Skip to content

‘पॉर्न बंदी आणि आपण’….लैंगिक शिक्षण नको पण पॉर्न हवंय!!

पॉर्नबंदी झाल्यानंतर…


भारत देशात पॉर्न साईट्सवर बंदी घालण्यात आली आहे. २०१४ साली केंद्र सरकारकडून यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले होते. त्यानंतर मग २०१५ ते २०१८ पर्यंत हर प्रकारे शर्थ करून केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडून भारत देशात पॉर्न संकेतस्थळांवर बंदी आणलीच. तब्बल ८२७ पॉर्न साईट्सवर बंदी घातल्याचे केंद्रातील सरकारकडून सांगण्यात आले. पॉर्न म्हणजे अत्यंत अश्लील साहित्य असणाऱ्या चित्रफिती होय. अन, असे साहित्य निर्माण करणारी बॉलिवूडसारखीच पण त्यापेक्षा कोट्यवधीने अधिक उलाढाल असणारी इंडस्ट्री हे सगळं रोज लाखोंच्या संख्येने इंटरनेटवर अपलोड करत असते. जगभरात क्षणाक्षणाला कुठे ना कुठे पॉर्न बघितले जाते, अपलोड केले जाते. भारतात २०१८ साली पॉर्नबंदी लागू झाल्यानंतर लोकांच्या जीवनमानात सुधारणा झाली का? ज्या उद्देशास्तव पॉर्न नाकारले जात आहे, तो खरोखरच साध्य झाला आहे? याच, प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीचा आजचा हा लेखप्रपंच!

एकेक मुद्दा विचारात घेऊया. सर्वप्रथम पॉर्न खरोखरच भारत देशातून हद्दपार झालं आहे का? अगदीच, हास्यास्पद प्रश्न ठरावा. याचं कारण, भारतातून पॉर्न हद्दपार मुळीच झालेलं नाही. मग, ८२७ साईट्सवर बंदी आलीये ते कसे? तर, याबाबतीत मी असे म्हणेल की, या ८२७ साईट्सची नावे माझ्यापर्यंत अजून तरी आलेली नाहीत. त्यामुळे मला माहीत असणाऱ्या एक्सव्डिडिओ, पॉर्नहब याच माहिती आहेत.

यापैकी पॉर्नहब साईट ही भारताला ठरणारी भयंकर डोकेदुखीच आहे. त्यामुळे सरकारकडून तिच्यावर बंदी आणण्यात आली असावी, अशी मला दाट शंका येते. खरंतर, पॉर्नहब साईटवर भारताचा पॉर्न बघण्यात तृतीय क्रमांक असल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे मग लगेचच त्या साईटवर बंदीची नामुष्की आली नसती तरच नवल होते. त्यानंतरही २०१९मध्ये पॉर्नहबने भारत अजूनही पॉर्न बघण्यात आघाडीवरच असल्याचे सांगितले, हा भाग वेगळा. या माहितीची सत्यता आघाडीच्या वृत्तपत्रांनी दिलेली आहे. एक्सव्हिडिओच्या सर्चयादीत, ट्रेंड यादीत तर, भारतीयांनी केलेले अगदी रेप व्हिडिओ सर्चचाही अहवाल यायचा. तिच्यावर बंदी ओढावणार होतीच. पण, या वासत्वात खूप मोठी गफलत आहे.

प्राइमपॉर्नलिस्ट नावाची एक वेबसाईट आहे. माझं म्हणण्याची सत्यता तपासण्यासाठी तुम्ही नक्कीच या वेबसाईटला भेट द्यावी. गुगल केलं तर सगळं कळेलच. तर, ही एक अशी वेबसाईट आहे ज्यावर भारतीय डोमेनच्या पॉर्नसाईट्सच्या तुम्हाला लिंक सहज मिळू शकतात. मी शोधल्या तेव्हा मला १३ मिळाल्यात. याशिवाय गुगल सर्चमध्ये आपण जर काही किवर्ड वापरले, तर आणखीन धक्कादायक चित्र बघायला मिळते. पॉर्न साईट्स बंद केल्याचे दावे केले जात असताना भारतीय डोमेन उदा. जस्ट इंडियन पॉर्न, फ्री इंडियन पॉर्न मोबी ईत्यादी.

थोडक्यात भारतात पॉर्न साईट्सवर बंदी असल्याचे जो दावा आहे, तोच निकाली निघतो. भयाण वास्तव हे आहे की भारतात पॉर्न साईट्स अजूनही सुरू आहेत, नुसत्या सुरूच नाही तर त्या भारतातून ऑपरेटही केल्या जात आहेत. त्यावर आढळून आलेलं साहित्य हे भारतीय घराघरांतील चित्र आहे. तेव्हा, भारतात पॉर्नबंदी हा एक भ्रमच म्हणावा लागेल!

पत्रकार मेघा मोहन यांनी केलेल्या एका अहवालात एका पीडितेच्या आपबीतीची मीमांसा केली होती. या पीडितेने एका पॉर्न साइटशी संघर्ष केला होता. तिच्यावरील बलात्काराचा व्हिडिओ काढून टाकण्यासाठी तिलाच झुंजावे लागले होते. या अशा परिस्थितीत पॉर्न साइट्सचे असणे प्रचंड भयंकरच बनते. तर, पॉर्नसाइटचा उपयोग हा अशा गुन्ह्यांसाठी केला जाऊ शकतो. याशिवाय माझ्या तुमच्या वाचनात पॉर्न बघितल्याने बलात्कार करण्यास उद्युक्त झालो असल्याची कबुली देणाऱ्या आरोपींची नावेही वाचनात आली असतील. अशा महाभयंकर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी म्हणून देशात पॉर्नसाइट्सवर बंदी घालण्यात आली. ही दोन कारणे जरी लक्षात घेतली तर, पॉर्नबंदी किती कौतुकास्पद बाब म्हणायला हवी.

सकारात्मक बदल घडवायला उचलले गेलेलं मोठं पाऊलच. पण, याही बाबतीत आपल्याकडे सत्यतेची वाणवाच आहे. इंटरनेटवर धक्कादायक खुलासे घडताना दिसतात.

भारतात बिनदिक्कत दिसू शकणाऱ्या सर्व पॉर्न साईटवर करोडोने भारतीय लोकांचे संभोगाचे व्हिडिओ बघायला सर्रास मिळत आहेत. त्यातील जटीलता एवढी किळसवाणी आहे की त्याबद्दल लिहिण्यानेही मला शिसारी यावी. राजकारणी, उद्योगपती अशा वर्गवारीतील लोकांचेही व्हिडिओ आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत, याहून देशासाठी शरमेची बाब ती काय? सगळं सांगण्याचा मतितार्थ हाच की, भारत देशात पॉर्नबंदी नाहीच.

पण, देशात त्याहीपुढे जाऊन एक स्वतंत्र अशी पॉर्न इंडस्ट्रीच सुरू झाली आहे. उपरोल्लेखित दोन साइट सोडल्या इतर अनेक वेबसाइटद्वारे भारतीय पॉर्न पाहतात. नव्हे, त्यात आघाडीही मिळवतात! जगाप्रमाणेच भारतातही एक पॉर्न इंडस्ट्री ही आकाराला आलेली आहे. याशिवाय फेसबुक, व्हॉट्सअपवरूनही लाखो ग्रुप्समधून भारतीय लोक पॉर्न बघण्याचा असुरी आनंद लुटतातच. हे तर, सगळ्यांनात थोड्याफार प्रमाणावर माहीत असेल. राहिलाच सवाल, स्त्रियांच्या सुरक्षेचा, अन त्याला पॉर्नमुळे बाधा होत असल्याचा. तर, जेवढी काय पॉर्नबंदी केली गेली त्यामुळे कुठेतरी बलात्कार थांबलेत का? यावर, आपण प्रत्येकच जण उद्विग्न होऊ. असे काहीही, खरंच झालेलं नाही. तेव्हा, पॉर्नबंदी झाल्यानंतरही पॉर्नबंदी झालीच नाही हे कटू सत्य आहे, असे म्हणावेसे वाटते.

कायद्याचा आधार घेऊन हे पॉर्नबंदीचा सवंग मार्ग अवलंबण्याऐवजी योग्य असे लैंगिकता शिक्षण देण्याचीच गरज केंद्र सरकारला वाटत नाही, हे भारतीय म्हणून आपलं दुर्दैवच. स्वतःत जागृत झालेली लैंगिक भूक शमविण्यासाठी विकृत होण्याची गरज नसते, भिन्न लिंगावर हक्क गाजवण्याची गरज नसते. वयात आल्यानंतर प्रेम, मैत्री याबद्दल योग्य सल्ला देण्याची देशात सर्वाधिक गरज आहे. बाकी, राहिला विषय पॉर्नचा तर, ते बंद कधी झालं नव्हतंच, यापुढेही होऊच शकत नाही.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!