा दुखणं सुद्धा उपटून फेकून टाका. नाहीतर अस्तित्वात असणाऱ्या आव्हानांपुढे आपला टिकाव लागणार नाही किंवा आयुष्यातल्या नवनवीन समस्या आणखीन आपल्याला चिंतीत टाकतील. कारण सरावच आपण तात्पुरता आणि चुकीचा करतोय.
समस्यांमध्ये गुरफटून मन कमजोर होणं आणि पुन्हा आवडीच्या गोष्टी करून मन प्रसन्न होणं हे आयुष्याचं वर्तुळ आहे. हे वर्तुळ ज्या व्यक्ती स्वीकारतात त्यांची नाळ वस्तुस्थितीशी घट्ट जुळून असते.
आणि जे समस्येवर तात्पुरता इलाज शोधतात (मन वळवतात) जरी जशीच्या तशी समस्या पुढे भेडसावली नाही तरी त्यांच्या वागणुकीत बदल होतो. अशा व्यक्ती शांत होतात, जीवनाविषयी संकुचित दृष्टिकोन होतो, निरुत्साही, किरकिरी वगैरे वगैरे. म्हणून जुन्या व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा त्यांना आपण बदललेले वाटतो किंवा आपल्याला ते बदललेले वाटतात. याचं मुख्य कारण अशा बऱ्याच त्रासदायक गोष्टी आपण दुर्लक्षित करतो म्हणजेच दाबत असतो. सतत दाबून-दाबून तिकडे प्रेशर आला की त्यातनं मग समस्या आणि मग आजार उद्भवतात.
म्हणून आपआपली Natural Tendency टिकवायची असेल तर मन स्ट्रॉंग झाल्यावर समस्येची गाठ मारून फेकून टाका तिला मनात दाबून ठेऊ नका, आयुष्याच्या वर्तुळाचा जास्तीत जास्त समतोल साधा.
All the best ?
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



