Skip to content

‘Success’ हे प्रत्येकाच्या सवयींवर अवलंबून आहे, पाहूया..

यशाची व्याख्या


चंद्रकांत शेवाळे


हो यश माणसाच्या आयुष्यात खूप महत्वाचा भाग आहे, प्रत्येक माणूस यश मिळवू शकतो का?का यशाची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगवेगळ्या असू शकतात?असे असंख्य प्रश्न यशाबद्दल उपस्थित होऊ शकतात,

पण मी तर म्हणतो प्रत्येक माणूस हा यशस्वी आहे, लहान बाळ जे जन्माला आल ते सुद्धा यशस्वी आहे, कारण ते नऊ महिने आईच्या पोटात आपल्या खाण्यासाठी व श्वासासाठी अवलंबून असत ,म्हणून बाहेर येऊन मोकळा श्वास घेत, हा सुंदर मानव जन्म भेटतो, ही सुंदर सृष्टी पाहण्यासाठी त्याला संधी मिळाली,हे यशच तर आहे त्याच्यासाठी,

यशाच्या व्याख्या हळुहळू बदलू लागतात ,पण अपयशाची व्याख्या मात्र एकच असते, आपले उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी जी आपली असमर्थता आहे, तिला अपयश म्हणतात,

तर हे यश मिळवण्यासाठी आपल्या आत मध्ये कोणती अशी प्रोग्रॅमिंग करायला पाहिजे,

70 टक्के मार्क्स मिळवणारा विध्यार्थी हा 70 टक्के मार्क्स मिळवायला जेव्हढा अभ्यास करायला पाहिजे तेव्हढा अभ्यास करतो, तसंच 80 टक्के,90 टक्के आणि 95 टक्के वाल्यांच्या बाबतीत घडतं, म्हणजे ते त्यांच्या अभ्यासाच्या प्रमाणावर अवलंबून असत, काही मुलं जन्मतःच हुशार असतात ते अपवाद सोडून देऊ,

तसं माणसाचे यश हे त्याला असलेल्या सवयीवर अवलंबून असते, लखपती होणाऱ्या माणसांच्या सवयी लाख रु कमावणार्या माणसासारख्या असतात, तर करोडपती माणसाच्या सवयी ह्या करोड रुपये कमावणार्या माणसाच्या सवयी सारख्या असतात,

म्हणजे एकंदरीत आपलं यश आणि अपयश आपल्या सवयी वर अवलंबून असतात, तर मग आपल्याला आपल्या वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतील,चांगल्या सवयीचा गुलाम व्हावं लागेल,

त्यासाठी परत आत्म सुचना वापरायच्या, दररोज ‘मी चांगल्या सवइंचा गुलाम आहे’अश्या आत्मसुचना स्वतःला द्यायच्या आहेत, म्हणायचं आहे,अश्या सूचना काही दिवस दिल्यावर आपल्या आत चांगल्या सवयींचा आविष्कार व्हायला सुरुवात होइल,

प्रत्येकाच्या मनातल्या यशाच्या व्याख्या पूर्ण होवो ह्या मनःपूर्वक शुभेच्छा व खूप खूप धन्यवाद!


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!