Skip to content

ढासाळत चाललेली विवाह संस्था….

सप्तपदी – ढासाळत चाललेली विवाह संस्था


कौंसेलर ज्योत्स्ना डगळे, नाशिक,
मोबाईल 8830298936


नमस्कार!

आज पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन येत आहे जीवनाचा एक अनुभव जो काहीतरी शिकवण देऊन जातो…

गेल्या काही दिवसांत माझ्या वाचनात काही लेख आले, कथा आल्या…

नक्कीच त्या रोचक होत्या…भरमसाट Like…Commets
विषयही काहीसे तसेच होते… पती पत्नी आणि त्यांचे शारिरीक संबंध.
त्यात बऱ्याच अंशी पत्नीच्या मनाविरोधात झालेले संबंध…वगैरे वगैरे..

असो…आपल्या विषयाचा मुद्दा हा नाही…
कोण्या एका मुलीचे अथवा मुलाचे लग्नाआधी जर कोणावर प्रेम असले आणि नंतर जर विवाह झाला नसेल तर… नक्कीच तो विवाह बऱ्याचदा जबरदस्तीने केलेला असतो. मग त्याच विरहात जगणे… समोर आहे त्या नात्याचा आनंद न घेणे हे कितपत योग्य आहे हो…
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला Switch On Switch Off करता आले पाहिजे.

ज्या घटना घडल्या आहेत…ज्या आपण कधी बदलू शकत नाही त्या गोष्टींमधे एवढे गुरफटून जाणे म्हणजे मानसिक सुखाचा ऱ्हासच… तुम्हाला तुमच्या प्रेमासोबत सुखी व्हायचे तर जीवाचा आकांत करा ते मिळवण्याचा आणि जर नाहीच मिळवता आले तर पुन्हा एकदा जीवाचा आकांत करा ते विसरण्याचा. असे केले तरच तुम्हाला या गुलाबी नात्याचा आनंद घेता येईल.

विवाह = वि + वाह
म्हणजेच दुसऱ्याला वाहून घेणे. जेव्हा तुम्ही विवाह बंधनात बांधले जातात तेव्हा तुम्ही समोरच्याला वाहून घ्यावे हेच अभिप्रेत असते. हे दोघांनाही लागू आहे बरं का.

पुर्वी उभयतांच्या विवाह पत्रिकेत … “हे दोन जीव शारिरीक बंधनात बांधले जात आहेत” असाही उल्लेख आढळतो. विवाह बंधनाचा अर्थच तोच असतो. मानवाची मानसिक – शारिरीक गरज पुर्ण व्हावी म्हणून कुटूंब व्यवस्था अस्तित्वात आली. आता या संस्थेचं मुळ कार्य , उद्देश काय ते आपण बघू..

त्या संस्थेतून व्यक्तीच्या खालीलप्रमाणे गरजा पुर्ण करता याव्यात हा उद्देश
1. प्रेम / नातेसंबंध
2. विश्वास
3. सुरक्षा
4. महत्तव
5. विविधता
6. पैसा / व्यवहार/ प्रगती

1. प्रेम / नातेसंबंध:
कुटूंबातून तुम्हाला प्रेम मिळते. विविध नाते मिळतात. त्या विविध नात्यांच्या रुपाने विविध प्रकारचे प्रेमही मिळते.

2. विश्वास:
मनुष्य बाहेरच्या जगासाठी कसाही असो. परंतु त्याचे कुटूंबातील नाते हे खुप विश्वाचे असतात. लहान सहान झालेल्या चुका तो कुटूंबात सहज कबूल करतो, सांगतो आणि सहकार्य मिळवतो.

3. सुरक्षा :
कुटूंबात मानवाला नेहमी सुरक्षित वाटत असते. अगदी एखादी वाईट घटना घडली तरी सर्व कुटूंब त्याच्या मागे उभे असते. त्याच्या मानसिक, सामाजिक, शारिरीक बाबतीत मानव कुटूंबात नेहमी सुरक्षित असतो.

4. महत्त्व :
कुटूंबात मानवाला नेहमी एक महत्व प्राप्त होते. त्याच्या नात्यातून. मग ते लहान बाळ असो की वडील, बहीण असो की भाऊ, नवरा असो की पत्नी… प्रत्येकाला आपले एक महत्व असते. जे बाहेरच्या जगात कदाचित सदैव नाही मिळत.

5. विविधता :
कुटूंबात नेहमी विविधतेचा अनुभव येतो. एकदा जन्माला येणारे बाळ विविध रुपाने मोठे होत असते. मानव स्वत: विविध नात्यांमधे बांधला जात असतो. बाबा, मामा, काका, आई, आत्या, मामी आजी इ.

6. पैसा / व्यवहार/ प्रगती :
कुटूंबात राहुन नेहमी मानवाची प्रगती होते. मग ते लहान असो वा माठे. त्यातुन त्याला अर्थाजनही होते. शिक्षण ही त्याच अर्थाजनाची पहिली पायरी असते जी कुटूंबातूनच पुर्ण होत असते.

मंडळी आता आपण कुटूंबाचे महत्वाचे कार्य काय ते पाहिले. आणि विवाह ही याच संस्थेचा एक अविभाज्य भाग आहे त्यामुळे हे सर्व मद्दे विवाहासही लागू पडतात.

ज्यावेळी पती पत्नीतील प्रेम विश्वास कमी होतो तेव्हा आपोआपच सुरक्षा व महत्व कमी होत जाते. त्यातुन नैराश्य येते. आयुष्यातील विविधता दूर होऊ लागते. तेच तेच रटाळ आयुष्य रिपीट होते.
तेच जेवण, तिच चव, तिच रेसिपी, तिच वाक्ये आणि तिच प्रेमाची परिभाषा.

कालांतराने ती एक चौकट होऊन जाते आणि नाते पुढे जाऊन फक्त झेलले जाते. आणि ज्यावेळी या सगळयांचे भांडणात रुपांतर होते, वादविवाद होतात तेव्हा आपसुकच या सर्वांचा तुमच्या पैशावर, प्रगतीवर परिणाम होऊ लागतो. मानवाच्या ह्या सामाजिक गरजा कुटूंबातूनच पुर्ण होतांना दिसतात. परंतु ज्यावेळी यातील एक ही गरज कमी पडू लागते तेव्हा नातेसंबंध सुपंष्टात यायला लागतात…

विवाह म्हणजे दोन जीवांचे आत्म्याचे मिलन आणि तेच नाही झाले तर नक्कीच तो एक बलात्कार म्हणून झेलला जातो. मग हा फक्त महिलांच्याच बाबतीत नाही पुरुष ही हे सहन करत असतात. आणि वर दिलेल्या गरजा जेव्हा पुर्ण होत नाहीत तेव्हा विवाहबाह्य संबंध ठेवले जातात.

विवाहबाह्य संबंधाची खरच गरज आहे का हो?

तर माझे उत्तर नक्कीच नाही असेल. वर दिलेल्या सर्व गरजा तुमचे कुटूंब पुर्ण करु शकते. मान्य आहे प्रत्येक जण परिपूर्ण नाही. म्हणून च वाहून घ्यायचे असते. एकाने सांडले तर दुसऱ्याने भरायचे असते.

कधी कधी जोडीदाराला त्या बेडवरच्या मिठीपेक्षा मोकळ्या आभाळााखाली हातात हात घालून जुळवलेली कैची ही खुप सुखावून जाते.

कोण म्हणते फिरायला खुप पैसा लागतो. जा की आपल्या जोडीदारासोबत… बगीच्यात बसा. अगदी दहा रुपयांचे चणे खाऊनही ठिगभर गप्पा होतात. याला काही अपवादही आहेत जे जोडीदाराला फक्त ATM समजतात.

तिला बेडवरच्या जबरदस्तीपेक्षा दिवसभरात ते जोडीदाराचे चोरटे स्पर्शही सुखावून जातात. हे सर्व आपण पुर्वी ही केलेले असते. पण आता किती वर्षे झाली लग्नाला…. नाते जुने झाले…. पण म्हणतात ना लोणचे जेवढे मुरले तेवढे अधीक चव देते.

बऱ्याच घरांमध्ये दोघेही कमावते असतात. कामाच्या व्यापात एकमेकांना वेळ दिला जात नाही म्हणून विवाहबाह्य संबंध ठेवले जातात…

मी याचे कधीही समर्थन करणार नाही. समोरचा ही आपल्यासाठी च राबत असतो याची जाणीव दुसऱ्याला असायला हवी. आणि वेळ आली तर समोरच्यानेही ते कधीतरी समजावून सांगायला हवे.

विचार करा आपण दिवसाचे किती तरी तास सोबत असतो, पण आपण आपल्या जोडीदाराला नेहमी गृहीत धरतो. दोघांनाही सकाळची घाई असते, कामावर निघायचे असते. #त्याचा चहा #ती टेबलवर देते आणि तिचा मात्र किचन ओट्यावरच… दोघांनीही वेळेचे नियोजन केले तर हेच घरकाम खुप रोमँटिक होऊ शकतात.पण बऱ्याच घरांत पुरूषी अहंकार आडवा येतो. अशा घरामध्ये पोळ्या लाटणाऱ्या पत्नीला पाठीमागून साधी मिठी मारायची मजा काय असते ते कधीच समजत नाही.

जोडीदार आळशी असतो, लवकर उठत नाही… अशावेळी त्या जोडीदाराचे आधीचे पुर्वायुष्य बघावे. हा बदल आता झालाय की या आधीपासूनच आहे. त्या मागची कारणे शोधा. कदाचित महिला असेल तर ती दिवसभर थकत असेल. आणि जर असे नसेल तर नक्कीच ती काही तनावाखाली ही असेल. पुरूष असेल तर त्याला कामाच्या ठिकाणी काही तनाव आहे का? समोरच्याने एखाद्यावेळी लवकर उठून आवरावे व सांगावे की लवकर उठल्याने किती कामे पटापट होतात ते. लक्षात ठेवा की नाती ही खुप नाजूक असतात. ती कधीही आदेश देऊन नाही ठिक होत तर ती नेहमी अनुकरण करत असतात.

बऱ्याच ठिकाणी लग्न जमवते वेळी फसवणूक केली जाते. अशावेळी अगदीच शक्य नसेल तर कायद्याचा आधार घ्यावा. पण ज्या गोष्टी पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण करणाऱ्या नसतात…जसे की मुलीची मोठी बहिण नवऱ्याने टाकून दिली आहे. याने तुमच्या नात्यावर विशेष परिणाम होणारा नसतो.
तिथे शारिरीक व्यंग असेल, वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तिथे नक्कीच काडीमोड घ्यावी. परंतु जोडीदार दिसायला चांगला नाही, सुंदर नाही, ह्या गोष्टी गौण आहेत. दिसण्यापेक्षा स्वभाव महत्वाचा…
यावर मला ते गाणे आठवते…
“मोह मोह के धागे… किती विसंगती असते हो तरी सुद्धा प्रेम होतेच ना..”

काही घरांमध्ये पती पत्नी और वो असतो/ असते/ असतात…
आता इथे #वो ही व्यक्ती असू शकते अथवा #व्यक्तींचा #समुह ही असतो.
हा समुह असतो सासर किंवा माहेरच्या लोकांच्या…
एकदा विवाह झाल्यावर दोघांच्याही घरच्यांनी उभयतांच्या संसारात जास्त लक्ष न दिलेलच बरे.
बऱ्याच ठिकाणी 498 या कलमाचा चुकीचा वापर होतांना दिसतो. लक्षात ठेवा जोडीदार हा आयुष्यभराचा साथी असतो. आईवडील सासू सासरे यांचा योग्य त्या ठिकाणी आदर नक्कीच असावा पण जास्त हस्तक्षेपही नसावा.

बऱ्याचदा दोघांमधील वयातील अंतर अधीक असते. अशा वेळी जो जोडीदार अधिक वयाचा आहे त्याने ह्याची जाणीच ठेवावी. आपले मन नेहमी तरुण असते. आणि ते तरुणच ठेवावे. कारण घडल्या गोष्टी बदलता येत नसतील तर त्या स्विकार करा. आणि खरोखरीच जर असे काही विवाह स्वार्थ ठेवून केले असतील तर ते कधीही यशस्वी होत नाहीत. त्यामुळे भलेही विवाह करते वेळी जर काही स्वार्थ ठेवला असेल तर तो बाजूला सारुन निस्वार्थ भावनेने संसार करावा.

ज्यावेळी जोडीदार आधीच कोणा एका व्यक्तीच्या प्रेमात अडकलेला असेल व काही कारणाने त्यांचा विवाह होऊ शकला नसेल तर अशा जोडीदाराने आपल्या जोडीदाराला विश्वास घेऊन हे सर्व सांगितले पाहिजे. व समोरच्यानेही त्या भावनांचा आदर करुन ते स्विकारावे. त्यातुन विश्वास दृढ होतो. परंतु चुकून ही त्या भुतकाळात पुन्हा एकदा डोकावून पाहू नये.
असे करणे म्हणजे अनेक संकटांना सामोरे जाणे.
आता तुम्ही म्हणाल त्या व्यक्तीला विसरून जाणे शक्य नाही…मान्य आहे. नाही शक्य …
पण आज जी व्यक्ती प्रत्यक्षात आपल्या आयुष्यातच नाही, जी आता आपली कधीही हाऊ शकणार नाही तिच्याच आठवणीत रमून आपले वर्तमान ही बरबाद करणे हे कोणते हो शहाणपण.
नक्कीच त्या व्यक्ती बद्दल शुभभावना ठेवा. त्या व्यक्तीला ही तुमच्या सारखे आयुष्य लाभो ही कामना ठेवा.

ती किंवा तो माझा नाही झाला तर तो किंवा ती कधीही सुखी नाही होणार, त्या व्यक्तीला सतत याची जाणीव करून देणे हे सर्वथा चुकीचेच आहे. प्रत्येक जण त्याचे त्याचे नातेसंबंध विधीलिखीत घेऊन आलेला असतो . प्रत्येक व्यक्तीसोबत आपले ऋुणानुबंध हे ठरवूनच होत असतात. त्यामुळे जे झाले ते चांगले झाले आणि जे होईल ते ही चांगले च होईल या भावनेने पुढे चालावे.

अशा उभयतांनी नक्कीच #विवाहपुर्व #समुपदेशन करून घेतल्यास खुप फायदा होतो. यामुळे विवाहाबाबत असणाऱ्या अनेक गैरसमजुती दुर होतात, पती पत्नी संबंध प्रेमाने कसे वृद्धींगत करावे याबाबत ही मार्गदर्शन मिळते.

विवाहापुर्वी दोघांनीही वैद्यकीय तपासण्या करणे खुप आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी विवाहानंतर मुल होत नाही म्हणून अडचणी येतात त्याकरीता ही काही विशिष्ठ चाचण्या आहेत त्या जरूर करून घ्याव्या. विवाहापुर्वीच असलेले व्यसन, सवयी ह्या जर विश्वासात घेऊन सांगितल्या गेल्या तर हे नाते आयुष्यभर टिकते.

क्षमा हे खुप मोठे औषध आहे हे नेहमी लक्षात ठेवा. पती पत्नी मिलनामध्ये आपण कोणतेही अंतर ठेवत नाही मग त्या मनांमध्ये तरी अंतर का असावे… एकमेकांना सदैव साथ द्यावी. एकमेकांचे सुख् दु्:ख बघावे, नात्यात एक प्रकारचा ओलावा ठेवावा. विचार करा जी नाती रक्ताची असतात ते लोक पण आपल्या सोबत आयुष्यभर रहात नाहीत.. मग परमेश्वराने हेच एक नाते असे का हो केले असेल की जे आयुष्यभर साथ राहते…नक्कीच ते खुप खास आहे म्हणूनच…

मला इथे त्या गाण्याच्या ओळी आठवतात…

“जब कोई बात बिगड जाये”
“जब कोई मुश्किल पड जाये”
“तुम देना साथ मेरा”
“ओ हमनवाज”

Life is Love and Love is Life…Live that Moment…

मंडळी सांगण्यासारखे बरेच काही आहे. परंतु तुमचे बिघडलेले नाते सुधारण्यासाठी एवढे पुरेसे आहे.
यापेक्षा ही काही प्रश्न असल्यास नक्कीच संपर्क करा. तुमच्या अनमोल प्रतिक्रिया जरूर कळवा.


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!