या काळात आर्थिक आणि कौटुंबिक नियोजन कसे कराल?
वृषाली दयानंद बनसोडे
स्पेशल एज्युकेटर, मानसशास्त्र अभ्यासक
आज अडव्होकेट सुकृत देव यांचे ‘आर्थिक तणाव आणि कौटुंबिक नातेसंबंध ‘ यावरचे online lecture ऐकले आणि डोक्यात खाडकन प्रकाश पडल्यासारखे झाले.
आज संपूर्ण जगावर कोरोनाने थैमान माजवले आहे. अश्या काळात आपण गेले दोन महिने घरात बसून आहोत बर्याच जणांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आत्ता आपण घरी आहोत कसेतरी दिवस काढत आहोत. पण घरी आत्ताच निवांत आहोत तर आपण आपल्या भविष्याबद्दल थोडी जागृकता बाळगली पाहिजे.
कठीण काहीच नाही,आपल्याला सकारात्मक दृष्टीनेच ह्या सर्वांकडे पहायचे आहे.माझी नोकरी जाईल,पैसे संपत चालले आहेत,हप्ते कसे भरायचे, मुलांचे शिक्षण,या व अश्या बर्याच आर्थिक अडचणींना आपल्याला सामोरे जायचे आहे.
त्यामुळे आपल्याला सत्य स्विकारावे लागणार आहे.आपण जेव्हढ्या लवकर ते स्विकारू,तेव्हढ्या लवकर आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला या आर्थिक मंदीच्या काळात स्थिर ठेवू शकतो.
कारण सगळ्या गोष्टींचे सोंग घेता येते पण पैश्याचे सोंग घेता येत नाही.यासाठी आपल्याला पुढील येणाऱ्या काळात दोन गोष्टी प्रामुख्याने सांभाळायच्या आहेत. एक म्हणजे, आपले आर्थिक नियोजन, आणि दुसरे आपले कौटुंबिक नातेसंबंध.
सर्वात आधी वर्षभराचा खर्च काढला पाहिजे.त्यातही अत्यावश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च यांची यादी करायला हवी व अत्यावश्यक गोष्टी ह्या खरच अत्यावश्यक आहेत का? याचा संपूर्ण कुटुंबानेच विचार करायला हवा.
आता यात सर्वात महत्त्वाची पण, त्याला आपल्याला फारसे महत्त्व या काळात द्यायचे नाही अशी गोष्ट ती म्हणजे, ‘अनावश्यक खर्च’.ह्याची आपल्याला सवयच अंगवळणी पडली आहे. ती आता कमी करावी लागणार आहे.अनावश्यक खर्च कमीत कमी करता येईल का याचा विचार करायला हवा.किंवा तो शून्यावर आणता येतो का हे ही पाहिले पाहिजे.असे केल्याने आर्थिक ताण बराचसा कमी होण्यास मदत होईल.
बर्याचवेळा कुटुंबात वाद विवाद हे आर्थिक ताणतणावातून होत असतात.त्यामुळे आर्थिक नियोजन करताना पती पत्नी दोघांनी मिळून हा ताळेबंद आखला आणि एकट्यानेच ही जबाबदारी न घेता दोघांनी मिळून ती घेतली तर नातेसंबंध सुधारण्यास मदत होईल.एवढेच नाही तर कुटुंबातील सर्व सभासदांना याविषयी जागृक करायला हवे.आणि तशी सवय लावायला हवी.
लहान मुलांना देखील आवश्यक व अनावश्यक ह्या गोष्टींची जाणीव करून देणे ह्या काळात महत्त्वाचे ठरेल.
थोडक्यात आर्थिक बजेट करावे लागेल, त्यात खर्च ,(आवश्यक+ अनावश्यक)ध्येय काय ठेवायचे आहे ,सेविंग ह्या गोष्टींचे वर्षाचे नियोजन करुन दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेतला गेला पाहिजे. आणि आपले ध्येय पूर्णत्वाकडे जात आहे ना यावर आपले संपूर्ण लक्ष असले पाहिजे.त्यामुळे आर्थिक ताण कमी होईल व परिणामी कुटुंबही सुखी राहिल.?
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



