Skip to content

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारे हे वळण…

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारे हे वळण…


कौंसेलर ज्योत्स्ना डगळे, नाशिक
8830298936


मेनोपॉज एक नवी इनिंग…

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारे हे वळण…

मला चाळीशी आणि कुमारिका ह्या अगदी सारख्याच वाटतात!

कुमारिकेला जोपपर्यंत मासिक धर्माचे चक्र सुरू झालेले नसते तोवर तिचे शरीर एका उमलणाऱ्या फुलाप्रमाणे बहरलेले असते. तिची त्वचा…चेहरा …केस… सगळे कसे उजळ…

निसर्गाने प्रत्येक स्त्रीला हे वरदानच दिलेले आहे. ज्यामुळेच ती मातृत्व अनुभवते. वयाच्या चाळीशीपर्यंत जवळपास तिच्या आयुष्यातील बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडल्या गेलेल्या असतात.

मुले मोठी झालेली असतात. त्यांच्या पालनपोषनाची एवढी भ्रांत नसते. बऱ्यापैकी मुले आपआपली जबाबदारी सांभाळत असतात. गाढीशी असलेले अनुभावाचे गाठोडे.. यातुन ती स्त्री परिपक्व झालेली असते.

आता वेळ आलेली असते ती आयुष्याचा खरा आनंद घेण्याची!
निसर्गाने तुला *फुरसत* दिली आहे स्वत:साठी जगण्याची. स्वत:कडे बघण्याची. तो नैसगिक बदल आपण स्विकारला पाहिजे. तेवढ्याच सकारात्मकतेने…

खर तर निसर्ग तुमचा मासिक धर्म परत घेऊन तुम्हाला पुन्हा तेच कुमारिकेचे सौंदर्य बहाल करणार असतो. तुमच्या शरीरातील हार्मोनल बदल करुन तुम्हाला वेगळे नवे रुपडे देणार असतो.

“तिच निरागसता…”
“तोच उजळपणा…”
“तेच चैतन्य…”

परंतु काही जणी नेमका हा बदल सकारात्कतेने न घेता काहीतरी व्याधी म्हणून बघतात. मग तेव्हा वजन वाढणे, गुडघेदुखी, चिडचिड होणे, अंगावर मस येणे, काळे चट्टे येणे असे प्रकार सुरू होताना दिसतात.

आता तुम्ही म्हणाल तुम्ही काय डॉक्टर आहात का? डॉक्टर ही हेच सांगतात की चाळीशी नंतर हे सुरुच होते.

पण हे प्रत्येकीच्या बाबतीत झाले पाहिजे हे गरजेचे नाही. चाळीशी नंतर तुमचे विचार पुर्णपणे सकारात्मक हवेत. जसे लहानपणी होते.

कोणाचा राग नाही,द्वेष नाही, मत्सर नाही, कोणाची ढवळाढवळ नाही…बऱ्याच जणींना या वयात सुना ही आलेल्या असतात.
जसे लहानपणी आपल्याला फक्त आपले विश्व असते.
कोणाचे काय सुरू आहे याचा काडीमात्र विचार नसतो.
नुसता निखळ आनंद… मनमुराद…

बस्स…! हेच तर करायचे असते या वयात. शरीरात होणारा हा बदल सहजतेने घ्या. लहानपणी जेवढा आहार लागायचा तेवढा हलका आहार, नियमित योगासने, ध्यानधारणा, रोज सकाळी मोकळया हवेत फिरणे, आजकाल बऱ्याच महिलांचे व्हॉट्सॲप ग्रुप असतात ते जॉईन करा, संसाराच्या गराड्यात मुलांच्या पालनपोषणात पतीला वेळ देता येत नाही, तो वेळ द्या त्यांना, नवनवीन कला शिका, जे आवडेल ते…कला कुसर, स्वयंपाकाचे प्रकार हवे ते शिका, निखळ हसण्यासाठी हास्यक्लब जॉईन करा, काही काळ आध्यात्माकडे अथवा एकांतात वेळ घालवा, आपल्या वयाच्या स्त्रीयांमध्ये राहणे, विचारांची देवाणघेवाण करणे. घराच्या जबाबदाऱ्यांपासून हळूहळू स्वत:हून वेगळे होणे…

या सर्व गोष्टींमुळे प्रत्येकाला प्रत्येकाचा स्पेस मिळतो. आपलीही चिडचिड होत नाही.

खर सांगते मैत्रिणींनो हे सर्व जर तुम्ही चाळीशी नंतर आत्मासात केले ना तर शरीरही तुम्हाला सकारात्मक बदल देईल. तुम्हालाही ते लहानपणीचे तेज पुन्हा एकदा मिळेल. आनंदी व्हाल. जगण्याचा मनमुराद आनंद घ्याल. दवाखान्याच्या चकरा कमी होतील. आणि खरच निसर्ग तुमच्या या सेकंड इनिंगला तुमचे नेहमी स्वागतच करेल.

(प्रतिक्रिया अवश्य कळवा)


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!