Skip to content

‘Introvert’ लोकांचे हे गुण तुम्हाला माहीत आहेत का?

‘इन्ट्रोव्हर्ट’ लोकांचे हे गुण तुम्हाला माहित आहेत का?


काही लोक असतात ना असे, ज्यांना जगामध्ये काही रस नसतो… त्यांना रस असतो तो स्वतः मध्ये. त्यांना स्वतःशीच मस्त संवाद साधता येतो…

बरेचदा होतं ना असं की एखाद्याची इमेजच अशी असते की, त्यांच्या बद्दल परिचयाच्या लोकांची अशी मतं ठरलेली असतात की, ‘त्याच्या घरी जावं तर आलेल्या पाहुण्यांशी तो बोलतही नाही…’

अशा लोकांना बरेचदा शिष्ट, अतिशहाणे, माणूसघाणे असं म्हणून चौकटीच्या बाहेर केलं जातं.

आणि मुळात म्हणजे या लोकांना पण त्या विशिष्ठ चौकटीत राहण्यात रस नसतो…

हो अशाच अंतर्मुख, ज्याला इंग्रजी मध्ये ‘इन्ट्रोव्हर्ट’ म्हंटल जातं आशा लोकांबद्दल आज आपण बोलणार आहोत!!

एखाद्या ठिकाणी चांगली पार्टी चालूये आणि कोणीतरी बाजूला एखाद्या कोपऱ्यात खुर्ची टाकून बसलंय!! असं पाहिलं असेल ना कधीतरी??

एका सर्व्हेनुसार एकूण लोकसंख्येच्या २५ ते ४० टक्के लोक हे अंतर्मुख असतात.

तरीही या प्रकारच्या लोकांबद्दल समाजात खूप गैरसमज आहेत, असतात…

त्यांना एक तर लाजाळू समजलं जातं, शिष्ट समजलं जातं किंवा माणूसघाणं तरी समजलं जातं…

पण ही अंतर्मुख माणसं समाजाचा बराच मोठा भाग व्यापतात. तुमच्या पण घरात, ओळखीच्या लोकांमध्ये असे लोक माहीत असतीलच कि तुम्हाला?

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या अडचणींना तोंड कसं द्यायचं? कुठल्याही परिस्थितीत मस्त मजेत कसं राहायचं हे तुम्हाला या अंतर्मुख असलेल्या लोकांकडून शिकता येईल…

आणि म्हणूनच आज मी तुमच्याशी या अंतर्मुख, इन्ट्रोव्हर्ट स्वभावाच्या लोकांबद्दल बोलणार आहे. कारण हे लोक जरी खूप सारे मित्र मैत्रिणी बनवणारे नसले तरी तुम्हाला जर कोणी असा मित्र मिळाला तर खरी मैत्री काय हे दाखवून देणारे हे लोक असतात.

या लोकांची काही ठळक वैशिष्ट्ये, गुण आता आपण बघू.

१) हे लोक शांत असतात:

शांत असणं हा शब्द तसा पहिला तर अगदी साधा…

पण या लोकांच्या बाबतीत ती शांतता म्हणजे सोनेरी शांतता असते… हे त्यांच्यासाठी एक छान फिलिंग असतं.

या शांततेत ते रमतात, जास्त क्रिएटिव्ह असतात, जास्त फोकस असतात. तर या इन्ट्रॅव्हर्ट लोकांच्या शांततेला भयाण शांतता समजण्याची चूक करू नका.

या लोकांकडे पाहिलं तर तुम्हाला हे शिकता येईल की नेहमी फक्त गर्दीचा हिस्सा असलं तरच जगणं सोपं होईल असं काही नसतं. एकांतात एन्जॉय करता येणं हीच यांची खासियत असते.

मुळात अविश्वसनीय रित्त्या यश मिळवलेले लोक हे बरेचदा इन्ट्रॅव्हर्ट असतात.

शिवाय या लोकांकडे नीट पाहिलं तर हेही शिकता येईल की कामातून चांगले रिझल्ट्स मिळवण्यासाठी या गुणाची खूप गरज असते…

२) अंतर्मुख लोक हे कंटाळवाणं आयुष्य जगत नसतात!!

जनरली लोकांना काय वाटतं की, जी लोक कमी बोलतात म्हणजे अंतर्मुख असतात त्यांचं आयुष्य कंटाळवाणं असेल. त्यांना कशात रस नसेल म्हणून ते काही बोलत नाहीत. मुळात ते त्यांचं आयुष्य जगत नसतील तर नुसते दिवस ढकलत असतील….

पण काही मोजक्या लोकांनाच या अंतर्मुख प्रकारातल्या लोकांची नस सापडलेली असते. त्यांना माहीत असतं की ही व्यक्ती कंटाळवाणी नसून फक्त शांत आहे. या लोकांना स्वतः बरोबर एन्जॉय करणं चांगलं जमतं?

इतर गॉसिप्स, उगाचच होणाऱ्या चर्चा त्यांच्यासाठी बिन महत्त्वाच्या असतात.

मात्र ज्या लोकांशी त्यांचं ट्युनिंग जमलेलं असतं त्याच लोकांना यांच्या रसिकतेचा चांगला अनुभव असतो.

३) अंतर्मुख लोक हे प्रेमाचा झरा असतात

सहसा लोकांना असं वाटतं की अंतर्मुख असलेले लोक हे माणुसघाणे असतात, इतरांना कमी लेखतात आणि त्यांचा तिरस्कार करतात.

पण हा समज अगदीच चुकीचा आहे बरंका!!

हे लोक आपली शक्ती इतरांचा विचार करण्यात घालवत नाहीत. मुळात यांना सर्वांबद्दल प्रेमच असतं. पण ते दाखवणं त्यांच्यासाठी तितकंसं महत्त्वाचं नसतं!!

यांना मित्र-मैत्रिणी असतात पण कमी असतात… हे लोक सहजासहजी ओपन-अप होत नाहीत.

पण ज्यांना कोणाला यांचा अनुभव जवळून येतो त्यांच्यासाठी मात्र तो अनुभव असा असतो की, ‘देवाची कर्णी आणि नारळात पाणी’

४) ते खोटेपणाचा आव आणत नाहीत

बरेचदा लोकांचा असा गैरसमज असतो की अंतर्मुख लोक हे स्वतःला आहे त्यापेक्षा जास्त सुपेरियर दाखवण्याचा प्रयत्न करतात.

त्यामुळे सामान्य लोक यांच्यापासून चार हात दूर राहतात.

५) हे लोक गाढ मैत्री करणारे असतात

एक्सट्रोव्हर्ट लोकांचे बरेच मित्र- मैत्रिणी असतात. आणि भविष्यात पण होणारच असतात त्यामुळे त्यांना कोणाबरोबर मैत्री तुटण्याची काहीही फिकर नसते. कारण एक मित्र तुटला तर दुसरा होणार असतो.

पण इन्ट्रोव्हर्ट, अंतर्मुख लोकांना त्यांची मैत्री असो किंवा प्रेम असो ते त्यांनी पारखून, निरखून केलेलं असतं. त्यामुळे ती मैत्री ते प्रेम त्यांच्यासाठी अमूल्य ठेवा असल्या सारखं असतं. त्यामुळे हे लोक गाढ मैत्री करणारे असतात…

६) हे लोक भरपूर वाचन करतात.

या लोकांचे जे कमी मित्र असतात त्यात एक महत्त्वाचा मित्र असतो तो म्हणजे पुस्तक!!!

हे थोडेच, पण अगदी ठळक दिसणारे इन्ट्रोव्हर्ट लोकांचे गुण आता मी या लेखात तुम्हाला सांगितले

याशिवाय हे लोक बघण्यातून खूप काही शिकत असतात, यांना स्वतःच्या अनुभवातून शिकण्याची सवय असते. महत्त्वाचं म्हणजे धूर्तपणा आणि कपट या लोकांना शिवूनही जात नाही.

असेच काही इन्ट्रोव्हर्ट लोक तूमच्याही घरात मित्रपरिवारत असतील तर त्यांचे याहीपेक्षा काही इंटरेस्टींग गुण तुम्ही हेरले असतील. ते गुण कमेन्ट बॉक्स मध्ये लिहून आम्हाला सांगा.

आणि हो इन्ट्रोव्हर्ट माणूस हा लेख वाचून गालातल्या गालात हसेल. पण त्याने त्याचा एकुलता एक जिगरी दोस्त सापडल्यासारखं इथे छोटासा कमेन्ट टाकायला नक्कीच काही हरकत नाही?


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!